News Flash

हैं कोई जवाब?

सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं

सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

दोषी कोण?
सलमान खानची हिट अँण्ड रन प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आणि सोशल मीडियावर पोस्ट, ट्वीट्स आणि शेअरिंगचा मोठाच गदारोळ उडाला. ज्याला त्याला या प्रकरणावर आपलं मत नोंदवायचं होतं. न्यायालयाच्या या निर्णयावर नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली. काही चाहत्यांनी मात्र या निकालाचं स्वागतच केलं. #salmankhanwalksfree आणि #salamankhanverdict आदी हॅशटॅग टॉप ट्रेण्डमध्ये होते. मुख्यत्वे प्रश्न विचारला गेला तो ‘सलमानने नाही, त्याच्या ड्रायव्हरनं नाही, मग फुटपाथवर झोपलेल्यांना नक्की कुणी चिरडलं?’ हाच. हाच धागा पकडून आणि निकालाच्या दिवशीच असणाऱ्या ‘ह्य़ुमन राइट्स डे’चा संदर्भ लक्षात घेऊन मग अनेक कमेंट्चा मारा झाला. उदाहरणार्थ- ‘बिइंग ह्य़ुमन?’ ‘प्रेम रतन बिइंग ह्य़ुमन कहलायो’, ‘कारनंच ड्रिंक केलं असेल हो’, ‘के पैसा बोलता है’ अशी बोचरी टीका करण्यात आली. रवींद्र पाटीलबद्दलही बरंच काही लिहिलं गेलं. कुणी ‘ब्लॅक डे फॉर इंडियन ज्युडिशरी सिस्टीम’, कुणी ‘सलमान खानपर फैसला सुनाते आज जज बडे ‘जज’मेंटल हो गए थे’ असं उपरोधिक लिहिलं. शिवाय ‘भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल एक वाक्य आहे- शंभर दोषी सुटले तरी चालतील, पण कोणत्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये, सलमान खान हा त्या शंभरमधलाच एक आहे.’ किंवा `Finally we came to know. The car was drunk. किंवा Dawud is planning to come back to India as he has confirmed faith in Indian judiciary आणि ‘हरणाने आत्महत्या केली असा निर्णय उद्या कोर्टाने दिला तर आश्चर्य वाटायला नको’ किंवा ‘आज सलमानची निर्दोष सुटका झाली नसती तर लोकांचा पैशावरचा विश्वासच उडाला असता..!’ अशा कमेंट्स आणि कॅरिकेचर्स फॉरवर्ड होत होते. अशीच दोन नमूनेदार फॉरवर्ड्स :
कार काळजात घुसली
घेई मद्य, मकरंद, तर्र हा मिलिंद
कार सारथी नंद स्वच्छंद, हा धुंद
मिटता पब दार होई सारथी ‘दबंग’;
परि दिसेना, त्यास, निद्रिस्त पामरअंग.
केस मिटल्यावर सल्लू कोर्टाबाहेर आला. मीडियाने त्याला घेरले. त्याला बाहेर पडताच येईना.. मग त्याला एक आयडिया सुचली.. तो स्वत: ड्रायव्हर सीटवर बसला. ..एका मिनिटात सगळी गर्दी पळाली..

फोर्ब्ज टॉप १०० सेलेब्रिटीज
‘फोब्र्ज’च्या ‘टॉप १०० सेलेब्रिटी’च्या यादीत बॉलीवूड बादशाह अर्थात शाहरुख खाननं अव्वल स्थान पटकावलंय. भाईजान अर्थात सलमान खान दुसऱ्या आणि बिग बी अर्थात अमिताभ बच्चन तिसऱ्या स्थानावर आहेत. संगीतकार अजय- अतुल यांचंदेखील नाव या १०० जणांच्या यादीत आलंय. एखाद्या सेलेब्रिटीची ब्रॅण्ड व्हॅल्यू आणि त्याचं वर्षभरातलं उत्पन्न असे या स्थानांचे निकष लावण्यात आलेत. बहुतांश सेलेब्रिटींच्या मानांकनामध्ये त्यांच्या उत्पन्नाचा मोठा वाटा असला, तरीही काही जणांच्या मानांकनात उत्पन्नापेक्षा लोकप्रियता हा अधिक महत्त्वाचा निकष मानण्यात आलाय. त्यात रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, इशांत शर्मा, गौतम गंभीर, हनी सिंग, जॅकलिन फर्नाडिस, सनी लिऑनचा समावेश आहे.

W20
भारत आणि पाकिस्तानात होणाऱ्या क्रिकेट मालिकेचं भिजत घोंगडं पडलं असतानाच मार्चमधल्या आयसीसी टी२० वर्ल्ड कपमध्ये या टीम्स आमनेसामने असतील. भारत आणि पाकिस्तानचा एकाच गटात समावेश करण्यात आला असून या स्पर्धेचं यजमानपद भारताकडं आहे. या गटात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासह पात्रता फेरीतून दाखल होणारा देशही समाविष्ट होईल. त्यामुळं #WT20 हा हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये होता. गेल्या वर्ल्ड कपदरम्यान हिट ठरलेल्या ‘मौका मौका’च्या पाठोपाठ ‘करलो तैय्यारी’ हा प्रोमो तयार करण्यात आला असून तोही यूटय़ूबवर हिट ठरतोय.

