‘गुरु हा संतकुळींचा राजा

गुरु हा प्राण विसावा माझा

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

गुरुविण देव दुजा

पाहता नाही त्रिलोकी’

या ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांसाठी लिहिलेल्या पंक्तींना अनुरूप ठरेल असे ताईंचे व्यक्तिमत्त्व होते. आई-वडील यांच्याहीपेक्षा जो मोठा तो गुरू अशी माझी गुरूंविषयी प्रामाणिक भावना आहे. किशोरीताईंशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना मी करूच शकत नाही. ‘मी जरी देहाने तुझ्यासोबत नसले तरी मी कायम तुझ्यासोबत असेन,’ असा विश्वास ताईंनी मला दिला होता. आज या गोष्टीचा प्रत्यय येतो. ताईंनी संगीत शिकवण्यातून मला भरभरून दिले. ते टिकवणे, वाढवणे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे माझे आद्य कर्तव्य आहे असे मी समजते. गाण्याची परंपरा भावी पिढीपर्यंत पोहोचवली नाही तर ताईंनी शिकवलेल्या गोष्टींचा काही उपयोग होणार नाही. आज जे शिष्य माझ्याजवळ आहेत- आणि भविष्यात जे येणार आहेत, त्यांच्यापर्यंत ही गायनपरंपरा पोहोचवण्याचा प्रयत्न माझ्याकडून नेहमी होत राहील. ताईंची माझ्याकडून हीच अपेक्षा होती. शिष्याने संपूर्ण शरणागती घेतल्याशिवाय गुरू जे सांगतो ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ताई नेहमी एक गोष्ट सांगायच्या- एका जागेवर एकच वस्तू राहू शकते. गायन शिकताना तुला तुझ्यातल्या स्वत:ला बाजूला ठेवावे लागेल, तेव्हाच मी जे ज्ञान तुला देईन ते तुझ्यापर्यंत पोहोचेल. शिष्याने अहंकार कायम दूर सारायला हवा, ही शिकवण ताईंनी दिली. गुरू म्हणून ताई इतक्या मोठय़ा होत्या, की शिष्याला संपूर्ण बदलण्याची ताकद त्यांच्यात होती. आम्हा दोघींमध्ये संगीत हे माध्यम होते. संगीताच्या माध्यमातून ताईंनी अनोख्या जगाची ओळख करून दिली. संगीतामुळे आम्ही एकत्र आलो. पण तिथेच थांबलो नाही. त्यापलीकडेही जाऊन अलौकिकत्व काय आहे, संगीत काय आहे, गाणे का करायचे, एखादी कला व्यक्तीने का करायची, याचे महत्त्व ताईंनी वेळोवेळी पटवून दिले. एखादी कला आवडते म्हणून ती जोपासणे हे सर्वसामान्य कारण आहे. मात्र किशोरीताईंनी त्या गाणे का करतात, आणि मी गाणे का करायला हवे, हे समजावून सांगितले. संगीतात सादरीकरण करणे, नाव कमावणे ही व्यवधाने असतातच. पण हे अंतिम ध्येय नाही. संगीताचे अंतिम ध्येय परमानंदापर्यंत जाणे हे आहे, हे ताईंनी समजावले. संगीताच्या माध्यमातून कुठे जायचंय, त्यातून व्यक्त होणारी गोष्ट श्रोत्यांपर्यंत पोहोचते की नाही, याचा विचार करायला त्यांनी शिकवले. मला देहस्वरूपात पाहू नकोस.. माझ्यामध्ये जे आहे त्याच्यावर प्रेम कर, असे वेळोवेळी सांगितले. आज त्या आपल्यात नाहीत असे वाटतच नाही. अत्यंत सूक्ष्म बाबींकडे ताईंचे लक्ष असायचे. स्वच्छता, नीटनेटकेपणा या सगळ्या गोष्टींबरोबरच आध्यात्मिक ऊर्जा त्यांच्यात होती. हे सगळे त्यांना माझ्यात संक्रमित करायचे होते. वयाच्या सोळाव्या वर्षी मी त्यांच्याकडे गाणे शिकायला गेले. विशिष्ट वयात व्यक्तीचे विचार पक्के होतात. अशा वयात त्याच्यावर संस्कार करणे कठीण असते. मी मात्र वाढत्या वयात ताईंकडे गाणे शिकायला गेल्याने माझ्यावर संस्कार करणे ताईंना सोपे गेले. या संस्कारांमुळे मी व्यक्ती म्हणून घडत गेले. गायन वा रसशास्त्र, नाटय़शास्त्र, काव्यशास्त्राचा अभ्यास,  वाचन आम्ही एकत्र केले. मी वाचायचे, ताई ऐकायच्या व त्या विषयावर बोलायच्या. ताईंनी लहान वयात केलेल्या मार्गदर्शनाने माझी वैचारिक पात्रता वाढली. रस म्हणजे काय, भाव म्हणजे काय, काव्य म्हणजे काय, अशा अनंत गोष्टींचा आम्ही एकत्रित अभ्यास केला. मला समजावून सांगताना त्यांचे स्वत:चे व्यक्तिमत्त्व त्या पडताळून पाहत. आम्ही दोघी एखाद्या विषयावर चर्चा करायचो. जे मला पटले नाही ते स्पष्टपणे सांगण्याची मुभा त्यांनी मला दिली होती. एखादी गोष्ट माझ्यामध्ये संक्रमित होईपर्यंत आठ-दहा दिवस ताईंनी वाट बघितलेली आहे. दहा वर्षे त्यांच्याकडे गाणं शिकताना रात्री बारा ते तीन या वेळेत आम्ही अभ्यास करायचो. चर्चा करायचो. या प्रचंड वाचनातून ‘स्वरार्थरमणी’ लिहायला घेतला. साधेपण त्यांनी कायम जपले. देवाची पूजा, अध्यात्म, नामस्मरण आणि संगीत हेच ताईंचे जग होते. व्यक्तिमत्त्वातला साधेपण त्यांनी संगीतात आणण्याचा  पुरेपूर प्रयत्न केला. मी काहीतरी वेगळे करते आहे, हे श्रोत्यांना जाणवायला नको. श्रोत्यांना डोळे उघडून पाहण्याची गरज भासणार नाही, इतके सादरीकरण सहज झाले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी दिली. संगीताच्या सन्मानासाठी ताई कायम शिस्तबद्ध जगल्या. राग-गायनातून भावार्थ सौंदर्याची अभिव्यक्ती झाली पाहिजे आणि त्यातून चैतन्याची निर्मिती होऊन ती श्रोत्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. चैतन्याची निर्मिती होणे हे रागगायनाचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे ताई नेहमी सांगत. ही चैतन्याची निर्मिती माझ्याकडून होत राहील यासाठी मी कायम प्रयत्न करेन.

किशोरीताई राघवेंद्रस्वामींना खूप मानत. गायन सादर करताना श्रोत्यांमध्ये त्या राघवेंद्रस्वामींना पाहत. ज्या श्रोत्यांसाठी आयुष्यभर किशोरीताई गायल्या, ते मात्र ताईंच्या अखेरच्या प्रवासात सोबत नव्हते. ‘माझ्या देहावर कुणी प्रेम करत नाही. माझ्या ज्ञानावर आणि गाण्यावर लोक प्रेम करतात. हे जेव्हा थांबेल, तेव्हा कोण किशोरी आमोणकर, असा प्रश्न उपस्थित होईल..’ असे ताई नेहमी म्हणत. त्यांच्या अखेरच्या प्रवासात तसेच घडले.

नंदिनी बेडेकर