ऑफिस म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतो कामाचा डोंगर, आठवड्याचे नियोजन, टार्गेट, बॉसगिरी यांसारख्या गोष्टी. यातही पहिल्यांदाच नोकरी करणार असू किंवा एखाद्या नवीन ठिकाणी रुजू होणार असू तर तिथले लोक कसे असतील? आपल्याला सामावून घेतील की नाही? पण यापालिकडेही एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी असते ती म्हणजे त्या ऑफिसमधली मैत्री. नवीन असताना एकमेकांशी बिचकत बोलणारे आणि ऑफिसमधल्या व्यक्तीला कलिग म्हणणारे आपण जेव्हा त्याच्याशी शिव्या देऊन बोलायला लागतो तेव्हा त्या कलीगचा किंवा कलीगची ‘दोस्त’ केव्हा होऊन जाते आपले आपल्यालाच कळत नाही. सध्या घरानंतर आपण सगळ्यात जास्त कोणत्या ठिकाणी असतो असं कोणी विचारलं तर ते नक्कीच ऑफिस असतं. दिवसातील १० ते १२ तास सोबत राहिल्याने ऑफीस हे जणू आपले दुसरे घरच होऊन जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मग नकळत जुळणारे हे मैत्रीचे बंध इतके घट्ट होत जातात, की आपल्या खास मैत्रिणीला किंवा मित्राला भेटल्याशिवाय आणि बोलल्याशिवाय आपला दिवसही जात नाही. प्रत्येक ऑफीसमध्ये एक तरी असा व्यक्ती असतोच जो सगळ्या ऑफीसला बांधून ठेवण्याचे काम कोणाच्याही नकळत करत असतो. ती व्यक्ती सगळ्यांसाठीच खास असते. तिला सगळ्यांचीच सगळी सिक्रेट माहीत असतात. मग ही सिक्रेट कोणालाही शेअर करु नको असे सांगितल्यावर त्या व्यक्तीकडूनही ते प्रॉमिस पाळले जाते. नव्याने एखादा व्यक्ती ऑफीसमध्ये आला की त्याला कम्फर्ट करण्याचे कामही याच व्यक्तीकडे असते. मग नवीन व्यक्ती कधी जुन्या टीमचा भाग होऊन जाते आणि आपण या लोकांपासून कधी वेगळे नव्हतोच असे वाटायला लागते. ऑफिसमध्ये पाऊल ठेवल्यापासून ते रात्री घरी गेल्यावरही एकमेकांशी कनेक्ट राहणारे हे दोस्त आपल्या मनातील एक मोठी जागा व्यापून राहिलेले असतात. मी प्रोफेशनल राहणार असं तुम्ही कितीही म्हटलात तरीही ते नातं त्याच्या छान बहरत असतं.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friendship day in office colleagues second home enjoyment with office friends more than professionalism
First published on: 05-08-2018 at 16:36 IST