यहां हूँ मैं..
यंगिस्तानचा एक लाडका हिरो आयुषमान खुरानाच्या यू टय़ुबवरील व्हिडीओला दहा लाखांहून अधिक व्ह्य़ूज मिळालेत. ‘यहां हूँ मैं..’ या व्हिडीओमध्ये आयुषमान आणि यामी गौतम ही जोडी असून हे गाणे स्वत: आयुषमाननेच गायलेय. अमित रॉय दिग्दर्शित या काहीशा मिस्टेरिअस व्हिडीओला आयुषमान आणि रोचक कोहलीचे संगीत आहे.

#सौदी अरेबिया
सौदी अरेबियात झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनी मतदान केल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुकीला उभ्या राहिलेल्या महिलांपैकी चारजणी विजयी झाल्या आहेत. स्त्री समतेच्या दिशेने टाकलेल्या या पहिल्या पावलामुळे आतापर्यंत निवडणूक प्रक्रियेत वगळल्या गेलेल्या महिलांना अल्पशा प्रतिनिधित्वाची संधी मिळालेय. सौदीमध्ये फक्त महापालिकेसाठीच मतदान घेण्यात येते. इतर ठिकाणी राजाने नियुक्त केलेले अधिकारी असतात. सौदीतील या मतदानाच्या वेगळेपणामुळे सोशल मीडियावर #सौदी अरेबिया हा हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये होता.

#14 years of K3G
‘के३जी’चा फुलफॉर्म माहिती नाही, अशी हिंदी चित्रपटवेडी व्यक्ती विरळाच असेल. त्यातही अमिताभ-जया बच्चन, शाहरूख खान -काजोल, हृतिक रोशन-करिना कपूर ही नावे एकत्र घेतल्यावर तरी ‘के३जी’चे कोडे तुम्हाला उलगडायला हवेच. जी हां, सही जवाब! के३जी म्हणजे कभी खुशी कभी गम हा चित्रपट आणि तो रिलीज होऊन होताहेत तब्बल १४ वर्षे. ‘के३जी’च्या फॅनफॉलोअर्सनी केलेल्या ट्वीट्समुळं हा टॉप ट्रेण्डिंगचा विषय ठरला होता. ‘हजारदा पाहूनही तितकाच बहारदार वाटणारा सिनेमा’, ‘माझ्या फेव्हरेट मूव्हीजपैकी एक’ ‘मोस्ट इमोशनल सीन्स’, ‘काजोल माझी फेव्हरेट’, ‘मॅजिक ऑफ हृतिक’, ‘एक बिग फॅमिलीड्रामा एण्टरटेन्मेंट’ अशा अनेक ट्वीट्सोणि ‘के३जी’मधली गाणी, सीन्स आणि अभिनेत्यांचे फोटोज अपलोड केले गेले.

वर्षसमाप्ती
डिसेंबरचा पंधरवडा संपलादेखील.. आता नेटकरांना वेध लागलेत ते ३१ डिसेंबरचे. त्यामुळे मग थोडेसे सेंटी थोडेसे मजेशीर मेसेजेस फॉरवर्ड न झाले तरच नवल. त्यातलाच हा एक- आज आपण वर्षांच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत.. कळत-नकळत २०१५ मध्ये जर का मी तुमचे मन दुखवले असेल किंवा तुम्हाला काही त्रास दिला असेल.. तर २०१६ मध्ये पण तय्यार रहा. कारण कॅलेंडर बदलेल, पण मी नाही. मेसेजेसपाठोपाठ फॉरवर्ड होताहेत सेलिब्रेशन मूडची इन्व्हिटेशन्स. त्यातही परस्पर अ‍ॅडमिनच्या नावाने पाठवल्या जाणाऱ्या मेसेजेसचा भरणा अधिक आहे. त्याचा हा एक नमुना वरच्या फोटोत दिसतोय.
viva.loksatta@gmail.com
फॉरवर्डेड..
दिवस आहेत, लग्नसराईचे. पण सावधान.. अशा अर्थाच्या सूचनाही फॉरवर्ड होताहेत-
welding और wedding में क्या फर्क हैं? दरअसल वेल्डिंग में पहले चिंगारी निकलती हैं और फिर हमेशा के लिए गठबंधन हो जाता हैं। लेकिन वेडिंग में पहले गठबंधन होता हैं और जिंदगीभर चिंगारियाँ निकलती हैं।

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 1:40 am

Web Title: trending subjects on social media
टॅग : Loksatta,Social Media
Next Stories
1 नृत्यसंगीताचा डिजिटल अवतार
2 फ्लावर
3 युरोपीय खानपान
Just Now!
X