Hero MotoCorp या भारतातील आघाडीच्या दुचाकी कंपनीने BS6 मानकांप्रमाणे तयार करण्यात आलेली BS6 Hero Pleasure Plus 110 FI स्कूटर काही दिवसांपूर्वीच लाँच केली आहे. ही स्कूटर स्टील व्हील आणि अ‍ॅलॉय व्हील अशा दोन व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. हिरो प्लेजर प्लस स्कूटरचे अपडेटेज व्हर्जन कंपनीच्या जयपूर येथील प्रकल्पात तयार करण्यात आले आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हा आणि टीव्हीएस स्कूटी झेस्ट यांसारख्या स्कूटरसोबत प्लेजर प्लसची टक्कर असेल.

गेल्यावर्षी कंपनीने HF Deluxe BS-VI आणि Splendor iSmart या दोन बाइक BS6 व्हर्जनमध्ये लाँच केल्या होत्या, त्यानंतर आता प्लेजर प्लस लाँच करण्यात आली आहे. जुन्या बीएस 4 मॉडेलपेक्षा नव्या प्लेजर प्लसचा मायलेज 10 टक्क्यांनी जास्त असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. प्लेजर प्लस स्कूटरमध्ये 110 सीसीचे सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन इंजिन 8 बीएचपीची ऊर्जा आणि 8.7 एनएम टॉर्क निर्माण करते. स्कूटरच्या हेडलँम्पला चारही बाजूने क्रोम फिनिश, क्रोम थ्रीडी बॅजिंग, नवीन अॅलॉय व्हील्ससह काही वैशिष्ट्यपूर्ण फीचर आहेत. मॅट रेड, मॅट ग्रीन, मॅट अॅक्सिस ग्रे, ग्लॉसी ब्लॅक, ग्लॉसी ब्लू, ग्लॉसी व्हाइट आणि ग्लॉसी रेड अशा आकर्षक ७ रंगांमध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे.

Watch Indian-origin contestant makes pani puri for MasterChef Australia judges, netizens react
मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाच्या जजला भारतीय पाणीपुरीची पडली भुरळ! खाता क्षणी….व्हिडीओ तुफान व्हायरल
candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
a woman broke the TV while playing bowling
“वो स्त्री है कुछ भी कर सकती है…” खेळण्याच्या नादात महिलेने चक्क फोडला टिव्ही, व्हिडीओ होतोय व्हायरल

आणखी वाचा – Piaggio India ची नवीन इ-स्कुटी, सिंगल चार्जिंगमध्ये 100 किमी प्रवास

किंमत –
BS6 Hero Pleasure Plus 110 FI स्कूटरची किंमत BS4 मॉडेलपेक्षा ६,३०० रुपयांनी जास्त आहे. भारतीय बाजारात या स्कूटरची किंमत 54,800 आणि 56,800 रुपये आहे.