पुणे: पुणे लोकसभेतील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून सहकारनगर भागात पैसे वाटप करीत असल्याचा आरोप करित महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर दोन तासापासून पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलनास बसले आहे.या सर्व घडामोडी दरम्यान भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे,आमदार माधुरी यासह आजी माजी पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले.
त्या भेटीनंतर आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या की,रवींद्र धंगेकर हे आमदार आहेत.त्यांना एका गोष्टींची माहिती पाहिजे की,कोणतीही चुकीची गोष्ट सुरू आहे.त्याबाबत त्यांना माहिती असल्यावर,त्यांनी पोलिसांना कळविले पाहिजे.पण केवळ स्टंटबाजी करायची,कसबा पोटनिवडणुकीत देखील त्यांनी असा प्रकार केला होता. या निवडणुकीत त्यांना पराभव दिसत आहे.त्यामुळे स्टंटबाजी सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांची भेट घेतली असून एकूणच सर्व परिस्थिती त्यांना सांगितली आहे.सहकार भागातील परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणावी,अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच रवींद्र धंगेकर यांच्याकडे कोणतेही पुरावे नसून ते बिनबुडाचे आरोप करित आहे.रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता संस्थेमार्फत काही दिवसापूर्वी साड्या वाटण्यात आल्या होत्या.त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.त्यावर रवींद्र धंगेकर यांनी अगोदर बोलाव, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.