सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने 98 रुपयांचा आपला ‘डेटा सुनामी प्लॅन’ अपडेट केला आहे. या प्लॅनमध्ये कंपनीने डेटा वापरण्याची मर्यादा वाढवली असून वैधता कमी केली आहे.

आतापर्यंत बीएसएनएलच्या 98 रुपयांच्या डेटा सुनामी प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा वापरता येत होता. पण आता या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी हायस्पीड डेटा देण्यात येत आहे. पण कंपनीने या प्लॅनची वैधता कमी केली आहे. आधी या प्लॅनमध्ये ग्राहकांना 26 दिवसांची वैधता मिळत होती, पण आता हीच वैधता 24 दिवस करण्यात आली आहे.

या प्लॅनसोबतच बीएसएनएल आपल्या ग्राहकांना Eros Now चं 24 दिवसांसाठी मोफत सब्सक्रिप्शन देखील देत आहे. यासाठी ग्राहकांनी Eros Now अॅप डाउनलोड करावं लागेल, त्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन लॉगइन करावं लागेल.

खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएसएनएल एकाहून एक भन्नाट प्लॅन आणून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.