अ‍ॅमेझॉनसह तर इतर भारतीय ऑनलाइन फॅशन ब्रँड्सनी आपले कॉलेजवेअर कलेक्शन बाजारात आणले आहेत. त्यामुळे कोणतीही वेबसाइट उघडली की नव्या डिझायनरचे ट्रेंड्स पाहायला मिळतात. त्यातही या सीझनमध्ये ऑनलाइन बाजारात स्पर्धा वाढली असल्याने युनिसेक्स फॅ शनचे पर्याय जास्त उपलब्ध केलेले पाहायला मिळतायेत. तुमचा कॉलेजमधला या वर्षीचा लुक निश्चित करण्यासाठी या कॉलेजवेअर फॅशनचा आणि सवलतींचा नक्कीच फायदा करून घेता येईल..

गायत्री हसबनीस

उन्हाळ्याची कडक सुट्टी संपली आहे आणि आता पावसाची जोरदार सुरुवात झालीये. जून महिना सुरू झाला आहे, कॉलेजचे पहिलेवहिले दिवसही उलटले आहेत. त्यामुळे सुट्टीत सामसूम असणारा कॉलेज कट्टा आता भरू लागलाय. कॉलेजच्या गँगमध्ये फ्रेश आणि आकर्षक दिसण्यासाठी कपडय़ांची खरेदीही प्रत्येकाने केली असणार यात शंका नाही, मात्र त्यांना अजूनही खरेदीची लालूच दाखवण्यासाठी फॅ शनच्या ऑनलाइन बाजाराने चांगलीच कंबर कसली आहे. पावसाळा असल्याने कॉलेजमध्ये कोणते रंग ट्रेंडमध्ये असतील? तर सध्या या साइट्सवर मुलांसाठी आणि मुलींसाठी खास पिंक कलर, येल्लो, स्काय ब्लू, नारंगी, इंडिगो, ग्रे, खादी कलर ट्रेंडमध्ये आहेत. काळा रंगही ट्रेंडमध्ये असून तो सोडल्यास भडक रंगांना फारसा वाव दिसून येत नाही आहे. फिकट रंग ट्रेंडमध्ये आहेत याचे कारण अमेरिकन ई-कॉमर्स वेबसाइटवरचे बरेच कॉलेजवेअर कलेक्शन हे भारतीय ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध झाले आहेत.

अजूनही परदेशात समर कलेक्शनमधील रंग ट्रेंडमध्ये आहेत. अमेरिकेत जून महिनाही उन्हाळ्याचा ठरतो म्हणून आणि तिकडच्या बँॅडना स्पर्धा या दोन्ही उद्देशाने आपल्याकडील मार्केटमध्येदेखील फिकट रंगांचे कपडे पाहायला मिळतायेत ज्यात कॉलेजवेअर मोठय़ा प्रमाणावर आहेत. नुकतेच अ‍ॅमेझॉनने जगभर कॉलेज वेअर कलेक्शन लाँच केले आहे. त्याची जाहिरातही मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली. त्यामुळे सध्या अ‍ॅमेझॉन या वेबसाइटवर गेलात तर कॉलेजमध्ये परिधान करण्यासाठी भरपूर विविध अ‍ॅक्सेसरीज, कपडे, बॅग्ज आणि चपलांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. साधारण मे महिन्याच्या शेवटी हे कलेक्शन आलेलं असून ते जूलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत असणार आहे. त्यामुळे त्यावर तुटून पडण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. नुसतेच अ‍ॅमेझॉन नाही तर इतर भारतीय फॅशन ब्रँड्सनी आपले कॉलेजवेअर कलेक्शन बाजारात आणले आहेत. त्यामुळे कोणतीही वेबसाइट उघडली की नव्या डिझायनरचे ट्रेंड्स पाहायला मिळतात. त्यातही या सीझनमध्ये ऑनलाइन बाजारात स्पर्धा वाढली असल्याने युनिसेक्स फॅ शनचे पर्याय जास्त उपलब्ध केलेले पाहायला मिळतायेत. तुमचा कॉलेजमधला या वर्षीचा लुक निश्चित करण्यासाठी या कॉलेजवेअर फॅ शनचा आणि सवलतींचा नक्कीच फायदा करून घेता येईल..

