शाओमी कंपनीने भारतात Xiaomi Mi TV Stick हे नवीन स्ट्रीमिंग डिव्हाइस लाँच केलं आहे. या ‘एमआय स्टिक’द्वारे युजर्सना सामान्य टीव्हीवर अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, डिज्नी + हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि अन्य ओटीटी सर्व्हिस स्ट्रीम करता येतील. हे डिव्हाइस टीव्हीच्या एचडीएमआई पोर्टला कनेक्ट केल्यास साध्या टीव्हीवरही स्मार्ट टीव्हीप्रमाणे अनुभव घेता येतो.

Xiaomi Mi TV Stick अँड्रॉइड टीव्ही 9 वर कार्यरत आहे. यामध्ये युजर्सना गुगलच्या प्ले स्टोअरचाही अ‍ॅक्सेस मिळतो. Mi TV स्टिकद्वारे अ‍ॅमेझॉनच्या Fire TV Stick ला टक्कर देण्याचा शाओमीचा प्रयत्न आहे. नवीन ‘एमआय स्टिक’चं डिझाइन जवळपास अ‍ॅमेझॉनच्या फायर टीव्ही स्टिकप्रमाणेच आहे. Mi TV Stick केवळ ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. तर, स्टिकच्या रिमोट कंट्रोलसाठीही हाच कलरचा पर्याय देण्यात आला आहे. गुगल असिस्टंट व्हॉइस कंट्रोल फीचरला हे रिमोट सपोर्ट करतं.

किंमत आणि सेल :-
1 जीबी रॅम आणि 8जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या Mi TV Stick मध्ये क्वॉड-कोर Cortex-A53 CPU आणि ARM Mali-450 GPU आहे. अँड्रॉइड टीव्ही 9 वर कार्यरत असलेल्या या स्टिकमध्ये वाय-फाय आणि ब्लूटूथ व्हर्जन 4.2 सपोर्ट मिळेल. Mi TV Stick हे शाओमी कंपनीचं दुसरं स्ट्रीमिंग डिव्हाइस आहे. यापूर्वी कंपनीने Mi Box 4K देखील लाँच केला होता. Amazon Fire TV Stick ची किंमत 3,999 रुपये आहे. तर शाओमीने आपल्या Mi TV Stick ची किंमत Mi TV स्टिकची किंमत 2 हजार 799 रुपये इतकी ठेवली आहे. सात ऑगस्ट म्हणजेच आज(दि.7) दुपारी 12 वाजेपासून या स्टिकसाठी mi.com आणि फ्लिपकार्टवर सेलला सुरूवात झाली आहे. ब्लॅक कलरमध्ये लाँच झालेली ही Mi TV स्टिक लवकरच देशभरातील सर्व Mi पार्टनर्स स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहे.