61-lp-foodसाहित्य :

१ वाटी मिल्क पावडर,
अर्धा किलो गाजर,
१ वाटी साखर,
४-५ चमचे लोणी,
२ चमचे तूप,
अर्धा चमचा वेलची पावडर,
१ वाटी दूध.

Make Home Made Yummy Fluffy and Moist Steam Cupcake With Few ingredients Watch Viral Video Recipe
घरच्या घरी, मोजक्या साहित्यात बनवा स्वादिष्ट, मऊ ‘कपकेक’; रेसिपीचा सोपा VIDEO बघा, साहित्य अन् कृती लिहून घ्या
Maharashtra Din 2024 marathi actors special song
महाराष्ट्र दिन : पारंपरिक साज, मुंबई दर्शन अन्…; मराठी कलाकारांनी स्वत:च्या आवाजात सादर केलं सुंदर गीत! सर्वत्र होतंय कौतुक
Mohan Wagh Award for Best Theatre Production for Chinmay Mandlekar Ghalib Drama
“महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांच्या DNA मध्ये तीन नावं, एक असतं मंगेशकर…”, चिन्मय मांडलेकरचं विधान
Sangli, Vasant Keshav Patil,
सांगली : साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे निधन

कृती :

एका काचेच्या भांडय़ात पाणी घेऊन गाजर मायक्रो हायवर १५ मिनिटे ठेवून शिजवून घ्यावी. त्यानंतर सोलून त्याचा कीस करावा. काचेच्या भांडय़ात शिजवलेला गाजर-कीस, साखर, लोणी, तूप, वेलची पावडर, दूध टाकून मायक्रो हायवर १० मिनिटे ठेवावे. त्यावर मिल्क पावडर टाकून मिश्रणास नीट मिक्स करावे. मायक्रो मीडियमवर ३-४ मिनिटे ठेवावे. मिल्क पावडरच्या थोडय़ा बारीक गुठळ्या या हलव्यात लागतील. त्या तुम्हाला खव्याची चव देतील.

59-lp-foodपालक खिमा रोल

साहित्य :

२ जुडय़ा पालक (मोठी पाने धुऊन फक्त देठ काढलेले),
२-३ चमचे तेल,
२-३ केळ्याची पाने,
साधा दोरा,
२ वाटय़ा मटण किंवा चिकन खिमा (तयार असलेला तुमच्या आवडीनुसार),

कृती :

केळ्याच्या पानावर थोडेसे तेल लावून त्यावर पालकची मोठी पाने पसरवून द्यावीत त्यावर तयार असलेला खिमा पसरवून द्यावा. नंतर फक्त पालक व खिमा रोल करावा. केळ्याच्या पानांनी वरतून रोल करावे व दोऱ्याने बांधून घ्यावे. हा रोल मायक्रो मीडियमवर ४-५ मिनटे ठेवावा. वडय़ा कापून सव्‍‌र्ह करावे. हा रोल अगोदर करून फ्रिजमध्येसुद्धा ठेवता येतो.

62-lp-foodव्हेज सुप

साहित्य :

३ ते ४ लिंबाची पाने,
१ वाटी बारीक चिरलेला फ्लावर,
५ ते १० मशरूम (बारीक चिरलेले),
३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या),
१ चमचा लिंबू रस,
अर्धा जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली),
मीठ चवीनुसार, पाच वाटय़ा पाणी.

कृती :

काचेच्या बाऊलमध्ये पाणी, लिंबाची पाने, हिरवी मिरची, लिंबू रस टाकून ३ मिनिटे हायवर ठेवावे. नंतर त्याच स्टॉकमध्ये बारीक चिरलेला फ्लावर व मशरूम टाकून परत २ मिनिटे हायवर मायक्रो करावे. चीवनुसार मीठ टाकून नीट ढवळून घ्यावे. बारीक  चिरलेली कोथिंबीर टाकून १ मिनिट मीडियमवर मायक्रो करावे. गरम सव्‍‌र्ह करावे.

