केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी सेवेत दाखल होण्याचं स्वप्न अनेक विद्यार्थी बघत असतात. प्रशासकीय आणि पोलीस दलातील पदांविषयी माहिती असते तितकी माहिती परराष्ट्र सेवेतील पदांविषयी मात्र नसते. ही माहिती मिळेल या दृष्टीनेच ‘आयएफएस’ अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांच्याशी संवाद साधायला अशा विद्यार्थ्यांची गर्दी मोठय़ा प्रमाणात जमली होती. परराष्ट्र सेवेतील त्यांचे अनुभव या कार्यक्रमातून उलगडलेच पण परराष्ट्र धोरण कसं ठरतं यापासून ते काश्मीर प्रश्न सुटणार का आणि डोनाल्ड ट्रम्प आल्यामुळे काय परिणाम होणार असे अनेक प्रश्नही या चर्चेत आले. काही प्रश्नांना मुत्सद्दीपणाने बगल देत तर काही प्रश्नांना दिलखुलासपणे भिडत डॉ. स्वाती यांनी दिलेली उत्तरं उपस्थितांना भावली. अनेक विद्यार्थ्यांना या संवादातून स्पर्धा परीक्षेसाठी नवी प्रेरणा सापडली. काहींच्या मनात परराष्ट्र सेवेचं नवं स्वप्न रुजलं. काहींना नवी दिशा सापडली. यातील काही निवडक प्रतिक्रिया..

मुंबईत असल्याचा फायदा

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Love Jihad, pune, Pune University
‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

मी ‘लोकसत्ता’चा नियमित वाचक आहे आणि त्यातील व्हिवा लाऊंज माझं विशेष आवडतं आहे. मी ‘यूपीएससी’चा अभ्यास करत असल्याने त्यातही मला ‘लोकसत्ता’मुळे खूप फायदा होतो. मी साताऱ्याहून स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेसाठी मुंबईत आलो होतो आणि त्याचदरम्यान एका आयएफएस ऑफिसरची मुलाखत ऐकायची ही संधी मिळाली. मुंबईत असल्याचा फायदा झाला. अभ्यासाची प्रेरणा मिळाली.

  • आशीष खरात (सातारा)

प्रेरणादायी संवाद

मी पहिल्यांदाच ‘लोकसत्ता’ व्हिवा लाउंजच्या कार्यक्रमाला आले आणि हा कार्यक्रम मला खूपच आवडला. मलाही आयएफएस ऑफिसर व्हायची इच्छा आहे. म्हणून मी मुद्दाम या कार्यक्रमाला आले. डॉ. स्वाती कुलकर्णी यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली. त्यांनी सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तरं अगदी मनमोकळेपणाने दिली. हा संवाद कायम लक्षात राहील.

  • जान्हवी वाघ

अशाच अधिकाऱ्यांना ऐकायला आवडेल

मी सी.एच.एम., उल्हासनगर कॉलेजमध्ये बी.ए.च्या पहिल्या वर्षांला आहे. मला आय.ए.एस. ऑफिसर व्हायचंय आणि आजचं मार्गदर्शन मला अभ्यासासाठी आणि त्यापुढच्या वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल. यूपीएससीचं ध्येय समोर ठेवून अभ्यास करणाऱ्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना डॉ. स्वाती यांच्यासारख्या अधिकाऱ्यांशी संवाद साधता येणं प्रेरणा देणारं असतं. अशा आणखी अधिकाऱ्यांना बोलावलंत खूप आवडेल.

  • धनश्री ढोमसे

परराष्ट्र सेवेत रुजू होण्यासाठी अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली

मी कार्यक्रमासाठी बदलापूरहून आलो. बी.ए.च्या पहिल्या वर्षांला आहे. मला यूपीएससीबद्दल या कार्यक्रमाच्या आधी काहीच कल्पना नव्हती. परराष्ट्र सेवांमधील करिअरचा विचारदेखील नव्हता. मात्र आज इथे डॉ. स्वाती यांची मुलाखत ऐकून मला प्रेरणा तर मिळालीच आहे आणि एक नवी दिशादेखील सापडली आहे. आता मीदेखील अभ्यास सुरू करणार आणि भारतीय सेवांमध्ये दाखल व्हायचं लक्ष्य ठेवणार.

