News Flash

64MP कॅमेऱ्यासह तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी, जाणून घ्या Samsung Galaxy M31s चे दमदार फीचर्स

सॅमसंगचा ‘मिड-रेंज सेगमेंट’मधला नवीन स्मार्टफोन...

सॅमसंग कंपनीने गेल्या आठवड्यात भारतात आपला ‘मिड-रेंज सेगमेंट’मधला नवीन स्मार्टफोन लाँच केला. Samsung Galaxy M31s हा गॅलेक्सी एम सीरिजमधला नवीन फोन कंपनीने आणला आहे. 6GB रॅम +128GB स्टोरेज आणि 8GB रॅम+128GB स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला असून 19 हजार 499 रुपये आणि 21 हजार 499 रुपये इतकी अनुक्रमे किंमत ठेवण्यात आली आहे.

‘सेल’ कधी ?
Samsung Galaxy M31s हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 64MP प्राइमरी कॅमेऱ्यासह क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आणि 6000mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरुन Galaxy M31s खरेदी करता येईल. अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलदरम्यान म्हणजे 6 आणि 7 ऑगस्ट रोजी हा फोन पहिल्यांदा सेलमध्ये उपलब्ध केला जाईल.

फीचर्स :-
अँड्रॉइड-10 ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित असलेल्या Galaxy M31s मध्ये Exynos 9611 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल क्षमतेचा असेल. कॅमेऱ्यासाठी ‘Intelli-Cam सिंगल टेक’ फीचर देण्यात आलं आहे. याद्वारे एकावेळेस अनेक फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करता येतात असं सांगितलं जात आहे. 64MP प्राइमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सल अल्ट्रा व्हिडिओ सेन्सर, 5 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स असा हा कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 32MP चा कॅमेराही देण्यात आला आहे. Samsung Galaxy M31s मध्ये फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनलमध्ये होल-पंच कटआउट डिझाइन असेल. याशिवाय 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह तब्बल 6000mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे. पॉवरफुल बॅटरीमुळे 125 तासांचा म्युजिक प्ले-बॅक, 51 तासांचा कॉलिंग बॅकअप व 22 तासांचा ब्राउझिंग बॅकअप मिळतो, असा कंपनीचा दावा आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 2:38 pm

Web Title: samsungs new mid range smartphone galaxy m31s check price specifications and other details sas 89
Next Stories
1 Xiaomi ने लाँच केला नवीन ‘बजेट’ स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षा कमी
2 चिनी कंपन्यांविरोधात कारवाई सुरूच, अजून दोन लोकप्रिय चिनी अ‍ॅप्स भारतात ‘बॅन’
3 Realme Smart TV खरेदी करण्याची आज संधी, डिस्काउंटसह मिळेल कॅशबॅकचीही ऑफर
Just Now!
X