अनेक वेळा आपल्याला दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर हलका फुलका वॉक करायला आवडतं. असं मानलं जातं की ते पचन किंवा वजन कमी करण्यास मदत करतं. जेवल्‍यानंतर चालण्‍याचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे असू शकतात, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्‍यक आहे.

जेवणानंतर फेरफटका मारण्याचे ६ फायदे
१. ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाईल
जर एखादी व्यक्ती अन्न खाल्ल्यानंतर चालत असेल तर त्याच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.

how scam callers find numbers
स्कॅम कॉल करणाऱ्यांना तुमचा नंबर कसा मिळतो? स्वतःच्या सुरक्षेसाठी ‘ही’ माहिती जाणून घ्या…
This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

२. लठ्ठपणा कमी होईल
जे लोक शरीरातील अतिरिक्त चरबी किंवा लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत, त्यांनी अन्न खाल्ल्यानंतर अर्धा किंवा तासभर चालले, तर असे केल्याने शरीरातील पोटावरील चरबी कमी होऊ शकते.

३. निद्रानाश पासून आराम
ज्यांना निद्रानाशाची समस्या आहे, त्यांना सांगा की, जेवल्यानंतर जर त्यांनी फेरफटका मारला तर झोपेची गुणवत्ता सुधारते आणि निद्रानाशाच्या समस्येपासूनही सुटका मिळू शकते.

आणखी वाचा : Chanakya Niti: असे पालक होतात आपल्याच मुलांचे शत्रू, जाणून घ्या काय म्हणते चाणक्य नीति

४. मानसिक आरोग्य चांगले राहील
जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने मानसिक आरोग्य राखता येते. हे चयापचय वाढवण्यास देखील मदत करते.

५. पचन व्यवस्थित होईल
जे अन्न खाल्ल्यानंतर फेरफटका मारतात त्यांना सांगा की असे केल्याने पचनसंस्था निरोगी राहते. याशिवाय, मल पास करणे देखील सोपे होऊ शकते.

६. ऊर्जा मिळेल
अन्न खाल्ल्यानंतर फेरफटका मारल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळू शकते. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होऊ शकते.