जर तुमचं मतदान ओळखपत्र हरवलं असेल तर त्याची डुप्लिकेट कॉपी मिळवण्यासाठी आता तुम्हाला सरकारी कार्लालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. केंद्रीय निवडणूक आयोग सोमवारपासून e-EPIC सुविधा सुरू करत आहे. याद्वारे तुम्ही घरबसल्या मतदार ओळखपत्राची पीडीएफ कॉपी डाउनलोड करु शकाल. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त डिजीटल मतदान ओळखपत्राची सुरूवात होत आहे.

ही सुविधा लाँच झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय मतदार ओळखपत्र तुमच्या मोबाइल फोन किंवा पर्सनल कंम्प्युटरवर डाउनलोड करु शकतात. याशिवाय हे इ-वोटर आयडी कार्ड डिजिटल लॉकरमध्येही सुरक्षित ठेवता येईल, तसेच डिजिटल फॉर्मेटमध्ये प्रिंटही करता येईल. निवडणूक आयोग दोन टप्प्यात ही सेवा सुरू करणार आहे. आजपासून अर्थात २५ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत केवळ नवीन मतदार, ज्यांनी वोटर आयडीसाठी अर्ज केलाय आणि ज्यांचे मोबाइल नंबर आयोगाकडे रजिस्टर्ड आहेत असे युजर डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करु शकतात.

upsc capf recruitment 2024 registration begins apply for 506 assistant commandant
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ‘इतक्या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या कशी होईल निवड, पगार आणि अर्जाची प्रक्रिया
pune rte marathi news
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
Election Commissions eye on the content of Paid News and Social Media here is Regulations
सावधान! ‘पेडन्यूज’ व ‘सोशल मीडिया’वरील मजकुरावर आयोगाची नजर, जाणून घ्या नियमावली

तर, 1 फेब्रुवारीपासून सर्व मतदार ( ज्यांचा मोबाइल नंबर आयोगाकडे रजिस्टर्ड आहे ) आपल्या वोटर आयडीसाठी डिजिटल कॉपी डाउनलोड करु शकतात. ज्यांचा मोबाइल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेला नसेल त्यांना स्वतःबाबतचा सर्व तपशील पुन्हा पडताळावा लागेल आणि मोबाइल नंबर लिंक करावा लागेल. नंतरच वोटर आयडी डाउनलोड करता येईल.

डिजीटल वोटर कार्ड डाउनलोड करण्यासाठी :- 
डिजीटल वोटर कार्ड डाउनलोड करण्यासाठी https://voterportal.eci.gov.in/ आणि https://nvsp.in/ हे दोन संकेतस्थळ आहेत. याशिवाय अँड्रॉइड मोबाइल युजर https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
या लिंकवर आणि आयओएस युजर https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004 या लिंकवरही टॅप करु शकतात.