News Flash

काळ्या तांदळाची प्रजाती कर्करोगावर गुणकारी

कर्करोगावर मात करण्यासाठी तांदळाची एक प्रजाती शोधून काढण्यात आली असून तो काळा तांदूळ म्हणून ओळखला जातो..

| May 18, 2015 12:20 pm

कर्करोगावर मात करण्यासाठी तांदळाची एक  प्रजाती शोधून काढण्यात आली असून तो काळा तांदूळ म्हणून ओळखला जातो, या पारंपरिक प्रजातीत कर्करोगाला ‘अँटीऑक्सिडंट’ असतात.
फुलिया येथील कृषी प्रशिक्षण केंद्राचे सहायक संचालक अनुपम पॉल यांनी सांगितले की, काळा तांदूळ हा कर्करोगावर गुणकारी आहे कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात, तो अजून प्रायोगिक तत्त्वावर असला तरी नंतर त्याची लागवड जास्त प्रमाणात करता येईल.
या तांदळात पिवळी रंगद्रव्ये असतात त्यांना अँथोसायनिन असे म्हणतात, तांदळाच्या कोंडय़ात ती असतात. काळा तांदूळ हा सेंद्रीय तांदळापेक्षा वेगळा असून त्यात मोठय़ा प्रमाणावर लोह व जस्त असते. पॉल यांनी म्हटले आहे की, कर्करोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते या काळ्या तांदळातील खनिजे कर्करोगविरोधी आहेत पण या तांदळाचा फारसा प्रचार व प्रसार झालेला नाही, त्याचे सकारात्मक परिणाम कळले की, लोक या तांदळाला महत्त्व देतील. त्यासाठी आम्ही डॉक्टरांपर्यंतही पोहोचणार आहोत.
माजी सरकारी कर्मचारी निरूपम दास यांनी सांगितले की, आपण केवळ सेंद्रीय तांदूळ वापरतो कारण आपल्याला मधुमेह आहे. मूत्रपिंडाचे विकार रोखण्यासाठी आपल्याला डॉक्टरांनी भाज्या व सेंद्रीय तांदूळ वापरण्यास सांगितले आहे. बंगालमध्ये जपॉनिका नावाचा तांदूळ मिळतो तो काळा तांदूळ म्हणून प्रसिद्ध आहे तो मधुमेहावरही गुणकारी आहे.
 या काळ्या तांदळाचे बियाणे मूळ मणिपूर व थायलंडचे आहे, २००८ पासून आपण काळ्या तांदळाचे उत्पादन घेत आहोत. फोक राइस अँड फेस्टीव्हलमध्ये अलीकडेच तांदळाच्या १००० प्रजाती मांडण्यात आल्या होत्या. बंगाल, आसाम, ओडिशा, उत्तर प्रदेश, चंदीगड व झारखंड येथील १५० शेतकरी व बियाणे संग्राहक तेथे आले होते. बाघबजार रामकृष्ण सेवा मिशन व बॅलीगुंज भारत सेवाश्रम येथे सेंद्रीय तांदूळ, डाळी विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.

काळ्या तांदळाची वैशिष्टय़े
*अँथोसायनिन हे पिवळे रासायनिक द्रव्य.
*अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त.
*मधुमेहावरही गुणकारी.
*मूळ प्रजात मणिपूर व थायलंडची.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2015 12:20 pm

Web Title: black rice is the new cancer fighting superfood
टॅग : Cancer 2
Next Stories
1 मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत मोबाइल फोनचा अडथळा
2 BLOG: स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग..एक थरार!
3 अतिरक्तदाब.. गंभीर विकार !
Just Now!
X