हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकीत ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

बघता बघता आपल्या जगण्याची पद्धत कशी बदलून जाते नाही? विविध उत्पादनांचा आपल्याशी ऋणानुबंध पूर्वीपासून होताच.. पण विशिष्ट ब्रॅण्ड, त्यासाठीची क्रेझ, त्या ब्रॅण्डशी जडलेलं नातं गेल्या काही दशकात अधिकच दृढ होत गेलेलं दिसतं. कोणताही उद्योग निर्माण झाल्या क्षणी यशाची शिखरं गाठत नाही, पण त्या शिखराकडे नेणारा प्रत्येक टप्पा महत्त्वाचा असतो. कोणता व्यवसाय किती मोठी उंची गाठणार याचं रहस्य त्याच्या निर्मितीच्या मुळात दडलेलं असतं. ही मूळं पक्की असली की कोणत्याही स्पर्धेला तोंड देता येतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेतलं भारताचं खणखणीत नाणं..लॅक्मे.

Military persecution in Jammu and Kashmir will stop but policy will change
जम्मू-काश्मीरमधला लष्करी छळ थांबेल, पण धोरण बदलेल?
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

या नावाच्या उच्चारासह अगणित रंगांच्या चकचकीत, ग्लॉसी, मॅट रंगछटा डोळ्यांसमोर फेर धरू लागतात. लॅक्मे म्हणजे सुंदरता, लॅक्मे म्हणजे स्टाइल ही समीकरणं आपोआप जुळू लागतात. हे सारं काही परदेशातून उसनं आणलेलं नव्हे तर या मातीतलं यावर विश्वासही बसत नाही. सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेतलं एक विश्वासू नाव ठरलेल्या लॅक्मेची कहाणी तितकीच सुंदर आहे. भारतीय स्त्रीला सौंदर्यप्रसाधनं नवखी कधीच नव्हती. मात्र त्यात फॅशनपेक्षा परंपरेचा भाग अधिक होता. ब्रिटिश आले आणि या पारंपरिक शृंगाराला मेकअपचा आधुनिक टच मिळाला. घरगुती थाटाची सौंदर्यप्रसाधनं वापरणाऱ्या महिलांना चेहऱ्याला सुंदर करण्याचं, रेखाटण्याचं नवं साधन मिळालं. मात्र ही सारी सौंदर्यप्रसाधनं परदेशी होती. विशेषकरून उच्चभ्रू स्त्रीवर्ग अशा परदेशी सौंदर्यप्रसाधनांना प्राधान्य देत होता.

भारत पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला पण परदेशी सौंदर्यप्रसाधनांचे जाळे कायम होते. अनेक उच्चभ्रू स्त्रियांकडून या निमित्ताने होणारी खरेदी परकीय चलनाला हातभार लावत आहे हे पाहून भारताचे माजी पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी सुप्रसिद्ध उद्योगपती जेआरडी टाटा यांना भारतीय सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीसाठी काही करता येईल का, अशी विनंती केली. सन १९५२ चा हा काळ म्हणजे भारत देश प्रत्येक बाबतीत स्वावलंबी होण्याच्या प्रयत्नांचा काळ. तेव्हा जेआरडी टाटांनी हे आव्हान स्वीकारलं. पूर्णपणे भारतीय अशा सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती सुरू झाली. टाटा ऑईल मिलच्या शंभर टक्के सबसिडीवर निर्माण हे उत्पादन म्हणजे लॅक्मे.

या उत्पादनाची संपूर्ण जबाबदारी सुरुवातीच्या काळात नवल टाटा यांच्या पत्नी सिमॉन टाटा यांनी स्वीकारली. त्या जन्माने फ्रेंच होत्या. भारतीय व पाश्चात्त्य दोन्ही सौंदर्यसंकल्पनांची त्यांना उत्तम जाण होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्या स्वित्र्झलड इथे वास्तव्यास होत्या. त्यामुळे पैशांचं मूल्य योग्य तऱ्हेने जाणत होत्या. परदेशी सौंदर्यप्रसाधनांच्या तुलनेत स्वस्त पण भारतीय सौंदर्याचा आब राखतील, अशी सर्वोत्तम उत्पादनं निर्माण करण्यात त्यांनी जातीने लक्ष घातलं. भारतीय स्त्रीच्या त्वचेचा पूर्ण विचार करून लॅक्मे बाजारात उतरलं.

कोणतंही उत्पादन बाजारात आणताना नावाचा मुद्दा अगदी महत्त्वाचा असतो. ब्रिटिश काळात एक ऑपेरा खूप गाजत होता. ही एक १९व्या शतकाच्या उत्तरार्धातील कहाणी होती. िहदूंवर ब्रिटिशांनी केलेली धर्मसक्ती हा त्या ऑपेराचा विषय होता. या ऑपेराची नायिका होती ‘लॅक्मे’ आणि तिच्याच नावाने हा ऑपेरा सादर होत होता. लॅक्मे म्हणजे िहदू देवता लक्ष्मीच्या नावाचं फ्रेंचरूप. लक्ष्मी म्हणजे संपत्ती, सौंदर्याची देवता. सौंदर्य उत्पादनासाठी हे नाव अगदी योग्य होतं, पण परदेशी सौंदर्यप्रसाधनं विकत घेणारा स्त्रीवर्ग लक्ष्मी काजळ किंवा लक्ष्मी लिपस्टिकला कितीसं जवळ करेल हा प्रश्नच होता. त्यामुळे या ग्राहकवर्गाला आकर्षित करण्यासाठी ‘लक्ष्मी’ऐवजी निवड झाली ‘लॅक्मे’ या नावाची.

आज भारतासह परदेशात लॅक्मे हे एक नामांकित उत्पादन आहे. २०१४ साली झालेल्या पाहणीत भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह उत्पादनांत लॅक्मे ३६व्या क्रमांकावर होतं. १९९६ साली टाटा समूहाकडून हिंदुस्थान युनिलीव्हरने लॅक्मे विकत घेतली. भारतातील सौंदर्यप्रसाधनांची एकूण उलाढाल आहे ११०० कोटी. त्यातला ३५ टक्के वाटा निव्वळ लॅक्मेचा आहे.

लॅक्मेच्या यशाचं रहस्य काय? याचा विचार करताना वाटतं की या उत्पादनाला स्त्रीचं मन थोडबहुत कळलं असावं. केवळ छाप पाडण्यासाठी ४ ‘You know I use nothing but foreign products असं म्हणणाऱ्या स्त्रीपेक्षा लॅक्मेने पांढरपेशी स्त्री डोळ्यांसमोर ठेवली. स्त्रीला सुंदर दिसावंसं वाटतंच, पण त्याच वेळी तिच्या पाकिटातील पैशांचा ताळमेळही तिला हवा असतो. हे गणित लॅक्मेने समजून-उमजून आपली उत्पादनं आणली आणि बाकीचा इतिहास तुम्ही जाणताच.

viva@expressindia.com