नवीन वर्ष म्हटले की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या अनोख्या ऑफर्स जाहीर करतात. सध्या ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढलेले असताना फ्लिपकार्ट या ई-क़मर्स वेबसाईटने मोबाईल बोनान्झ सेल लॉन्च केला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ३ जानेवारी ते ५ जानेवारी या कालावधीत फ्लिपकार्टवर हा सेल असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर या सेलचा नक्की विचार करा आणि आकर्षक ऑफर्स मिळवा.

या सेलमध्ये खूप सवलतीत स्मार्टफोन मिळणार असल्याने अनेकांच्या या ई-क़मर्स वेबसाइटवर उड्या पडतील अशी आशा आहे. यामध्ये शाओमी मी A1, पिक्सेल 2, पिक्सेल 2 XL, Moto G5 प्लस, Redmi नोट 4, लेनोवो K5 नोट, सॅमसंग S7 यावर भरघोस ऑफर असणार आहे. शाओमी ए 1- फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला शाओमी ए 1 वर 2000 रुपये सूट मिळेल. त्यामुळे १४,९९९ रुपयांचा हा फोन तुम्हाला १२,९९९ रूपयांना मिळेल. यामधील सर्वात खास ऑफर गुगल पिक्सल २ वर देण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन पेमेंट केल्यास या फोनवर १३ हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन ३९,९९९ रुपयांना मिळेल. एवढेच नाही तर तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज म्हणून दिल्यास त्यावरही आणखी १८ हजारांची सूट मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही ऑफर्सनंतर या स्मार्टफोनची किंमत २१,९९९ रुपये होईल.

पिक्सेल 2 XL वर २ हजार रुपयांची एक्स्चेंज ऑफर मिळाल्याने हा स्मार्टफोन ५२,९९९ रुपयांना मिळेल. तर मोटो जी 5 प्लस हा १६,९९९ रुपयांचा फोन फ्लिपकार्टच्या ऑफरमध्ये ९,९९९ रुपयांना मिळेल. शाओमीच्या रेडमी नोट 4 या फोनवर दोन हजार रुपये सूट देण्यात आल्याने हा फोन १०,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. सॅमसंग गॅलॅक्सी A7 हा फोन केवळ २६,९९९ रुपयांना मिळेल. यामध्ये १५ हजारची सूट आणि १८ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय सॅमसंग गॅलेक्सी ऑन ५६,४९० रुपये, पॅनसोनिक इलुगा रे मॅक्स ९,९९९ रुपये, पॅनसोनिक इलुगा ए3 ६,९९९ रुपयांना, सॅमसंग गॅलेक्सी G3 प्रो 2 जीबी ६,९९० रुपयांना मिळेल.