भारतीय टेलिकॉम क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, एअरटेलने देशातील पहिलं असं AI आधारित नेटवर्क सोल्यूशन सादर केलं आहे, जे स्पॅम कॉल्स आणि मेसेजेस रोखण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. यामुळे फक्त ग्राहकांच्या अनुभवात सुधारणा होत नाही, तर वाढत्या अनावश्यक संपर्काविरोओधातही काम करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर प्रगती दिसून येते.

दूरसंचार क्षेत्रातील स्पॅम म्हणजे काय?

स्पॅम म्हणजे असे अनावश्यक कॉल्स आणि मेसेजेस ज्यांची हल्ली जगभरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, मोबाइल वापरकर्त्यांसाठी ही एक मोठीच समस्या बनली आहे. भारतात ही समस्या विशेष गंभीर आहे, जिथे मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज लाखो मोबाईल वापरकर्त्यांना स्पॅम येत असतात. यात फसवणुकीच्या योजनांपासून ते वैयक्तिक माहिती धोक्यात आणणाऱ्या गोष्टींपर्यंत सर्वकाही समाविष्ट असते. अलीकडच्या संशोधनाने असे दाखवले आहे की मोठ्या प्रमाणावर वापरकर्त्यांना या स्पॅममुळे त्रास होत आहे. यामुळे वापरकर्त्यांच्या ऑनलाईन माहिती गोपनीयतेबद्दलच्या चिंता वाढत आहेत.

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी झालेल्या अपघातात संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाला दिल्लीतील शिक्षण संस्थेने प्रवेश नाकारला 
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
BJP MLA Munirathna Naidu
Karnataka BJP MLA: ‘भाजपा आमदाराने विधानसभेत बलात्कार केला, हनीट्रॅपसाठी दबाव टाकला’, पीडितेचा धक्कादायक आरोप, न्यायालयानं सुनावली कोठडी
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?

दूरसंचार क्षेत्रामुळे संवाद खूपच सोपा झाला आहे. परंतु तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत आहे, तसतसे स्पॅमर्सच्या धोरणांमध्येही बदल होत आहेत. स्पॅम सापडणे हे ग्राहकांचे समाधान आणि विश्वासावर थेट परिणाम करते. त्यामुळे त्याचे महत्त्व खूपच जास्त आहे.

..त्यामुळे आता प्रवेश करा एअरटेलमध्ये!

या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी एअरटेलने एक नवीन AI आधारित तोडगा विकसित केला आहे, जे अत्याधुनिक प्रणाली वापरून संभाव्य स्पॅमचे धोके वेळीच ओळखते आणि त्यांना शोधून काढते.

एअरटेलचं नावीन्यपूर्ण सोल्यूशन!

स्पॅम कॉल्स आणि मेसेजेस ओळखण्यासाठी, एअरटेलची AI प्रणाली सतत येणाऱ्या मेसेजेसवर लक्ष ठेवते आणि त्यातील पॅटर्न व पद्धतीचं विश्लेषण करते. या प्रणालीला जेव्हा कोणताही धोका आढळतो, तेव्हा ग्राहकांना त्वरित त्यासंदर्भात माहिती दिली जाते, ज्यामुळे त्यांना त्या मेसेजेसवर पुढे रिप्लाय करायचा की नाही यासंदर्भात निर्णय घेता येतो. ही नवीन प्रणाली वापरकर्त्यांना केवळ अडथळे टाळण्यास मदत करत नाही, तर त्यांना वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठीही मदत करते.

भारतासारख्या देशात, जिथे डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन संवाद झपाट्याने वाढत आहेत, तिथे ही प्रणाली विशेषकरून महत्त्वाची ठरते. वापरकर्ते दररोजच्या कामांसाठी मोबाइलवरच अवलंबून असल्यामुळे, ते अशा अनावश्यक विनंत्या आणि फसवणुकींना बळी पडण्याची शक्यता वाढली आहे. रिअल-टाइम स्पॅम नोटिफिकेशन्सची सुविधा उपलब्ध करून, एअरटेल फक्त वापरकर्त्यांचा अनुभवच सुधारत नाही, तर त्यांना डिजिटल विश्वाबाबत साक्षर करणे आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत आपली बांधिलकीही दर्शवते.

दूरसंचार क्षेत्रावरील व्यापक परिणाम

एअरटेलच्या या पुढाकारामुळे टेलिकॉम क्षेत्रात एक नवा मापदंड प्रस्थापित झाला आहे. या मापदंडाने या क्षेत्रातील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रत्रज्ञानाची गरजच अधोरेखित झाली आहे. स्पॅमर्सच्या सतत बदलणाऱ्या पद्धतींना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी, टेलिकॉम कंपन्यांना एआय व मशीन लर्निंगमधील नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करत राहणे आवश्यक आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान बाजारपेठेत आणल्यामुळे एअरटेलने या क्षेत्रात आपले अग्रगण्य स्थान प्रस्थापित केले आहे. तसेच, एअरटेलनं अशा सेवा पुरवणाऱ्या इतर कंपन्यांनाही हे संबंधित तंत्रज्ञान वापरण्याचा मार्ग दाखवला आहे.

याशिवाय, AI-आधारित स्पॅम शोधण्याच्या या अत्याधुनिक प्रणालीमुळे दूरसंचार उद्योगातील एक व्यापक ट्रेंडच ठळकपणे समोर येतो: सेवा पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) समावेश! ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या नेटवर्कची गुणवत्ता सुधारण्यापासून ते ग्राहकांचं अधिकाधिक समर्थन मिळवण्यापर्यंत, AI हे ऑपरेटर्ससाठी सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याचं महत्त्वाचं माध्यम बनत आहे.

निष्कर्ष

थोडक्यात, एअरटेलने देशातील पहिली AI-आधारित स्पॅम शोध प्रणाली सादर करणे हे दूरसंचार उद्योगासाठी एक मोठं पाऊल आहे. ग्राहकांचं समाधान अधिकाधिक वाढवण्याबरोबरच, एअरटेलच्या या स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसच्या समस्येवरील उत्तरामुळे ग्राहकांसाठी एक सुरक्षित ऑनलाइन जगच निर्माण होण्यास मदत झाली आहे. या क्षेत्रातील उद्योग जसजसा विकसित होईल, तसतशा अशा अत्याधुनिक प्रणाली मोबाइल संवादाच्या सुरक्षिततेसाठी आणि ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी अत्यावश्यक ठरतील.