तंत्रज्ञानाची कमाल आणि शोध याची सांगड घालून फ्लोरिडामधील एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अॅपद्वारे रंग बदलता येणारं कापड तयार केलं आहे. द कॉलेज ऑफ ऑप्टिक्स अँड फोटोनिक्स कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी मिळून हे कापड तयार केलं आहे. यापासून पर्स आणि बॅग्स तयार करण्यात आल्या आहेत. ज्याचा रंग आणि त्यावरील पॅर्टन ग्राहकांना केवळ मोबाइल अॅपद्वारे बदलता येणार आहे.

प्रत्येक धाग्यामध्ये मेटल मायक्रो वायर एम्बेड करण्यात आली आहे. या वायरमधून विद्युत प्रवाह जाईल यामुळे किंचितसं तापमान वाढून धाग्याचा रंग बदलेल असा दावा त्यांनी केली आहे. कापडाचा पोत अधिक मुलायम कसा करता येईल यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. जर या प्रयत्नाला यश आलं तर लवकरच स्मार्टफोनद्वारे रंग बदलणारे कपडेही बाजारात उपलब्ध होतील असं हे विद्यार्थी म्हणाले आहे. एका क्लिकवर रंग बदलणारे कपडे जर तयार करण्यात यश आलं तर याचा लोकांना खूपच फायदा होईल विशेषत: सैनिकांसाठी या कापडाचा वापर होऊ शकतो असं या टीमला वाटतं आहे.

सध्या हे तंत्र वापरून बॅग आणि पर्स तयार करण्यात आल्या आहेत ज्या या वर्षाअखेरपर्यंत बाजारात उपलब्ध होतील असा प्रयत्न ही टीम करत आहे.