  • समीर अटकाळे

नव्या स्वप्नाची रुजवात

मी इथे येण्याच्या आधीपासूनच यूपीएससी परीक्षेचा विचार करत होते. मात्र अनेक शंका होत्या. या अभ्यासबद्दल एक दडपण होतं. भीती होती. अधिकाऱ्याचं लाइफ नेमकं काय असतं, किती कठीण असतं असेही अनेक प्रश्न होते. आज डॉ. स्वाती कुलकर्णी यांचे अनुभव ऐकून आता डोळ्यात एक नव्या स्वप्नाची रुजवात झाली आहे. मला त्यांच्यासारखं आय.एफ.एस. ऑफिसर व्हायचं आहे त्यामुळे आता मी त्यादृष्टीने प्रयत्न करणार आहे.

  • शरयू केळकर

अनुभव मनाला भिडले.

मी पूर्वी ‘यूपीएससी’चा अभ्यास करत होतो. सध्या मी त्या क्षेत्राचा करिअरच्या दृष्टीने विचार करत नसलो तरी आजची मुलाखत मला विशेष आवडली. डॉ. कुलकर्णी यांनी सांगितलेले प्रसंग आणि अनुभव मला मनाला भिडले. मला एकंदरीत व्हिवा लाउंजची संकल्पना फार आवडते. कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांना बोलावून त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळतंच, शिवाय या व्यक्तींशी संवाद साधता येतो. ही या कार्यक्रमाची जमेची बाजू आहे.

  • श्रेयस खटाव

आत्मविश्वास वाढून दिशा मिळाली

मी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी (मास्टर्स) घेतली आहे आणि आता स्पर्धा परीक्षा देऊन या क्षेत्रात जाण्याची माझी इच्छा आहे. कार्यक्रमाला येण्यापूर्वी परराष्ट्र सेवेतील पदांविषयी माझ्या मनात अनेक प्रश्न होते. शंका होत्या. डॉ. कुलकर्णी यांची मुलाखत ऐकून एक प्रकारचा आत्मविश्वास तर निर्माण झाला आहे. आता यूपीएससीसाठी जोमाने प्रयत्न करेन आणि परीक्षा देईन.

  • स्नेहा बुवा

दृष्टिकोन घडवायला मदत

मी बारावीत आहे आणि माझ्या ग्रॅज्युएशननंतर मलाही यूपीएससी देऊन एक आयएफएस ऑफिसर व्हायचंय. मी अजून अभ्यासाला सुरुवात केली नाहीए. मात्र आज मिळालेलं मार्गदर्शन या करिअरकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन घडवायला मदत करणारं होतं. परराष्ट्र सेवेतील करिअरमधल्या वाटा, वाटेत येणारे अडथळे, अधिकारकक्षा, त्याचे परिणाम या सगळ्या गोष्टी मला माझ्या वाटचालीत नक्कीच मदत करतील. मी अभ्यास इतक्यात सुरू केला नसला तरी अभ्यासाला आणि जीवनाला वळण द्यायला या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतील अशी मला खात्री आहे.

  • चताली लागू

शंकांचं निरसन

कार्यक्रम युवा पिढीसाठी खूपच माहितीपूर्ण होता. एका आयएफएस अधिकाऱ्याशी थेट संवाद साधायची संधी मिळाली. त्यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. परराष्ट्र सेवेतील पदांबद्दल मनात असलेल्या शंकांचं निरसन झालं. ‘लोकसत्ता’ने अशी संधी उपलब्ध करून दिली यासाठी आभार

  • उर्वी अभ्यंकर

देशोदेशीचे अनुभव माहितीपूर्ण

कार्यक्रमासंबंधी बातमी वाचल्यानंतर  ही दुर्मिळ संधी साधायची हे ठरवलं होतं. डॉ. स्वाती कुलकर्णी यांचे वेगवेगळ्या देशांतील अनुभव ऐकायला मिळाले. एका आयएफएस अधिकाऱ्याचे काम कसे चालते ही माहिती मिळाली जी कोणत्याच पुस्तकात किंवा इतर कुठे मिळाली नसती. घरात परराष्ट्र सेवेतील अधिकारी कुणी नाही, तसे कोणतेही वातावरण नसताना त्या एमबीबीएस पदवी मिळवल्यानंतर आयएफएस अधिकारी झाल्या ही खूप मोठी गोष्ट आहे.

  • जुईली घाडगे

viva@expressindia.com

(((    छाया – प्राची परांजपे    )))