60-lp-foodचिकन दाल शोरबा

साहित्य :

पाव किलो चिकन (साफ करून लांब कापलेले),
अर्धी वाटी चणाडाळ,
१ चमचा काळीमिरी,
३-४ कडिपत्ता पाने,
१ चमचा जिरे,
मीठ चीवनुसार.

कृती :

एका काचेच्या भांडय़ात डाळ व २ वाटय़ा पाणी टाकून ५ मिनिटे मीडियम मायक्रो करावे. डाळ शिजली नसल्यास अजून मायक्रो करून घ्यावे. चिकनचे तुकडे त्या डाळीत टाकून मायक्रो मीडियमवर परत ३ मिनटे ठेवावे व चिकन शिजवून घ्यावे.

बाऊल बाहेर काढून त्यातले चिकन बाजूला काढावे. शिजलेली डाळ, काळीमिरी, कडिपत्ता पाने, जिरे, मीठ व त्या डाळीतले पाणी मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे व परत काचेच्या बाऊलमध्ये ठेवावे. त्यात आपल्या आवडीनुसार जी कनसीस्टनी पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकावे. काही जणांना थिक सुप आवडते तर काहींना थिन सुप. आवडते त्याप्रमाणे पाणी व चिकन टाकून ३ मिनिटे मीडियम मायक्रो करावे.

सव्‍‌र्ह करावे. सव्‍‌र्ह करायच्या अगोदर थोडेसे बटरपण टाकू शकता.

63-lp-foodचोको- चिप कुकीज

साहित्य :

दीड वाटी बटर,
पाव वाटी ब्राऊन साखर (साधी साखर वापरली तरी चालेल),
१ अंडे (फेटलेले),
दीड वाटी मैदा (चाळून घेतलेला),
अर्धा चमचा बेकिंग पावडर,
अर्धी वाटी चॉकलेट चिप्स,
अर्धा चमचा जायफळ पावडर,
अर्धी वाटी दूध,

कृती :

एका भांडय़ात बटर, साखर व अंडे टाकून फेटून घ्यावे. हळूहळू दूध टाकून मिक्स करून घ्यावे. मैदा, बेकिंग पावडर, जायफळ व चिप्स नीट मिसळून घ्यावे. हे मिश्रण बटरच्या मिश्रणात टाकून हळुवारपणे मिक्स करावे. हे २०-३० मिनटे थोडे फ्रिजमध्ये ठेवावे. छोटे गोळे बनवून बेकिंग शिटवर ठेवून थोडेसे प्रेस करावेत. मायक्रो हायवर ८-१० मिनटे ठेवावे. थंड झाल्यावर बंद डब्यात भरून ठेवू शकता.

64-lp-foodबटाटा भाजी टोस्ट

साहित्य :

अर्धा किलो बटाटे (उकडून साफ केलेले),
१ चमचा हळद पावडर,
४-५ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेली),
२ चमचे जिरे,
अर्धा जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली),
२-३ चमचे तेल,
मीठ चवीनुसार,
साधारणत: ८ ब्रेड स्लाइस.

कृती :

एका भांडय़ात बटाटे कुस्करून घ्यावेत, एका पॅनमध्ये तेल, हळद, मिरची, जिरे, मीठ व कोथिंबीर टाकून फोडणी करून ती त्या कुस्करलेल्या बटाटय़ाच्या मिश्रणात टाकावी. थंड झाल्यावर बटाटे व फोडणी नीट मिसळून घ्यावी. हे मिश्रण ब्रेड स्लाइसवर पसरट लावून काचेच्या पसरट भांडय़ात ठेवावे. मायक्रो हाय वर ३-४ मिनिटे व नंतर मायक्रो लो वर २ मिनिटे ठेवावे. त्रिकोणी कापून गरम गरम टोस्ट सव्‍‌र्ह करावे.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com