scorecardresearch

Premium

Friendship Day 2023 : फ्रेंडशिप डेला पाठवा मित्र मैत्रीणींना एकापेक्षा एक भारी चारोळ्या, एकदा क्लिक करून पाहाच

Friendship Day 2023 : फ्रेंडशिप डे हा मैत्री साजरी करण्याचा दिवस आहे. या दिवशी अनेकजण आपल्या मित्र-मैत्रीनी एकेमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही काही हटके मैत्रींवर आधारीत चारोळ्या पाठवून सुद्धा मित्रांना शुभेच्छा देऊ शकता..

Friendship Day 2023 send amazing charolya quotes in marathi to friends check list
Friendship Day 2023 : फ्रेंडशिप डेला पाठवा मित्र मैत्रीणींना एकापेक्षा एक भारी चारोळ्या, एकदा क्लिक करुन पाहाच (Photo : दुनियादारी, मराठी चित्रपट)

Friendship Day 2023 : मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर नातं आहे. मैत्री बालपणीची असो की म्हातारपणाची, ती नेहमीच खास असते. खरं तर चांगला मित्र किंवा मैत्रीण भेटणे, हा नशीबाचा भाग आहे. याच मैत्रीविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ६ ऑगस्ट रोजी भारतासह जगभरात फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा केला जातो.

फ्रेंडशिप डे हा मैत्री साजरी करण्याचा दिवस आहे. या दिवशी अनेकजण आपल्या मित्र-मैत्रीनी एकेमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही काही हटके मैत्रींवर आधारीत चारोळ्या पाठवून सुद्धा मित्रांना शुभेच्छा देऊ शकता..

Narendra Modi wished Mohammed Shami his best for recovery from heel surgery
Mohammed Shami : ”तुम्ही या दुखापतीवर धैर्याने…”, शमीच्या शस्त्रक्रियेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत दिला धीर
fm nirmala sitharaman directed regulators to take more stringent steps against fraudulent loan apps
फसव्या ‘लोन ॲप’वर अंकुश; अर्थमंत्री सीतारामन यांचे नियामकांना आणखी कठोर पावले टाकण्याचे निर्देश
Womens Health is there possible to normal delivery after one seizure
स्त्री आरोग्य : एकदा ‘सिझर’ झाल्यावर दुसऱ्यावेळी नॉर्मल प्रसूती होते का?
17 year old stabbed to death by two minors
दोन मित्रांनी अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून केली हत्या

हेही वाचा :पालकांनो ही कामे करा, तुमची मुलं कधीच राहणार नाही दु:खी; स्वत:हून तुम्हाला सांगणार त्यांच्या मनातील गोष्टी

१. मैत्री म्हणजे आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
मैत्री म्हणजे जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
मैत्री म्हणजे दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच जी सर्व काही समजते, ती म्हणजे मैञी असते.

२. सुर्यासारखे तेज असावे
चांदण्यासारखी शीतलता असावी
समुद्रासारखी प्रखरता असावी
आणि तुझ्यासारखी मैत्री असावी

३. निळ्याभोर गगनाचा अंत कधी होत नाही
अन् तुझ्या माझ्या मैत्रीचा उल्लेख शब्दात करता येत नाही

४. मित्र असावा तर एक श्रीकृष्ण सारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.

५. जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती मैत्री…

हेही वाचा : Friendship Day 2023 : या वर्षी केव्हा आहे ‘फ्रेंडशिप डे’? जाणून घ्या इतिहास अन् बरंच काही ….

६. मोहाच्या निसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जेव्हा कोणी नसतं बरोबर
तेव्हा साथ देते ती मैत्री…

७. मैत्री असावी अशी की
भरकटलेल्या घराची वाट दाखवणारी,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,
कटू प्रसंगी प्रेमाचा पाझर आणणारी,
एकटेपणात दिलासा देणारी,
न सांगता काही समजून घेणारी…

८. कागदाची नाव होती,
खेळण्याची मस्ती होती
बालपणीचे दिवस ते..
फक्त मित्रांची दुनियादारी होती..

९. समुद्राचे पाणी कधी आटणार नाही,
आपल्या आठवणी कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
आपली मैत्री कधीच तुटणार नाही..

१०. आयुष्य नावाची स्क्रिन जेव्हा लो बॅटरी दाखवते
आणि तेव्हा कोणताच चार्जर मिळत नाही, तेव्हां पावरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात
ते म्हणजे, मित्र!!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Friendship day 2023 send amazing charolya quotes in marathi to friends check list ndj

First published on: 03-08-2023 at 12:24 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×