Diwali Fashion Tips: दिवाळी सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. साफसफाई, खरेदी, सजावट, फराळासाठी लगबग सुरू झाली आहे. अनेक ऑफिसेसमध्येही दिवाळीनिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पण, यावर्षी दिवाळीत कोणता ड्रेस किंवा साडी वेअर करून ऑफिसमध्ये जायचे हे ठरवता येत नाहीये; तर तुम्हाला खालील टिप्स नक्की उपयुक्त ठरू शकतात. सणानिमित्त प्रत्येकाला परफेक्ट लूक कॅरी करायचा असतो. जेणे करून ते इतरांपेक्षा सुंदर आणि स्टायलिश दिसतील. विशेषत: महिला याबाबत खूप सजग असतात. यामुळे तुम्हालाही दिवाळीनिमित्त ऑफिसमध्ये इतरांपेक्षा स्टायलिश दिसायचे असेल तर खालील लुक्स नक्की ट्राय करा.

तुमच्या ड्रेसिंग सेन्सवरून साधारण तुमची पर्सनालिटी कळते. विशेषत: ऑफिसमध्ये अनेकदा तुम्हाला कपड्यांवरून जज केले जाते. यात सणानिमित्त तुम्ही कोणते कपडे वेअर करून येणार याकडे सर्वांचे लक्ष असते.

csk vs pbks selfish ms dhoni sends back daryl mitchell slammed for denying single ipl 2024
“धोनी तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, स्वार्थी…”, PBKS vs CSK सामन्यातील धोनीच्या त्या कृतीवर भडकले चाहते, पाहा VIDEO
diy summer skin care never apply these 4 kitchen ingredients on face can harm your skin
Skin Care : स्वयंपाकघरातील ‘हे’ ४ पदार्थ चुकूनही चेहऱ्यावर लावू नका; अन्यथा…
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा

Diwali Padwa 2023 : यंदा दिवाळी पाडवा नेमका कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

कुर्ता आणि प्लाझो

तुम्हाला ऑफिसमध्ये आरामदायी आणि स्टायलिश दिसायचे असेल तर एथनिक स्टाइल कुर्ती-प्लाझो वेअर करू शकता. यात तुम्हाला कुर्त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स निवडू शकता. फ्रंट स्लिटच्या लाँग कुर्त्याबरोबर प्लाझो दिसायलाही खूप स्टायलिश दिसतो. या कुर्ती सेटवर तुम्ही मॅचिंग इयररिंग्स घाला.

बॉर्डरवाली साडी

जर तुम्ही साडीमध्ये कंफर्टेबल असाल तर साडी नेसून ऑफिसला जाऊ शकता. सिल्क किंवा कॉटन फॅब्रिक बॉर्डरच्या साडीबरोबर स्लीव्हलेस किंवा हाफ स्लीव्ह ब्लाउज घालू शकता. हा लूक क्लासी दिसेल आणि तुम्हाला ऑफिससाठी परफेक्ट बनवेल. यावर तुम्ही अगदी साधी सिंपल ज्वेलरी कॅरी करू शकता.

शरारा सेट

आजकाल शरारा खूपच ट्रेंडमध्ये आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॉर्ट कुर्तीसोबत शरारा मॅच करू शकता. तुम्हाला आवडत असल्यास यावर नेट एम्ब्रॉयडरी केलेल्या दुपट्ट्याही कॅरी करू शकता. हा लुक तुम्हाला फेस्टिव्हलसाठी एकदम परफेक्ट दिसेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शरारासोबत ब्रेसलेट किंवा बांगड्याही मॅच करू शकता. जर तुम्हाला हेवी लूक नको असेल तर तुम्ही प्रिंटेड कुर्ती सेट घालू शकता.

धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन ते भाऊबीज यंदा दिवाळीत ‘या’ तिथी व मुहूर्त लक्षात ठेवा! यंदा दिवाळीची पहिली अंघोळ कधी?

अनारकली कुर्ता सेट

ऑफिसच्या दिवाळी पार्टीसाठी अनारकली कुर्ताही सुंदर दिसेल. तुम्ही अनारकली कुर्त्याबरोबर कोणताही बॉटम विअर पेअर करू शकता. आजकाल अनारकली कुर्ता, चुडीदार पायजमाबरोबरचं अँकल लेंथ पॅन्ट आणि पलाझोदेखील ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास, अनारकली कुर्त्याबरोबर पलाझो वेअर करू शकता. हा तुम्हाला एथनिक आणि सुंदर लूक देईल. अनारकली कुर्ता सेट निवडताना तो अगदी सिंगल साध्या रंगांचा असावा. अनारकली कुर्ता सेटमध्येही तुम्ही कंफर्टेबल फिल कराल.

लखनवी कुर्ता सेट

जर तुम्हाला जास्त हेवी ड्रेसेसमध्ये कम्फर्टेबल वाटत नसेल, तर तुम्ही चिकनकारी वर्क असलेला लखनवी कुर्ता आणि त्याखाली प्लाझो कॅरी करू शकता. जास्त हेवी ड्रेसेसपेक्षा हे सिंपल चिकनकारी वर्क केलेले लखनवी कुर्ता तुम्ही कुठेही कॅरी करून जाऊ शकता. जर तुम्हाला पांढरा रंग खूप आवडत असेल, तर तुम्ही त्यावर रंगीत चिकनकारी एम्ब्रॉयडरी असलेला लखनवी कुर्ता कॅरी करू शकता. या चिकनकारी कुर्त्याची खास गोष्ट म्हणजे यात तुम्हाला आवडीच्या रंगांचे पर्याय आहेत.