गृहोपयोगी उपकरणे व ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या Haier कंपनीने नाविन्यपूर्ण अशा फोर-डोअर बॉटम माऊंटेड रेफ्रिजरेटरच्या (बीएमआर) अनावरणाची घोषणा केली. यात १०० टक्के रेफ्रीजरेटरचा पर्याय आहे. सामान साठवण्यासाठी अधिकाधिक जागेची ग्राहकांची निकड लक्षात घेऊन ग्राहकांना अधिकाधिक जागा परिणामकारकरित्या वापरता यावी यासाठी हायरने साह्यकारक ठरणारी, १०० टक्के रेफ्रिजरेशनची सुविधा देणारी नवी फोर-डोअर सीरिज सादर केली आहे.  मजबूत आणि अधिक रुंद अशा काचेच्या कप्प्यांची रचना असलेल्या या रेफ्रिजरेटरमधील रेफ्रिजरेटर विभागात वॉल पार्टिशन नाही. त्यामुळे, ग्राहकांना सुनियोजित पद्धतीने वस्तू साठवण्यासाठी अधिक जागा सहज उपलब्ध होते.

बॉटम-माऊंटेड रेफ्रिजरेटरची ही अत्याधुनिक आणि आकर्षक रेंज प्रीमिअम ग्लास डोअर फिनिशसह येते. शिवाय, यात तापमान आणि इतर गोष्टी ग्राहकांना अधिक सहजगत्या नियंत्रित करता याव्यात यासाठी एक डिजिटल पॅनलही आहे. इतकेच नाही, हा नवा रेफ्रिजरेटर टि्वन इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीवर आधारित असल्याने कम्प्रेसर आणि फॅन मोटर इन्व्हर्टरवर चालू शकतात. त्यामुळे, रेफ्रिजरेटरमधील थंड वातावरण कमाल पातळीवर टिकवले जाते आणि अन्नपदार्थ अधिक काळ ताजे राहण्याची खात्री मिळते. या नव्या मॉडेलमध्ये ड्युअल फॅन तंत्रज्ञान आणि रेफ्रिजरेटर व फ्रीजरसाठी वेगवेगळे कुलिंग फॅन्स आहेत. शिवाय, यात फ्रूट अॅण्ड व्हेजिटेबल क्रिस्पर आहे. या सर्व सुविधांमुळे रेफ्रिजरेटर व फ्रीजर अशा दोन्ही ठिकाणी ताजेपणा टिकवून ठेवला जातो आणि फळे व भाजीपाला अधिक काळासाठी ताजा राहतो.

या रेफ्रिजरेटरमध्ये फ्रीजर विभागखाली आणि रेफ्रिजरेटरवर असल्याने हायर बॉटम माऊंटेड रेफ्रिजरेटर्स (बीएमआर) वापरकर्त्याचे वस्तू काढण्यासाठी वाकणे पारंपारिक टॉप माऊंट रेफ्रिजरेटरच्या तुलनेत ९० टक्के कमी करतो. भारतातील पहिल्या १०० टक्के रेफ्रिजरेटरचा पर्याय (या क्षेत्रात पहिल्यांदाच) असलेल्या या नव्या फोर-डोअर रेफ्रिजरेटरमध्ये बिल्ट-इन स्मार्ट सेन्सर्स आणि कन्व्हर्जन आहे. त्यामुळे, रेफ्रिजरेटरमधील थंड तापमान आपोआपच नियंत्रित केले जाते शिवाय, स्मार्ट कुलिंगसोबतच ऊर्जा वापरही परिणामकारकरित्या केला जातो.

“१०० टक्के रेफ्रिजरेशनचा पर्याय देणाऱ्या आमच्या नव्या फोर-डोअर बीएमआरच्या सादरीकरणातून आम्ही आमची उत्पादन यादी व्यापक करत आहोत. अधिक जागा असणारा हाय-एंड टॉप माऊंट, साइड बाय साइड किंवा बॉटम माऊंटेड रेफ्रिजरेटर घेण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या ग्राहकांसाठी आम्ही हे नाविन्यपूर्ण उत्पादन देत आहोत. हायरने अत्यंत सौंदर्यपूर्ण पद्धतीने या उत्पादनाची रचना केली आहे. शिवाय, यात उत्कृष्ट कार्यक्षमता, सुविधा आणि चमकदार डिझाइन असल्याने तुमच्या स्वयंपाकघरासाठीच नाही तर अगदी दिवाणखान्यातही हा रेफ्रिजरेटर अगदी शोभून दिसेल. आमच्या ग्राहकांना कमाल परफॉर्मन्स मिळावा यासाठी हायरमध्ये आम्ही सातत्याने नाविन्यतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न करत असतो.” असं  हायर अप्लायन्सेस इंडियाचे  एरिक ब्रॅगँझा म्हणाले.

या नव्या रेफ्रिजरेटरमध्ये सुपर कुल आणि फ्रीज पर्याय असल्याने फक्त एक बटन दाबून रेफ्रिजरेटर आणि फ्रीजरमधल्या काही वस्तू उपलब्ध होतात. शिवाय यात अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या हॉलिडे आणि फजी लॉजिक सुविधा आहेत. यामुळे ग्राहक सुटीसाठी बाहेर गेला असताना आतील तापमान नियंत्रित राहते. यामुळे फ्रीजर विभागातील तापमान कायम राहते. मात्र, रेफ्रिजरेटर विभागातील तापमान १७ अंशांवर येते. त्यामुळे, आपण बराच काळ बाहेर असलो तरी रेफ्रिजरेटरमधून घाणेरडा वास येत नाही. इतकेच नाही, अधिक चांगली दृश्यात्मकता आणि उपलब्धता मिळावी यासाठी या रेफ्रिजरेटरमध्ये एलईडी लाइट लावलेला आहे. त्यामुळे आतील प्रत्येक कानाकोपरा लख्ख प्रकाशतो. नवा हायर फोर-डोअर १०० टक्के रेफ्रिजरेटरसोबत (HRB-550KG and HRB-550CG) कम्प्रेसर आणि फॅन मोटरवर १० वर्षांची वॉरंटी आहे. हे नवे रेफ्रिजरेटर भारतात १ लाख २० हजार रुपये या किंमतीला उपलब्ध आहेत.