26 November 2020

News Flash

९० हजारांपासून मिळतायत मारूतीच्या कार्स; पाहा कुठे खरेदी करू शकाल

ऑल्टोपासून ब्रिझापर्यंत विकत घेता येणार कार्स

लॉकडाउनच्या कालावधीत ऑटोमोबाईल क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला होता. परंतु आता पुन्हा एकदा हे क्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. नव्या गाड्यांसोबतच सेकंड हँड गाड्यांचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही कंपन्या या गाड्यांना सर्टिफाईड करून सेवा आणि वॉरंटीसह ग्राहकांपर्यंत पोहोचवत असतात. भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकीनं नव्या कारसोबतच जुन्या कार्सही खरेदी करण्याची संधी दिली आहे. मारूती आपल्या ट्रू व्हॅल्यू स्टोअरच्या माध्यमातून या गाड्यांची विक्री करत आहे. मारूती आल्टोपेक्षाही कमी किंमतीत स्विफ्ट आणि वॅगन आर सारख्याही गाड्या या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पाहूया कोणत्या कारची किती आहे किंमत.

मारूती वॅगन आर ही गाडी मारूतीच्या जुन्या गाड्या विकल्या जात असलेल्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार २०११ च्या ७०,३४७ किलोमीटर चाललेल्या गाडीसाठी १.३० लाख रूपये मोजावे लागतील. ही दुसऱ्या मालकानं विकलेली गाडी असून या गाडीचं एलएक्सआय मॉडेल या किंमतीत विकत घेता येणार आहे.

मारूती स्विफ्टचं पेट्रोल व्हेरिअंटही या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. २०१० च्या १ लाख २० हजार किलोमीटर चाललेल्या गाडीसाठी १ लाख ३८ हजार रूपये मोजावे लागतील. ही गाडी पहिल्या मालकाद्वारे विकण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त या ठिकाणी मारूती ऑल्टोदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. मारूती ऑल्टो ट्रू व्हॅल्यू ९० हजार रूपयांमध्ये ऑफर करत आहे. तिसऱ्या मालकाद्वारे ही गाडी कंपनीला विकण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मारूती स्विफ्ट १ लाख ४० हजार रूपयांमध्ये तर ब्रिझा ही कार जवळपास साडेपाच लाखांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 9:50 pm

Web Title: maruti wagon r maruti swift maruti alto 800 maruti swift dzire vitara brezza used cars sale know here how to buy these cars from maruti true value check finance and other offers jud 87
Next Stories
1 ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय? तो टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय
2 दररोज खा बीट..! विचारही केला नसेल असे होतील फायदे
3 ‘हे’ फायदे वाचून बटाट्याविषयी असलेले सगळे गैरसमज होतील दूर
Just Now!
X