दागिने तिलाही आवडायचे चारचौघींप्रमाणं, पण त्यातलं वेगळेपण तिला खुणावायचं. चांदीच्या दागिन्यांवर तिचा जीव.. आणि दागिन्यांच्या आकारावर भारी प्रेम. त्यातूनच मग झाला मोहाचा जन्म. अनेकींना मोहात पाडणारी ही कल्लाकार आहे गीतांजली.

एके काळी एखाद्या प्रदर्शनातल्या स्टॉलवर चांदी किंवा ऑक्सिडाइज्ड दागिने बघायला सुरुवात केल्यावर सोबत असणारे चिडवायचे – हे काय आदिवासींसारखं.. मग तो दागिना डोळे भरून पाहून हताशपणं तिथंच ठेवला जायचा. काळासोबत मनं नि मतं पालटली तशी चांदी आणि आदिवासी संस्कृतीच्या जवळ जाणाऱ्या डिझाइन्सच्या दागिन्यांना मागणी वाढली. ती आजून वाढतेच आहे. दागिन्यांबाबतचा मतप्रवाह बदलण्यात एका ब्रॅण्डच्या चांदीच्या दागिन्यांचा बऱ्यापैकी मोठा वाटा आहे. हा ब्रॅण्ड आहे ‘मोहा बाय गीतांजली’ आणि त्याची कर्तीधर्ती आहे गीतांजली गोंधळे!

In Nagpur tweezers are used to prevent the baby from falling asleep during the day
धक्कादायक! बाळाला दिवसा झोप येऊ नये म्हणून काढायची चिमटे…
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

गीतांजलीला लहानपणापासून दागिन्यांची आवड. त्यातही चांदीचे दागिने तिला अधिक प्रिय. ती स्वत: ग्राफिक डिझायनर. तिला दागिन्यांच्या डिझाईन्समध्ये रस वाटे. पण तिच्या मनासारखे चांगले चांदीचे दागिने कुठंच मिळायचे नाहीत. टिपिकल डिझाईन्स असायची.. तीच ती. काहीच चांगलं मिळत नव्हतं. मग तिची चिडचिड व्हायची. यातून तिला गवसली सर्जनाची वाट आणि जन्म झाला मोहा ज्युलरीचा. गीतांजली सांगते की, ‘मी जॉब सोडल्यावर विचार करून ठरवलं की, मला ज्युलरी घडवायचीच आहे. मोहाच्या नावामागं होते सुस्पष्ट विचार. ज्युलरी म्हणजे मोह.. अर्थात दागिन्यांचा मोह असतोच. म्हणून ते ‘मोहा’ झालं. शिवाय ‘मोह’ म्हणजे डिझायर. माझ्या दागिन्यांच्या डिझाईनमध्ये बऱ्याच अंशी प्रेरणा आदिवासी जीवनशैली त्यातील डिझाईन्सच्या असतात. आदिवासींचा कल्पवृक्ष हा मोहाचं झाड आहे. हे नाव दागिन्यांनासाठी सुयोग्य आहे आणि मला स्वत:ला आदिवासी आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल कुतूहल आहे. त्यांची मोटिफ्स आवडतात. म्हणून ‘मोहा’ नावावर शिक्कामोर्तब झालं.’

आपल्याकडं सोन्याच्या दागिन्यांची परंपरा आहे. मात्र सोन्याएवढं ग्लॅमर चांदीला नाही. चांदीचे दागिने महाराष्ट्र आणि देशभरातील आदिवासी जाती-जमातींत वापरले जातात, हे आपल्याला माहिती नसतं. त्यांची डिझाईन्स विलक्षण सुंदर आहेत. ती सांगते की, ‘दागिने घडवताना फॉर्म आणि फंक्शनचा विचार केला जातो. त्याचं डिझाईन विचारात घेतलं जातं. एक फॉर्म घेऊन त्याचं फंक्शन लक्षात घेऊन त्यातून डिझाईन घडवलं जातं. काही एलिमेंट्सवर अधिक संशोधन करून डिझाइन घडवावं लागतं. उदाहरणार्थ- आम्ही गोव्याच्या ज्युलरी कलेक्शनसाठी संशोधन करून, ग्रंथालयांतून संदर्भ घेऊन डिझाईन केलं होतं. पुढं त्यातून प्रयोग होत होत ते फायनल होतात. त्यातल्या मोटिफची ड्रॉइंग बनतात. पुढं डिझाईन फायनल तयार झाल्यावर ज्युलरीसाठीचं ड्रॉइंग केलं जातं. त्यानंतर मोल्ड वगैरेची प्रोसेस होऊन ज्युलरी तयार होते.’

