उन्हाळा म्हटलं की कडक ऊन, घशाला पडलेली कोरड हे सारं आलंच मात्र या साऱ्यातून जी गोष्ट तरुणाईचं लक्ष वेधते ते म्हणजे बाजारात येणारी नवनवीन फॅशन. याच ऋतूमध्ये तरुणाईला नवी स्टाइल कॅरी करता येते. त्यामुळे फॅशनेबल कपडे, ट्रेण्डी सनग्लासेस, अॅक्सीसिरीज ओघाओघाने आलेच. सध्याच्या काळात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची निवड करताना संभ्रमात पडायला होतं. विशेष म्हणजे अनेक वेळा सनग्लासेस घेताना हा पेच नक्कीच निर्माण होतो. मात्र उन्हाळ्यात कूल राहण्यासोबतच असे काही खास सनग्लासेस आहेत जे तुम्हाला कुल लूकसुद्धा देतील.

सनग्लासेसच्या ट्रेण्डकडे हल्ली सगळ्यांचं लक्ष आहे. अनेक चित्रपटांमधून आणि इतर माध्यमांमधून सेलेब्रिटींची गॉगलवाली छबी सतत दिसत असते. त्यातूनच वेगवेगळ्या सनग्लासेसचे ट्रेण्ड्स सेट झाले आहेत. उन्हाळी फॅशनमध्ये सनग्लासेस मस्ट. चेहऱ्याला सूट होणारा गॉगल असेल तर व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच उठाव मिळतो. क्लासी लुक मिळतो. या सनग्लासेसच्या सध्याच्या चलतीतल्या ट्रेण्ड्सविषयी.

leopard fell into well for water, leopard water washim,
जंगलात पाणी मिळेना, वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला; तहान भागविण्यासाठी…
environmentalist initiative to fill dry water bodies for wildlife
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा
how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी

१. ट्रान्सपरन्ट सनग्लासेस : गेल्या काही वर्षांपासून हे सनग्लासेस तरुणाईमधील आकर्षण ठरत आहेत. त्यामुळे बाजारात हे सनग्लासेस कोणत्याही ऋतूमध्ये उपलब्ध असतात. यात रेट्रो आणि मॉडर्न स्टाईल या दोन्ही प्रकारचे गॉगल्स ट्रान्सपरन्ट लुकमध्ये मोडतात तसेच यात ट्रान्सपरन्ट ग्लासेस आणि फ्रेम असून बेबी पिंक, नारंगी, कॅन्डी कलर, ग्रेडियंट कलर यात उपलब्ध आहेत.

२. ड्ट हेक्सॅगॉन शेप्ड – षटकोनी आकाराचे हे सनग्लासेस जास्त क्लासी दिसतात. त्याचा आकार आणि मेटॅलिक फ्रेम्स तुमच्या चेहऱ्याला एक वेगळा लुक देतात. हे सनग्लासेस युनिसेक्समध्ये उपलब्ध असून यात रेट्रो लुकही आहे ज्यात काळ्या ग्लासेसवर गोल्डन रिम किंवा प्लेन ग्लासेसवर गोल्डन ग्रीन, ग्रे, वाईन बरगंडी, अ‍ॅल्यूमिनिअम अशा रंगाच्या फ्रेम्स आहेत. ऑक्टागॉनल, पॉलिगॉनल आणि स्क्वेअर असे प्रकारही यात उपलब्ध आहेत. स्क्वेअर सनग्लासेस हे मेन्सवेअरमध्ये अधिक आहेत. यावेळी समरमध्ये हा लुक ट्रेण्डमध्ये आहे आणि खासकरून उन्हाळ्यात लग्नसमारंभात ट्रॅडिशनल किंवा फ्लोरल आऊटफिटवर हे सनग्लासेस नक्कीच मॅच होतील.

३. शील्ड सनग्लासेस – या सनग्लासेसची फ्रेम मोठी असल्यामुळे संपूर्ण डोळ्यांचं संरक्षण होतं. या सनग्लासेसमुळे चेहऱ्याला वेगळा लूक मिळण्यासोबतच व्यक्तीमत्वातही फरक जाणवतो. हे सनग्लासेस कोणत्याही वयोगटातील व्यक्ती वापरु शकतात. या अनेक रंग उपलब्ध असून काळ्या रंगाच्या फ्रेमला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं दिसून येतं.

४. रेड फ्रेम – ५० ते ६० च्या दशकामध्ये या फ्रेमची मोठ्या प्रमाणावर चलती होती. जुन्या काळातली हीच फॅशन पुन्हा एकदा तरुणाईच्या पसंतीत उतरत आहे. या सनग्लासेसमध्ये हटके आणि अॅक्ट्राक्टीव्ह लूक मिळतो. ही फ्रेम मोठ्या आणि लहान अशा दोन्ही आकारात मिळते.

५. स्पॉर्टी सनग्लासेस – हे सनग्लासेस कायम ट्रेण्डिंगमध्ये राहणारे आहेत. बाइक रायडिंग, सायकलिंग करताना हा सनग्लासेसचा सर्वाधिक वापर केला जातो.