ज्वारी आणि बाजरी या धान्यांकडे आपण पारंपरिक खाद्य म्हणून पाहतो. मात्र पौष्टीक गुणधर्म असणारे हे धान्य आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आपल्याला या दोन्ही धान्यांची भाकरी माहित असते, मात्र त्यापलिकडे जात यापासून बरेच हटके पदार्थही करता येतात. अम्रिता हाजरा या तरुण संशोधिकेने याबाबत बराच अभ्यास केला आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’(आयसर) या संस्थेत त्या संशोधन आणि अध्यापन काम करणाऱ्या अम्रिता यांनी ज्वारी आणि बाजरीची भरड या विषयावर संशोधन केले आहे. या पदार्थांचे आपल्या आरोग्यातील असणारे महत्त्व त्यांनी ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ च्या कार्यक्रमात केले.

या ज्वारी आणि बाजरीच्या भरडीपासून चकली, न्यूडल्स, शेवया असे अनेक हटके पदार्थ तयार होतात. याबरोबरच हल्ली ज्वारीचे कुकीजही तयार करता येतात. येत्या काळात या पदार्थांमध्ये आणखी भर पडेल अशी आशा आहे असे मत अम्रिता यांनी व्यक्त केले. सर्व वयोगटातील लोकांसाठी ज्वारी आणि बाजरीची भरड चांगली असते. मात्र प्रत्येक वयोगटासाठी ही भरड देण्याची पद्धती माहित असायला हव्यात.