09 August 2020

News Flash

होय, मी बंडखोरी केली

काळाबरोबर बदलणं हेच सांस्कृतिकदृष्टय़ा प्रगल्भ होणं असतं

काळाबरोबर बदलणं हेच सांस्कृतिकदृष्टय़ा प्रगल्भ होणं असतं, परंतु संस्कृतीच्या नावाखाली त्यातही मर्यादा आणल्या जातात. परंपरा, रीतभात सांभाळत जगणं, पुरुषप्रधान संस्कृतीनं ठरवलेले नियम पाळणं हे आदर्श स्त्रीचं लक्षण आत्ता आत्तापर्यंत मानलं जात होतं. मात्र तेच आपलं जगणं मर्यादित करतंय हे लक्षात आल्यावर स्त्रियांनी पर्याय शोधायला सुरुवात केली. मोकळा श्वास घेणं ही जर बंडखोरी असेल तर ती ते करू लागली आणि परंपरा मोडणं हे जर संस्कृती बुडवणं असेल तर ती करू लागली आणि तेच आता काळाच्या कसोटीवरही उतरू लागलंय. अनेकींनी त्या पायवाटेवरून जात त्याचा हमरस्ता केलाय.. तुम्ही चालला आहात अशी वेगळी वाट? मोडलीय एकदी काचणारी परंपरा? बदलले आहेत पूर्वापार नियम? आम्हाला कळवा..
कुटुंबाच्या विरोधात शिक्षणासाठी वा नोकरीसाठी घराबाहेर पाऊल टाकणं असो, एखादं वेगळं करिअर निवडणं असो, एकटीनं, स्वतंत्रपणे राहायला लागणं असो, मासिक पाळी चालू असतानाही देवदर्शन करणं असो, कर्मकांडांना मर्यादित करणं असो, आंतरजातीय वा आंतरधर्मीय लग्न असो. स्त्रीनं जिथे जाणं, जे करणं निषिद्ध ठरवलंय ते तुम्ही केलंय का? किंवा वेगळा मार्ग निवडला का? आम्हाला कळवा.
तुमचा तो अनुभव आम्हाला २०० ते ३०० शब्दांत लिहून कळवा. कोणते नियम, परंपरा, गृहीतक तुम्ही मोडलंय आणि स्वातंत्र्याचा अनुभव घेतलात. ते का करावंसं वाटलं? कुणाकुणाचा विरोध होता? तो मोडून काढण्यासाठी काय प्रयत्न केलेत? पण बंडखोरीच करावी लागली असेल तर ती केल्यावर काय अनुभव आला?
तुमचे अनुभव ई-मेल वा कुरिअर करू शकता. निवडक अनुभव प्रसिद्ध होतील चतुरंग पुरवणीमध्ये!  आमचा पत्ता – चतुरंग, लोकसत्ता, ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रिल इस्टेट, महापे, नवी मुंबई – ४००६१० किंवा ई-मेल करा – chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2015 1:10 am

Web Title: yes i am a rebel women
टॅग Challenges,Stories
Next Stories
1 आहारवेद- पालक
2 घटस्फोट आईवडिलांचा स्फोट मुलांच्या मनाचा!
3 दुर्गा‘शक्ती’च्या जिद्दीपुढे गगन ठेंगणे
Just Now!
X