News Flash

Oppo Days Sale झाला सुरू, 8GB रॅमसह सहा कॅमेरे असलेला स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी

'सेल'मध्ये 'ओप्पो'चे स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर Oppo Days सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये ओप्पो कंपनीचे स्मार्टफोन व अन्य अ‍ॅक्सेसरीज कमी किंमतीत आणि सवलतीसह खरेदी करण्याची संधी आहे. 11 फेब्रुवारीपर्यंत हा सेल सुरू असेल.

सेलमध्ये ओप्पो Reno2, ओप्पो A31, ओप्पो A12, ओप्पो F17 यांसारखे अनेक फोन कमी किंमतीत उपलब्ध आहे. 8GB रॅमसह एकूण सहा कॅमेरे असलेल्या ओप्पो F17 प्रो या फोनवरही सेलमध्ये डिस्काउंट आहे. फ्लिपकार्टवर ओप्पो F17 प्रो स्मार्टफोनची किंमत २५ हजार ९९० रुपये आहे. पण ओप्पो डेज सेलमध्ये हा फोन २१ हजार ४९० रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय आणि १६ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज डिस्काउंटही मिळू शकतं.

आणखी वाचा- Nokia 5.4, Nokia 3.4 : नोकियाचे दोन ‘बजेट’ स्मार्टफोन भारतात झाले लाँच, जाणून घ्या डिटेल्स

Oppo F17 Pro स्पेसिफिकेशन्स :-
Oppo F17 Pro मध्ये 6.43 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आणि ऑक्टाकोर मीडिया टेक हीलियो P95 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. यात ColorOS 7.2 चा इंटरफेस आहे. ड्युअल पंच-होल कॅमेऱ्यासह येणाऱ्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल प्रायमरी + 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर असलेला फ्रंट कॅमेरा आहे. तर, मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सेल वाइड-अँगल लेन्स, 2 मेगापिक्सेल मोनोक्रोम सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा पोट्रेट सेन्सर आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये कंपनीने फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.1, जीपीएस/ए-जीपीएस, 3.5mm चा हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 2:47 pm

Web Title: flipkart oppo days 2021 starts discount offer on oppo f17 pro check price specifications offer sas 89
Next Stories
1 Clubhouse प्रमाणेच ट्विटरचं भारतात नवं फिचर Spaces ; जाणून घ्या खासियत
2 ट्विटरला ‘मेड इन इंडिया’ Koo ची टक्कर, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनीही बनवलं अकाउंट
3 World Pulses Day 2021 : जाणून घ्या पाच महत्वाच्या डाळी कोणत्या आणि त्यांच्यापासून होणारे फायदे
Just Now!
X