बऱ्याचदा आपण सुकामेवा खाताना केवळ काजू, बदाम, मणुके, पिस्ता हे खाण्यावर जास्त भर देतो. परंतु, सुक्यामेव्यातील अक्रोड हा कायमच दुर्लक्षित राहतो. खरं तर अक्रोड खाण्याचे असंख्य फायदे आहेत. त्यामुळे अक्रोड खाण्याचे नेमके फायदे कोणते हे जाणून घेऊयात.

अक्रोड खाण्याचे फायदे

१. अक्रोड रक्तदोष, वातरक्त यावर गुणकारी

२.वजन वाढते.

३. शरीरात वेगवेगळय़ा प्रकारच्या गाठींवर अक्रोड गराचा लेप उपयुक्त आहे.

४. बाळंतीणीस दूध कमी येत असल्यास गव्हाच्या चपातीत अक्रोड गर मिसळून पोळी खावी.

५. वारंवार लघवी होत असल्यास तूप-खडीसाखरेसोबत अक्रोड चूर्ण खावे.

६. कोठा जड असल्यास किंवा शौचास नीट होत नसल्यास अक्रोड तेलाचा वापर करावा.

७. चक्कर येणे, गरगरणे, भोवळ येणे या तक्रारींमध्ये अक्रोड खावा.

८. मासिकपाळीत स्त्राव कमी येणे, साफ न होणे या तक्रारी असणाऱ्या स्त्रियांनी अक्रोड नियमित खावे.

९. पित्ताचा त्रास होत असल्याच अक्रोड खावा.

१०. केसांची वाढ होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)