युनिसेक्स

कॉलेजमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी यंदा भरपूर पर्याय उपलब्ध असले तरी युनिसेक्स फॅशनवर या सीझनमध्ये जास्त भर देण्यात आला आहे. या वेळी बाजारात युनिसेक्स फॅशनचे शूज आणले आहेत. कॉलेजवेअरमध्ये काही वेस्टर्न ट्राय करायचे असेल तर जगप्रसिद्ध असलेल्या ‘कन्वर्स’ या अमेरिकी ब्रँडतर्फे अ‍ॅमेझॉनने त्यांच्या नव्या कलेक्शनमध्ये या ब्रँडचे शूजही आणले आहेत. मायली सायरस सध्या या ब्रॅन्डचा चेहरा आहे. ‘कन्वर्सएक्समायली’ या नावाने तिने नवीन कलेक्शनही काढले आहे. त्यात कॅनव्हासचे शूज ट्रेंडी आहेत. या वर्षांतली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘फिफा वर्ल्डकप’. त्यामुळे फक्त मुलांमध्येच नाही तर मुलींमध्येही त्यांच्या शूज, ट्राऊजर्स तसेच टी-शर्टच्या फॅशनची पॉप्युलॅरिटी व क्रेझ नसेल कशी? ती आहेच व ती भारतात जास्त आहे हे लक्षात घेऊ न ‘मिंत्रा’ने खास खरेदीसाठी ‘फिफा मेनिया’ या कलेक्शनअंतर्गत टी-शर्ट, झीपर, बूट उपलब्ध कसे आहेत. इथेही परत युनिसेक्स फॅशनमध्ये फुटबॉल शूज आणले आहेत त्यात गडद नारंगी रंग ट्रेंडमध्ये आहे. तसेच विविध बॅग्जचे कलेक्शनही आले आहे. ‘आदिदास’ आणि ‘नाईकी’च्या बॅग्ज कॉलेजवेअरसाठी नक्कीच ट्राय करता येतील. ‘फिफा वर्ल्डकप’ची लोकप्रियता प्रचंड असल्याने कॉलेजमध्ये मिरवण्यासाठी आपल्या आवडत्या टीमच्या डिझाइनचे टी-शर्ट खरेदी करू शकता. यंदाची ही फॅशन कॉलेजमध्ये सर्वात टॉपलिस्टमध्ये नक्कीच असेल यात काहीच शंका नाही.

