Vyaghrasana Yoga : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा आपण स्वत:कडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आठ नऊ तास बसून काम केल्याने पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास वाढतो. सतत लॅपटॉप किंवा मोबाईल बघितल्यामुळे पाठीचा कणा आणि मान दुखते आणि संपूर्ण शरीराचं पोश्चरचं बिघडते. जर आपल्याला एक चांगली जीवनशैली अंगीकाराची असेल तर नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. आज आपण एका योगासनाविषयी जाणून घेणार आहोत जो नियमित केल्याने तुमच्या मणक्याची लवचिकता वाढू शकते आणि इतर आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात.

इन्स्टाग्रामवर योग अभ्यासक मृणालिनी यांनी त्यांच्या अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी व्याघ्रासन योगा कसा करायचा आणि त्याचे फायदे सांगितले आहे. आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
IIT student to join ISIS
आयआयटीचा विद्यार्थी ISIS च्या संपर्कात? दहशतवादी गटात सामील होण्याआधीच…; आसाम पोलिसांची माहिती

योग अभ्यासक मृणालिनी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत तुम्हाला त्या व्याघ्रासन योगा करून दाखवत आहे. . व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे वाघाच्या स्थितीत राहा. दोन्ही हाताचे पंजे जमीनीवर ठेवावे. दोन्ही पाय गुडघ्यावर ठेवावे. एक पाय उचलावा आणि हाताच्या दिशेने न्यावा त्यानंतर तोच पाय वरच्या उलट दिशेने न्यावा. दोन्ही पायांनी तीन ते पाच आवर्तने करावीत. नीट समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
या व्हिडीओमध्ये त्यांनी याचे फायदे सुद्धा सांगितले आहेत.
१.पाठदुखी व कंबरदुखीवर आराम मिळतो.
२. पाठीचा कणा व मांड्याची लवचिकता वाढते.
३. शरीराचं पोश्चर व्यवस्थित राहण्यास मदत होते.
४.शरीराचा तोल किंवा संतुलन सुधारण्यास मदत होते.
५. पचनसंस्था आणि श्वसनसंस्थेचे कार्य सुधारते.

हेही वाचा : Teddy Day 2024 : मळलेला टेडी कसा धुवायचा? फक्त एका साबणाने असा करा साफ, नव्यासारखा होईल स्वच्छ

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “व्याघ्र म्हणजेच वाघ. वाघाने शरीराला ताण दिल्यावर जशी शरीराची स्थिती दिसते तशी काहीशी या आसनात शरीराची स्थिती होते.व्याघ्रासनाच्या नियमित सरावाने शरीराला अनेक फायदे मिळतात.” पुढे त्यांनी लिहिलेय, “संधिवात, गुडघेदुखी, खांदेदुखी असल्यास हे आसन करणे टाळावे”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान” तर एका युजरने विचारलेय, “पिरेड्समध्ये कोणते योगा करावेत?”