Health Tips For Summer Vacation : प्रवास करायला अनेकांना आवडते. मग ती लहान मुलं असो वा मोठ्या व्यक्ती. यात कुटुंबासह फिरण्यात एक वेगळा आनंद असतो. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यात मुलांच्या परीक्षा संपल्यावर अनेक जण उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये फिरायला जायचा प्लॅन करतात. पण मार्चपासूनच देशातील सर्वच भागांत तापमान वाढू लागलेय. अशा परिस्थितीत लोकांना उन्हाचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तुम्ही कुटुंबासह सहलीला जाणार असाल, तर जातना तुमच्याबरोबर चार महत्त्वाच्या गोष्टी घ्यायला विसरू नका. या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ते आपण जाणून घेऊ…

१) थंड पाण्याच्या बाटल्या

उन्हाळ्यात फिरायला जाण्यापूर्वी सर्वप्रथम पाण्याच्या थंडगार बाटल्या बरोबर घेतल्या पाहिजेत. उन्हाळ्यात खूप तहान लागते. अशा वेळी थंड पाण्याच्या शोधात इकडे-तिकडे भटकावे लागते. आजकाल बाजारात पाण्याच्या बाटल्या कमी किमतीत मिळतात. त्यात अनेक तास पाणी थंड राहते.

Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
mohena kumari welcomes baby girl
प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न
How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा

२) सुती कपडे पॅक करा

जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाणार असाल, तर सुती कपडे बरोबर घ्या. सुती कपड्यांव्यतिरिक्त हलक्या फॅब्रिकचे कपडेदेखील पॅक केले पाहिजेत. बरेचदा असे दिसून येते की, लोक हलक्या सुती कपड्यांऐवजी पॉलिस्टर आणि इतर फॅब्रिकचे कपडे पॅक करतात; जे उन्हात घातल्यानंतर खूप त्रास होतो.

३) सन क्रीम घ्या

उन्हाळ्याच्या सुटीत बाहेर जाण्यापूर्वी सन क्रीम बरोबर घ्या. कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचेची जळजळ सुरू होते. कधी कधी शरीराच्या अनेक भागांमध्ये खाज सुटणेही सुरू होते. त्यातच ‘सनबर्न’ची समस्या उदभवते.

जर तुम्हालाही कडक सूर्यप्रकाशाचा त्रास होत असेल, तर तुम्ही तुमच्या बॅगमध्ये सन क्रीम नक्कीच पॅक करा. तुम्ही तुमच्या त्वचेनुसार सन क्रीम निवडली पाहिजे हेही लक्षात घ्या.

४) मेडिकल किट

उन्हाळ्यात फिरायला जाण्यापूर्वी काही जण इतर सामानासह मेडिकल किट पॅक करणे आवश्यक मानत नाहीत; परंतु तुम्ही मेडिकल किट सोबत घेणे खूप महत्त्वाचे आहे.

या मेडिकल किटमध्ये तुम्ही उलट्या, ताप, सर्दी किंवा वेदनाशामक औषधांसोबत ORS देखील पॅक केले पाहिजे. प्रवास करताना उलट्या किंवा उष्माघाताची भीती असल्यास तुम्ही ORS वापरू शकता.

इतर ट्रॅव्हल टिप्स

१) प्रवासासाठी तुम्ही हेल्दी फास्ट फूड पॅक करू शकता.
२) उन्हाळ्याच्या सुटीत प्रवासाला जाण्यापूर्वी सनग्लासेस, टोपी पॅक करायलाही विसरू नका.
३) वेळोवेळी लिक्विड ड्रिंक्सचे सेवन करीत राहा.
४) रात्री शांत झोपण्यासाठी एसी रूम बुक करा.