मुलींसाठी

यंदा अ‍ॅमेझॉनने फिकट रंग, न्यूड रंगांच्या हिल्स आणि फ्लॅट चपलांमध्ये भरपूर विविधता आणली आहे. मुलींसाठीही विविध पर्याय उपलब्ध आहेत. युथ फॅशनमध्ये मुलींना आवड असते डेनिम किंवा जीन्सची. पण त्याव्यतिरिक्त हॅरम पँट, थ्रीफोर्थ, केपरी, लेगिंग्ज, जॉगर्स, पटियाला, कुलोट्स असे पर्यायही आहेत. विशेष करून कॉलेजमध्ये वापरताना आरामदायक म्हणून योग्य ठरतील. त्याचप्रमाणे ट्राऊ झर्सवरती फंकी रंगाचे टी-शर्ट, कुर्ते, टॉप्स, जॅकेट्स वापरू शकता. देसी लुक म्हणून ‘ग्लोबल देसी’चे काही हटके पर्यायही उपलब्ध आहेत. कॉलेजमध्ये क्वर्की तसेच ट्रॅडिशनल दिसण्यासाठी उपयोग होऊ  शकतो. ज्यात मंडेला, एम्ब्रोयडरी, प्रिंटेड कुर्ते, ट्रॅडिशनल ट्राऊ झर, ए-लाइन टॉप्सही आहेत. ब्लॅक रंग यंदा ट्रेंडमध्ये आहे व डूडलिंगपेक्षा ‘मंडेला आर्ट’ या आर्टिफिशियल डिझायनर कपडय़ांना सध्या मार्केटमध्ये मागणी असेल. वनपीसमध्ये लाइनर, चेक्स, प्रिंटेड डिझाइनचा पर्याय आहे. सिंपल टॉपमध्ये वुवन, कॉटन, पॉलिस्टर आणि रेयॉन फॅब्रिकचे कलेक्शन आहेत. एम्ब्रोयडरी असलेले टॉप्स, टास्सेल, टय़ूलिप्सही कलेक्शनमध्ये आले आहेत. अ‍ॅक्सेसरीजमध्येही ‘बॅगीट’च्या काही वनसाइड लुक बॅग्ज वापरता येतील. त्यातही मस्टर्ड कलर, पिवळा आणि ऑफ व्हाइट व नारंगी रंग ट्रेंडमध्ये येतोय. या वेळेसही इयरिंग्ज मध्येही  वेगवेगळे स्लोगन, नेमेमिंग असलेले हटके कानातले कॉलेजमध्ये हमखास वापरता येतील.

मुलांची फॅशन

अ‍ॅमेझॉनचे स्निकर्स आणि लेदर शूज तेही पावसाळ्यात खास सिंथेटिक फॅब्रिकचे ट्रेंडमध्ये आहेत. प्युमा या ब्रँडनेसुद्धा कॉलेजवेअरसाठी स्निकर्स शूज आणलेत. ‘शॉपर्स स्टॉप’वरही सिंथेटिक आणि लेदरचे स्लिपॉन लोफर्स उपलब्ध असून त्यात न्यूड रंगाला जास्त महत्त्व दिलं गेलंय. ‘फॉरेवर ट्वेन्टीवन’नेदेखील मुलांसाठी फ्लोरल प्रिंटचे टॉप्स आणले आहेत. ‘मिंत्रा’च्या टीशर्टमध्ये मुलांसाठी ग्राफिक्स पॅटर्नचे टी-शर्ट्स आहेत त्यात पोलो आणि राऊं ड नेक टी-शर्ट ट्रेंडमध्ये आहेत. डिजिटल ग्राफिक्ससोबत बाईकर लोगो, ह्यूमर लोगो आणि वर्सिटी लोगो अशा आणि विविध टायपोमधील प्रिंटेड टी-शर्ट्स ट्रेंडमध्ये आहेत. त्यातही नारंगी रंग ट्रेंडमध्ये दिसून आला आहे. या वेळीही ‘स्टार वॉर’ या सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे सुपरहिरोच्या डिझायनर पर्यायांपैकी ‘स्टार वॉर’च्या हिरोजचे टी-शर्ट ट्रेंडमध्ये आहेत. ‘डेडपूल’ हाही तितकाच लोकप्रिय चित्रपट ठरला असल्याने पॉप्युलॅरिटीनुसार युथ कल्चरमध्ये तसे कलेक्शनही आणले आहेत. बीइंग ह्युमन, यूएस पोलो असोसिएशन या दोन्ही लोकप्रिय ब्रँडचेदेखील टी-शर्ट मुलांसाठी आणले आहेत. त्याचबरोबरीने फ्लोरल प्रिंटचे शॉर्ट्सही आहेत ज्यात फंकी रंगांसोबत मल्टिकलर स्ट्राइपचे, चेक्सचे आणि पॉलका डॉट्सचे डिझायनर पर्याय उपलब्ध आहेत. यातसुद्धा ऑरेंज कलर ट्रेंडी आहे.

viva@expressindia.com