खाण्याकडे लक्षपूर्वक ‘बघणं’ आवश्यक. बाहेरच्या तयार पदार्थाबाबत तर हे आवर्जून करायला हवं. त्यावर लिहिलेल्या न्यूट्रिशनल फॅक्ट्स कशा वाचायच्या, हे आपण गेल्या लेखातून समजून घेतलं. सध्याच्या नवीन ट्रेण्डनुसार रोजच्या आहारापेक्षा वेगळं डाएट असलं तरच आपलं वजन कमी होईल अशी कल्पना दृढ आहे. मुळात वजन कमी करण्यासाठीसुद्धा खावं लागतं ही संकल्पना आपल्याकडे अजूनही नाही. त्यामुळे आपल्याकडे मिल रिप्लेसर, प्रोटीन पावडर, फॅट बर्नरवरती लगेच विश्वास बसतो. आपल्याकडे असलेल्या पदार्थाचा योग्य वापर केल्यास रोजच्या जेवणाला डाएट फूड करणं अवघड नाही. वजन कमी करण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी आहारतज्ज्ञाच्या मदतीने यात बदल करून ध्येय साध्य करता येईल.

नेहमीच्या आहाराचं पोषणमूल्य कसं वाढवता येईल याचा विचार करणाऱ्यांसाठी काही टिप्स देत आहे. रोज सकाळचा नाश्ता कसा असायला हवा, रोज डब्यात काय नेणार, मधल्या वेळेला काय खायचं असे प्रश्न हेल्थ कॉन्शस तरुणाईला हमखास पडतात.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

डबा नेणाऱ्यांसाठी आमटी, भाजी, पोळी, भात, कोशिंबीर असा चौरस आहार नेणं शक्य होईलच असं नाही. त्यांचा डबा आटोपशीर पण पौष्टिक कसा बनेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करते आहे. उदाहरणादाखल एका सॅलडची रेसिपीसुद्धा देते. ही अक्षरश फाइव्ह मिनिट रेसिपी असून दररोजच्या धावपळीत चार पदार्थ कसे जमणार असं वाटणाऱ्यांसाठी.. अगदी कुणालाही करता येईल अशी ही साधी सोपी पण पौष्टिक कृती आहे.

बीट सॅलड

बिटाची सालं काढून जाडसर किसून घ्या. त्यामध्ये बिनासायीचं घट्ट दही घाला. चिमूटभर मीठ, आवडत असल्यास मीरपूड आणि चाट मसाला घालून चांगलं मिक्स करा. भरपूर कोथिंबीर घातली की, हेल्दी बीट सॅलड तयार.

रोजचा आहार सकस कसा होईल?

  • ब्रेकफस्ट : भाज्यांचे थालीपीठ, धिरडे,
  • घावन – चटणीऐवजी दह्य़ाबरोबर खाणे.
  • कॉर्न फ्लेक्सऐवजी व्हीट फ्लेक्स/ ओट्स फ्लेक्स – दूध आणि एखादं फळ खाणे.
  • पोहे, उपमा किंवा दलिया वेगवेगळ्या भाज्या घालून करणे. त्याबरोबर दही किंवा नाष्टा झाल्यावर एक छोटा कप दूध किंवा एक उकडलेल्या अंडय़ाचा पांढरा भाग घेतला तरी चालेल.

हेल्दी टिफिन

  • पोळीबरोबर भाजी आणि सॅलड न्यायलाच हवं.
  • भाजी किंवा उसळ करताना खोबऱ्याच्या / शेंगदाण्याच्या वाटणाऐवजी टोमॅटो-कांदा वाटण करून घाला.
  • फळभाजी किंवा पालेभाजी करताना सोबत डाळींचा वापर करावा.

डाएट स्नॅक्स

मधल्या वेळचं खाणं हा मोठा प्रश्न. त्यासाठी टिप्स

  • वेगवेगळ्या प्रकारच्या लाह्य़ांचा चिवडा किंवा भडंग
  • उकडलेल्या भाज्यांचे किंवा कडधान्यांचे सॅलड/ स्प्राउट्स भेळ
  • खाकरा किंवा थेपला
  • एखादं फळ किंवा फ्रूट प्लेट
  • फुटाणे, मुरमुरे इत्यादी
  • ताक किंवा सोयामिल्क (प्लेन)
  • उकडलेलं अंडं (एग व्हाइट)किंवा टोफू
  • भाज्यांचं किंवा कडधान्यांचं सूप
  • भाज्यांची स्मूदी

viva@expressindia.com