करोनाने आपल्या रोजच्या आयुष्यात जे काही खूप मोठे बदल केलेत त्यातलाच एक म्हणजे बदलेली कामाची पद्धत अर्थात Work From Home सारखा पर्याय. तुम्हाला आठवत असेल तर अगदी सुरुवातीच्या लॉकडाउनच्या काळात Work From Home हा ऑप्शन सर्वांनाच उत्तम वाटला. लाखो लोकांनी त्याचं स्वागत केलं आणि घरातून जोमाने काम करायला सुरुवात केली. पण हळूहळू त्यातल्या अडचणी समोर आल्या आणि आता जवळपास वर्षभरातच ह्याच्या फायद्या-तोट्यांवर, चांगल्या वाईट परिणामांवर विविध अनुषंगाने चर्चा होऊ लागली आहे.

विशेष म्हणजे आता जगभरातील बहुतांश कंपन्यांनी यापुढेही कायमच ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे एक नवी कामाची पद्धत फक्त भारतातच नव्हे तर जगभरात रुजतेय. अशावेळी काळासोबत आपणही चालत बदल स्वीकारायलाच हवेत. पण ‘वर्क फ्रॉम होम’मुळे येणाऱ्या ताणाचे काय? शारीरिक मानसिक समस्यांचे काय? हे प्रश्न कायम आहेत. तुम्हालाही ‘वर्क फ्रॉम होम’चा ताण येतोय का? तर मग पाहूया काही हलक्या-फुलक्या टिप्स, ज्यामुळे तुमचं वर्क फ्रॉम होम हॅपनिंग होईल.

Hollywood Pop Star Exit Barefoot After Intense Fight With Boyfriend
Britney Spears: हॉटेलमधून नको त्या अवस्थेत बाहेर पडली ब्रिटनी स्पिअर्स, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Gulab jamun milkshake viral video
गुलाबजाम, साखरेचा पाक, आइस्क्रीम अन्… सोशल मीडिया व्हायरल होतोय ‘डायबिटिक मिल्क शेक’ पाहा हा Video
hostel food viral video
“…कोणत्या जेलमध्ये राहतेस?” ‘हॉस्टेल’च्या जेवणाचा ‘हा’ व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण!
Solar Ac That Does Cooling at Home Using Sun Energy Cost of Ac for 1 to 1.5 Ton
सोलार एसी वापरून सूर्यावर खेळ रिव्हर्स कार्ड! किंमत, फायदे पाहाच, आधीच घरी एसी असल्यासही करू शकता जुगाड

योग्य सीटिंग अरेंजमेंट

आपल्यापैकी अनेकांचं काम हे तासन् तास एकाच जागी बसून करण्याचं असतं. अशावेळी तुमची सीटिंग अरेंजमेंट खूप महत्त्वाची ठरते. आपण ऑफिसमध्ये असू तर आपल्याला ठरलेला डेस्क अर्थात ठरलेली सीटिंग अरेंजमेंट असते. पण वर्क फ्रॉम होममध्ये हा मुद्दा अडचणीचा ठरतो. तुम्हीही घरात कुठेही बसून काम करू शकता हा फायदा असला तरीही घरच्या सोफ्यावर किंवा बेडवर बसून, हातात किंवा मांडीवर लॅपटॉप घेऊन तासन् तास काम करणं ही शारीरिकदृष्ट्या कठीण बाब आहे. त्यामुळे, आपल्या घरातल्या एका कोपऱ्यात आपल्याला आरामदायी ठरेल असा डेस्क आणि चेअर ह्याची व्यवस्था करता येऊ शकते. ह्यामुळे पुढची संभाव्य शारीरिक दुखणी टाळता येऊ शकतात. सोबतच कामही एकाग्रतेने होऊन तुम्हाला ऑफिसमध्येच काम केल्याचा फिलही शकेल.

Photo : Pexeles

 

स्मार्ट लायटिंग

एका कम्फर्टेबल सीटिंग अरेंजमेंटसोबतच येणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही घरात जिथे कामासाठी बसणार आहेत तिथली प्रकाशयोजना अर्थात लायटिंग. कारण, त्यामुळे तुमच्या कामाचा मूड ठरत असतो. योग्य प्रकाशयोजना नसेल तर त्याचा तुमच्या कामावर, कामाच्या गतीवर आणि स्वास्थ्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही घरात ज्या ठिकाणी कामासाठी बसाल तिथे जर नैसर्गिक प्रकाश कमी असेल किंवा पुरेसा नसेल तर तुम्ही टास्क लाइटिंग (टेबल लॅम्प) किंवा अ‍ॅक्सेंट लायटिंग या पर्यायांचा वापर करू शकता. हे दोन्ही प्रकारचे लाईट्स विशेषतः तुमच्या डेस्कपुरते मर्यादित असतील.

Photo : Pexeles

 

जागा कमी असुद्या ! क्रिएटिव्हिटीला तोटा नाही

जर तुमच्या घरात जागा मर्यादित असेल आणि डेस्क-चेअरचा आख्खा सेटअप पूर्ण वेळ ठेवणं शक्य नसेल, जागेच्या कमतरतेमुळे तुम्हाला घरातील सोफ्यावर किंवा बेडवर अवघडून बसून दिवसभर तासन् तास काम करावं लागत असेल तर काळजी नसावी. कारण जागा थोडी कमी असली तरी आपल्या कल्पकतेला मात्र अजिबात तुटवडा नाही. अशा वेळी कमी जागेत वर्क फ्रॉम होमसाठी एक चांगला पर्याय समोर येतो तो म्हणजे स्मार्ट फोल्डेबल डेस्क जो अगदी लहान घरांमध्येही अगदी फिट बसतो.

सुटसुटीत वर्किंग डेस्क

तुमच्या वर्किंग डेस्कवर जितक्या वस्तू कमी तितकं योग्य. त्यामुळे प्रयत्न करा कि तुमच्या डेस्कवर अनावश्यक वस्तू नसतील, तो कायम नीटनेटका आणि स्वच्छ दिसेल. पुस्तकं, पेपर्स, फाईल्स हे सगळं डेस्कवर एकत्र ठेवणं टाळा. त्यासाठी वेगळी सोय करा. एखाद्या स्वच्छ मोठ्या बास्केट किंवा बॉक्समध्ये या वस्तू ठेवल्या जाऊ शकतात. तसेच जेव्हा गरज पडेल तेव्हा बाहेर काढून पुन्हा जागच्या जागी ठेवताही येतात. हा बॉक्स तुमच्या डेस्कच्या जवळ ठेवल्यास उत्तम!

Photo : Pexeles

 

ग्रे इज ग्रेट!

ग्रे अर्थात राखाडी रंग हा सध्या होम ऑफिस डेकोरेशनमध्ये खूप स्पेशल ठरतोय. या रंगाचा वापर करून तयार केलेल्या होम डेकोरेशन डिझाइन्स सध्या जगाला भुरळ घालतायत. छोट्या होम ऑफिसेससाठी हा एक आयडियल रंग आहे. त्यामुळे तुमच्या होम ऑफिसमध्ये ह्या रंगाचा वापर जरूर करा.

Photo : Pexeles

भितींना बोलू द्या!

तुम्ही घरात ज्या ठिकाणी दिवसभर काम करण्यासाठी बसणार आहात त्या भितींनाही बोलू द्या, सजू द्या. तुमच्या होम ऑफिसला छान लुक देण्यासाठी वॉलपेपर्सचा वापर करा. उठावदार रंग, सुंदर टेक्स्चर, मॉडर्न प्रिंट्सचा वापर करा.

Photo : Pexeles