Hair care tips in winter: केसांचा वारंवार गुंता होणे ही प्रत्येक महिलेला थंडीच्या दिवसात येणारी समस्या आहे. या दिवसांत केस लहान असो किंवा लांब त्यात कमी अधिक प्रमाणात गुंता होतोच. वेगवेगळ्या हेअर स्टाइल्स, सतत आयनिंग किंवा ड्रायरचा करण्यात येणारा वापर, याशिवाय इतर हेअर स्टायलर टूल्सचा वापर यामुळे केसांचा गुंता होतो. हा गुंता सोडवताना केस तुटतात एवढंच नव्हे तर केसांचा लूकही खराब होतो. केसांचा गुंता सोडवत असताना खूप त्रास होतो त्याचबरोबर खूप केसही गळतात. अशावेळी केसांचा गुंता सोडवणे खूप कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत केसातील गुंता सोडवण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.

केस धुणे

How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Tandlyachya pithache sandge recipe
झटपट दुप्पट फुलणारे तांदळाचे सांडगे; ‘या’ पद्धतीन बनवा कुरकुरीत सांडगे
summer special valvan mirchi recipe in marathi stuffed dried chilli
वरण-भातासह खाण्यासाठी करा वर्षभर टिकणाऱ्या ‘वाळवण मिरच्या’; तोंडाला येईल झक्कास चव

कोणत्याही स्त्रीच्या सौंदर्याला चार चाँद लावण्याचे काम करतात, ते मऊशार, काळेभोर आणि चमकदार केस. म्हणूनच आपण आपल्या चेहऱ्याकडे, मेकअपकडे जितके लक्ष देतो, तेवढेच लक्ष केसांकडेही दिले पाहिजे. आपण सर्वांनी हे ऐकले आहे आणि त्यामुळेच आपल्यापैकी बरेच जण आपले केस रोज शँपू करणे टाळतात. पण जर तुमची टाळू प्रदूषण, घाण यांच्या संपर्कात आली असेल किंवा तुमच्या टाळूवर घाम साचला असेल तर तुमचे केस स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला दररोज केस धुणे आवश्यक आहे.

कंडिशनर आवश्यक

सध्या प्रदूषण, घाण आणि काजळी यामुळे केसांसाठी दिवस खराब असतात. केस निरोगी आणि स्मूथ ठेवण्यासाठी प्रत्येक स्त्रीला केसांसाठी बेस्ट कंडिशनरची गरज असते. कंडिशनर हे तुमच्या केसांना पोषण देण्यासाठी आहे तुम्ही तुमचे केस स्वच्छ करण्यासाठी जेव्हा शॅम्पू वापरता तेव्हा हे पोषण काढून टाकले जाते. हे केसांच्या संपर्कात असलेल्या कठोर घटकांचा देखील प्रतिकार करते. त्यामुळे या सर्वांचा सामना करण्यासाठी, एक चांगला कंडिशनर आवश्यक आहे.

केसांना जास्त वेळा तेल लावू नका

केसांना तेल लावणं चांगलं आहे. पण केस धुवण्यापूर्वी फक्त १ किंवा २ तास आधी तेल लावल्यामुळे केस चांगले राहतात. रात्री तेल लावणे आणि सकाळी धुवणे… ही सवय चांगली नाही. असं केल्यास केस कमजोर होतात आणि तुटू लागतात.

हेही वाचा >> Black Carrot Benefits : तुम्ही काळं गाजर खाल्लंय का? फायदा जाणून घ्याल तर नेहमी खाल

मुळांपासून गुंता सोडवण्याची चूक करु नका

केसांच्या गुंता सोडवताना सर्वप्रथम केसांच्या खालच्या बाजूने गुंता सोडवायला सुरुवात करावी. केसांच्या खालच्या बाजूने केसांची गुंता सोडवत हळुहळु वर मुळांजवळ येऊन हलक्या हाताने गुंता सोडवावी. केसांच्या वरच्या बाजूने म्हणजेच मुळांपासून गुंता सोडवण्याची चूक करु नका. सगळ्यात आधी खालच्या बाजूने गुंता सोडवत हळुहळु वर जावे.

बोटांच्या मदतीने गुंता सोडवा

केसांतील गुंता सोडविण्यासाठी कंगवा किंवा ब्रशचा वापर करण्यापूर्वी आपल्या बोटांच्या मदतीने गुंता सोडवावा. कंगवा किंवा ब्रशने केसांचा गुंता सोडविताना भरपूर केस तुटण्याची शक्यता असते. यामुळे केसांचा गुंता सोडविण्यासाठी कंगवा किंवा ब्रशचा वापर करण्यापूर्वी आपल्या हातांच्या बोटांच्या मदतीने गुंता सोडवावा.