अलीकडं ‘मोहा’नं एक नथ लाँच केली. ही नथ आपल्या महाराष्ट्रीय पद्धतीच्या नथीचं पुनरुज्जीवन होतं. नथ हा नाकाच्या आकाराला सुंदर रीतीनं कॉम्प्लिमेंट करणारा दागिना आहे. पण ती स्पेशल फंक्शनखेरीज वापरता येत नाही. नथीचा खूप बारकाईनं विचार करून बरीच ड्रॉइंग्ज बनवली गेली. वेगवेगळ्या आकारांच्या नथींचे ट्रायल अ‍ॅण्ड एरर करत छोटीशी नथ तयार केली. खडय़ांऐवजी मीनाकारी केली, म्हणजे ते अतिचमकदार दिसणार नाही. रोजच्या कॉटन साडय़ांवर घालता येण्याजोगी नथ घडवली. ही नथ जीन्स-टॉपवरही घालता येईल. पहिल्याच दिवशी सगळ्या नथी विकल्या गेल्या होत्या. हा प्रतिसाद अनपेक्षित होता, असं गीतांजली सांगते.

प्रिया बापट, केतकी थत्ते, आदी सेलेब्रेटींना ‘मोहा’ची ज्युलरी आवडली आहे.  ‘मोहा’च्या अवघ्या दोन वर्षांच्या प्रवासात लक्षात राहण्याजोगे अनेक ‘चंदेरी’ किस्से घडलेत. गीतांजली सांगते की, ‘एक क्लाएंट केवळ ३-४ तासांसाठी भारतात येणार होती. तो वेळ तिनं ‘मोहाची ज्युलरी’ घेण्यासाठी खास राखून ठेवला होता. नाशिक, पुण्याहून लोक मुंबईत फक्त ज्युलरी घ्यायला येतात. नंतर दागिने घालून आठवणीनं फोटो पाठवतात. अनेकींचे पालक आमची ज्युलरी त्यांच्याकडं परदेशात पाठवतात. ज्युलरी आवडल्याचं अत्यानंदानं सांगणाऱ्यांचा चेहरा पाहून फार समाधान वाटतं. ’ कोणतीही जाहिरात न करता मोहाचं नाव कर्णोपकर्णी वाढत गेलं, असं गीतांजली सांगते. ब्लॉगर सायली राजाध्यक्ष ‘मोहा’ची ज्युलरी घेतात. सायली आधी माझी मैत्रीण नव्हती. तिला ज्युलरी आवडायला लागली . त्याचे  फोटो तिच्या वॉलवर, पेजवर ती शेअर करत राहिली, अशीच प्रसिद्धी वाढत राहिली.

गीतांजली डिझायनरच्या नजरेतून भोवतालच्या सगळ्या शेप्सकडं, एलिमेंट्सकडं फार उत्सुकतेनं बघते. त्यातून तिला वैविध्यपूर्ण कल्पना सुचतात. तिचं पहिलं एक-दीड र्वष मेकिंगमध्ये खूप ट्रायल अ‍ॅण्ड एरर करण्यात गेलं. त्यानंतर ती ज्युलरी, मोल्ड्स आणि दागिने घडवायला शिकली. ‘मोहा’चा ज्युलरी स्टुडिओ ठाण्यात असला तरीही मुंबई, कोलकत्ता, बंगलोर, वडोदरा, चेन्नई आदी ठिकाणी या ज्युलरीची प्रदर्शनं भरली आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाद्वारे नोज पिन्स, नथ, कानातले, बांगडय़ा, हातातली कडी, नेकपीस आदी दागिन्यांची कलेक्शन्स पाहता नि ऑर्डर करता येतात. या दागिन्यांत देव-देवतांच्या प्रतिकृतींचा आणि प्राणी-पक्ष्यांच्या प्रतिमांचा मोठय़ा खुबीनं वापर करण्यात आला आहे. दागिन्यांची डिझाईन्स विचारपूर्वक घडवण्यात आल्यानं ती आऊटडेटेड वाटत नाहीत.  संशोधन व वाचनाची आवड, निसर्गप्रेम, पारंपरिक कला आणि आदिवासींबद्दल वाटणारा जिव्हाळा यांच्या मिलाफातून आकारलेल्या ‘मोहा’चा सर्जक पसारा असाच विस्तारत राहो, या ‘चंदेरी’ शुभेच्छा.

वर्तमानाचं भान ठेवत, स्त्रिया आणि मुलींचा पेहराव लक्षात घेऊन त्याला सूट होणारी नि कम्फर्टेबल वाटणारी, त्यांना सोईची नि हवीहवीशी वाटणारी, त्यांच्या आयुष्याशी संलग्न होऊ  शकणारी वेअरेबल ज्युलरी घडवणं, ही खरी ज्युलरीआर्ट आहे

गीतांजली गोंधळे

viva@expressindia.com