23 July 2019

News Flash

Honor 9N Rs 1 Sale: केवळ एक रुपयात खरेदी करा 12 हजारांचा स्मार्टफोन !

हुवाईचा सबब्रॅण्ड असणाऱ्या ऑनर कंपनीचा Honor 9N हा स्मार्टफोन आज अवघ्या एक रुपयात खरेदी करण्याची संधी

(फोटो - इंडियन एक्सप्रेस)

हुवाईचा सबब्रॅण्ड असणाऱ्या ऑनर कंपनीचा Honor 9N हा स्मार्टफोन अवघ्या एक रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. हा एक स्पेशल सेल असून आज सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी या सेलला सुरूवात होत आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर hihonor.com हा सेल असणार आहे. खास डिझाइन आणि नॉच डिस्प्ले वैशिष्ट्य असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 11 हजार 999 रुपयांपासून सुरू होत आहे, मात्र आज हा फोन केवळ एक रुपयात खरेदी करता येणार आहे. Honor 9N हा फोन तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असून सेलमध्ये पहिलं व्हेरिअंट ३ जीबी रॅम/ ३२ जीबी इंटर्नल मेमरी असणाऱ्या फोनची विक्री होईल.

अशाप्रकारे करा खरेदी –
– हा फोन जर एक रुपयात खरेदी करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही कंपनीच्या https://www.hihonor.com/in/ या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करा आणि अकाउंट बनवा.
– जर आधीपासूनच तुमचं हुवाईचं अकाउंट असेल तर तुम्ही थेट साइन-इन करु शकतात.
– त्यानंतर बरोबर 11 वाजून 45 मिनिटांनी सेल सुरूवात होईल, लगेच Buy Now या पर्यायावर क्लिक करावं.
– जर तुम्ही Lucky असाल तर तुम्हाला अवघ्या एक रुपयात Honor 9N खरेदी करता येईल, कारण मर्यादित फोनचीच विक्री कंपनीकडून करण्यात येणार आहे.

तीन प्रकारांमध्ये उपलब्ध –

ऑनर ९ एन हा फोन तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पहिल्या प्रकारचा सर्वात स्वस्तातील म्हणजेच ३ जीबी रॅम/ ३२ जीबी इंटर्नल मेमरी असणारा दुसरा ४ जीबी रॅम/ ६४ जीबी इंटर्नल मेमरी आणि तिसरा सर्वात महाग असणार हा फोन ४ जीबी रॅम/ १२८ जीबी इंटर्नल मेमरी या प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.

रंग-
मिडनाईट ब्लॅक, लॅव्हेंडर पर्पल, सफायर ब्लू आणि रॉबिन एग ब्लू या चार रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल.
स्पेसिफिकेशन्स:

स्क्रीन-
५.८४ इंच फूल एचडी स्क्रीन

रेझोल्यूशन-
१०८०X २२८० पिक्सल

स्क्रीन अॅस्पेक्ट रेशो
१९.९

मेमरी-

मोबाईल ३ जीबी, ४ जीबी रॅमच्या तीन पर्यायांमध्ये उपलब्ध असून इंटर्नल स्टोअरेजच्या दृष्टीनेही ३२ जीबी, ६४ जीबी आणि १२८ जीबी पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
मेमरी कार्डच्या सहाय्याने फोनची मेमरी २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

कॅमेरा-

फोनमध्ये १३ आणि २ मेगापिक्सलचे दोन रेअर कॅमेरा एलईडी फ्लॅशसहीत देण्यात आले आहेत.

या दोन्ही रेअर कॅमेरांना Bokeh इफेक्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पीडीएएफसारखे फिचर्सही कॅमेरात देण्यात आले आहेत.

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रण्ट कॅमेरा देण्यात आला आहे

कनेक्टीव्हीटी-

४ जी व्होल्ट

वाय-फाय

ब्लू टूथ

जीपीएस

इतर फिचर्स-

फोनच्या समोरच्या भागावर फिंगरप्रिंट सेंसरचे विशेष बटण देण्यात आले आहे.

मोबाईलमध्ये कंपनीने किरीन ६५९ हा चीपसेट दिला आहे.

या फोनमध्ये फेस अनलॉकचे फिचरही देण्यात आले आहे.

नोटिफिकेशन प्रायव्हसी हे अनोखे फिचरही या फोनमध्ये देण्यात आले आहे. या फिचरमुळे केवळ फोनच्या मालकालाच फोनचे नोटिफिकेशन दिसू शकतील.

किंमत-

३ जीबी रॅम/ ३२ जीबी इंटर्नल मेमरी – ११ हजार ९९९ रुपये

४ जीबी रॅम/ ६४ जीबी इंटर्नल मेमरी – १३ हजार ९९९ रुपये

४ जीबी रॅम/ १२८ जीबी इंटर्नल मेमरी – १७ हजार ९९९ रुपये

First Published on September 11, 2018 11:40 am

Web Title: honor 9n rs 1 sale