Why You Should Eat Rice Daily: वाफाळता भात हा अनेकांचा वीक पॉईंट असतो. तुम्ही शाकाहारी असाल किंवा मांसाहारी दोन्ही प्रकारांमध्ये भाताचे असंख्य फॅन्स आहेत. मऊ भात, त्यावर वरण, तूप, लिंबू आणि जोडीने कोशिंबीर असाही मेन्यू कमाल लागतो तर त्याच्या अगदी विरुद्ध झणझणीत चिकन- मटण किंवा मच्छीचा सार, सोलकढी आणि कांदा- लिंबू या कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा भात आपली जागा अगदी मस्त बनवून घेतो. पण हा भात जितका प्रसिद्ध आहे तितकेच त्याबाबतचे गैरसमज सुद्धा प्रचलित आहेत. भात खाऊन वजन वाढतं, भात पचतच नाही. भात खाल्ला तर सवयच लागते असे कितीतरी विचार आपल्या मनात असतात. त्यामुळे भात आवडत असला तरी खाताना अनेकांच्या मनात अपराध्याची भावना येत असते.

असं केल्याने ना आपण नीट जेवणाची मजा घेऊ शकता ना त्याचे फायदे मिळवू शकता त्यामुळे खाताना भलेही तुम्ही कमी प्रमाणात खा पण मनमोकळेपणाने खा हे सूत्र लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. याच भारतीय पदार्थांच्या बाबत हेच सूत्र जगभरात पोहोचवणाऱ्या सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर भाताचे फायदे शेअर केले आहेत. ही पोस्ट जरी जुनी असली तरी यामध्ये नमूद केलेले फायदे हे कोणत्याही फॅन्सी डाएटचा अवलंब करण्याआधी नक्कीच विचारात घेण्यासारखे आहेत.

Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Health Special Does pollution cause stomach disorders
Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?

तांदळाचे फायदे

आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले: तांदूळ तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले आहे. भातामुळे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीयाच्या वाढीला समर्थन मिळते. तांदूळ हा एक उत्तम प्री-बायोटिक आहे.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते: जेव्हा तुम्ही भारतीय जसे खातात – डाळी, दही, कढी, शेंगा, तूप अगदी मांसाबरोबर तशा पद्धतीने भात खाता तेव्हा रक्तातील साखरेचा स्तर स्थिर राहण्यास मदत होऊ शकते.

पचनासाठी: भातात फायबर असल्याने सामान्य समजाच्या विरुद्ध भात पचायला जड नसतो. उलट प्रमाणात खाल्ल्यास भात पचायला सोपा आणि पोटाला हलका असतो.

हार्मोन्सचे संतुलन : भात खाल्ल्याने झोप येते ज्यामुळे हार्मोनल संतुलन चांगले राहते. दिवेकर यांच्या मते, विशेषत: वृद्ध आणि तरुण दोघांनाही हार्मोनल संतुलनाची मदत होते.

त्वचेसाठी चांगले: तुमच्या आवडत्या डाळीसह अगदी रोज जरी भात खाल्ला तरी तुमच्या त्वचेला फायदा होऊ शकतो. दिवेकर सांगतात की, “भातामुळे त्वचेसाठी उत्तम, उच्च प्रोलॅक्टिनची पातळी वाढते यामुळे त्वचेची छिद्रे कमी होऊ शकतात.”

केसांच्या वाढीस चालना मिळते: दिवेकर म्हणतात की विशेषतः थायरॉईडच्या त्रासामुळे ज्यांचे केस गळत असतात किंवा वाढ खुंटलेली असते त्यांना भात खाल्ल्याने केसांची वाढ सुधारता येते.

हे ही वाचा<< मैदा आतड्यांमध्ये चिकटून बसतो का? तज्ज्ञांनी सोडवला वाद; सांगितलं, आहारात मैदा कसा समाविष्ट करावा

दरम्यान, हे ही लक्षात घ्या तुमच्या शरीराची गरज व प्रतिक्रिया ही इतरांपेक्षा वेगळी असू शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आपल्याला डॉक्टरांनी भाताचे सेवन टाळण्यास सांगितले असल्यास सल्ल्याशिवाय भात खाऊ नये.