ओंकार नार्वेकर

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

मला स्वत:ला क्रिकेट हा विषय आवडत असल्याने ‘डेमोक्रेसीस क’ या राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील ही ओळ मला विशेष आवडते. या पुस्तकात स्वातंत्र्योत्तर काळानंतरच्या टॉप ११ मान्यवर क्रिकेट खेळाडूंची माहिती आहे. खरंतर या पुस्तकात खेळासोबत त्याभोवती फिरणारी राजकीय व सामाजिक परिस्थितीही अधोरेखित केली आहे. क्रिकेटपटू राहुल द्रविड याला संबोधून हे वरचं वाक्य आहे. क्रिकेटर हा फक्त एक खेळाडूच नसून एक चांगला माणूस असतो. राहुल द्रविड हा उत्तम खेळाडू आहेच पण एवढी प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही त्याला लाइमलाइटमध्ये जगायला आवडत नाही. जिद्द, चिकाटी व ध्येय या तीन गोष्टींच्याच जोरावर तो पुढे आला आहे. या ओळीतून हेच सिद्ध होतं की आपण नेहमीच चांगलं नागरिक असण्याचा दाखला दिला पाहिजे, जरी तुम्ही खूप मोठे झालात तरीही मीपणा सोडून नेहमी दुसऱ्यांसाठी जगायला पाहिजे, फार कमी माणसं अशी असतात. या ओळीतून द्रविड तसा शांत आणि मृदू स्वभावाचा मेहनती खेळाडू आहे त्यामुळेच त्याला जगात आदर मिळतो आहे हे अधोरेखित केलं आहे. त्यामुळे नेहमी एक चांगला ‘माणूस’च खरा विश्वविजेता असतो. खेळातून आपण आपल्यासोबत आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत असतो, तेव्हा आपल्याला अख्खं जग एक खेळाडू म्हणूनच ओळखत असतं, पण जेव्हा आपण सदैव नि:स्वार्थीपणे फक्त देशासाठी, देशप्रेमासाठी खेळतो तेव्हाच आपल्याला जगात मान मिळतो म्हणूनच राहुल द्रविडवर लिहिलेलं या पुस्तकातील विशेष सदर, ही ओळ तसेच त्याला ‘जेंटलमन’ म्हणून दिलेली उपमा आवडते.