पुणे प्रतिनिधी: पुणे लोकसभा मतदार संघाच काही तासावर मतदान येऊन ठेपल आहे.तर या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ,महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर,वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे, एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके हे चार उमेदवार आहेत.मात्र त्यापूर्वी सहकारनगर भागात भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पैशांचे वाटप करीत आहेत.त्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलीस आणि निवडणुक आयोगाचे अधिकार्‍यांनी कारवाई करावी,या मागणीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये जवळपास अडीच तास दोन ठिय्या आंदोलन केले.मात्र यामुळे पोलिस स्टेशन बाहेर भाजप आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने येऊन जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहण्यास मिळाले.यामुळे सहकारनगर भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या सर्व घडामोडी लक्षात घेऊन रवींद्र धंगेकर यांची समजूत काढण्यात पोलिसांना यश आल्याचे पाहण्यास मिळाले.त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रवींद्र धंगेकर म्हणाले की,सहकारनगर भागात पैशांच वाटप करणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांची नाव पोलिसांना दिली आहेत.त्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याच आश्वासन दिल्यानंतर, ठिय्या आंदोलन मागे घेत आहे.पुन्हा पैशांच वाटप करणारे कार्यकर्ते आढळून आल्यास,आता थेट पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनास बसणार आहे.त्याच बरोबर करोना काळात ज्यांची (महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ) ४०० पट संपत्ती वाढली. त्यांचा आजच्या निवडणुकीत तोच पैसा बाहेर आला आहे.त्यामुळे त्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करित असल्याच सांगत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर त्यांनी टीका केली.

modi cabinet meeting
सकाळी शेतकऱ्यांना खूशखबर, आता सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय; मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत काय झालं?
Mahayuti base remains Analysis by Devendra Fadnavis
महायुतीचा जनाधार कायम! देवेंद्र फडणवीस यांचे विश्लेषण, उद्धव यांना सहानुभूती नसल्याचा दावा
Chandrapur lok sabha seat, Congress MP Pratibha Dhanorkar s Claim of bjp office bearers Support her in election, Chandrapur bjp office bearers,
चंद्रपूर : धानोरकरांच्या ‘त्या’ वक्तव्याने भाजपत अस्वस्थता……पडद्यामागे राहून…
maha vikas aghadi workers cheering after victory
मतमोजणीस्थळी मविआचा जल्लोष, महायुतीची निराशा; अंबड येथील मतमोजणी केंद्राबाहेरील कार्यकर्त्यांचा जल्लोष
sugarcane, Raju Shetty,
मागील हंगामातील उसाचे प्रतिटन १०० रुपये द्या – राजू शेट्टी यांची मागणी; आचारसंहितेनंतर बैठकीचे आयोजन – पालकमंत्री मुश्रीफ
Opposition criticizes Ajit Pawar for not reacting on Kalyaninagar accident case
पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीची चर्चा, कल्याणीनगर दुर्घटनाप्रकरणी भूमिका न घेतल्याची अजित पवारांवर विरोधकांची टीका
Shram Parihar at Swami Vivekananda Udyan in Airoli Sector
उद्यानात कार्यकर्त्यांचा ‘श्रमपरिहार’! नवी मुंबई पोलीस तसेच महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
mihir kotecha office attack
Video: “आज मी शपथ घेतो की…”, कार्यालयाबाहेरील राड्यानंतर मिहीर कोटेचा यांचं ठाकरे गटाला जाहीर आव्हान; म्हणाले, “निवडून आल्यानंतर…”