मराठी नववर्षाची चाहूल लागताच गुढी उभारण्याच्या तयारीसोबतच वेध लागतात ते म्हणजे शोभायात्रांचे. विविध ठिकाणी पाडव्याच्या निमित्ताने भव्य शोभायात्रांचे आयोजन केले जाते. तरुणाईचा उत्साह, त्यालाच मोठ्या मंडळींची साथ आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन इतरांना घडवण्यासाठी सुरु असलेली लगबग सारं काही या शोभायात्रांच्या माहोलात पाहायला मिळतं. भरजरी नऊवारी साडीपासून ते अगदी फेट्याच्या तुऱ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत मग सो कॉल्ड परफेक्शन शोधणाऱ्यांची झलकही शोभायात्रांच्या तयारीदरम्यान पाहायला मिळते. सांस्कृतिक वारसा पुढे नेणाऱ्या या शोभायात्रांचा एक महत्त्वाचा भाग किंवा घटक म्हणजे ढोल-ताशा पथकं.

ढोलाचा ठोका आणि ताशाची तर्री पडली की अनेकांचेच पाय ठेका धरु लागतात आणि मग वातावरणात आवाज घुमतो तो म्हणजे लयबद्ध आणि शिस्तबद्ध वादनाचा. गेल्या काही वर्षांमध्ये ढोल-ताशा पथकांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. ‘गिरगाव ढोल पथक’ ‘मोरया’, ‘वंदन’, ‘गजर’, ‘नादब्रम्ह’, ‘कलेश्वरनाथ’, ‘शिवगर्जना’, ‘रमणबाग’ अशा विविध पथकांतून हजारो वादक सध्या गुढी पाडव्याच्या तयारीमध्ये चांगलीच मेहनत घेताना दिसताहेत.

Health Special What exactly is heatstroke How to avoid it What is the solution
Health Special: उष्माघात म्हणजे नेमके काय? तो कसा टाळायचा? उपाय काय?
parents stand when it comes to selecting modelling career for their children
चौकट मोडताना : कचाकड्याचे जग
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Summer Special Sabudana Batata Recipe
फक्त १ वाटी साबुदाणा-१ बटाटा आणि तोंडात घालताच विरघळणारे उपासाचे पापड, १५ मिनिटतात ५० पापडाची सोपी कृती

प्रत्येक पथक स्वत:ची अशी एक वेगळी छाप सोडण्यासाठी नवनवीन ताल बसवत आहेत. ताशाची काडी मोडली (इथे काडी मोडणं म्हणजे ताशाची काडी तुटणं नव्हे. तर काडी मोडणं म्हणजे ताल बदलणं असा अर्थ होतो) की ताल बदलत दुसऱ्या तालाची सुरुवात आणि मग त्या तालाला अनुसरुन वाजणारा टोल या साऱ्याची रंगीत तालिम सध्या सुरु आहे. बऱ्याच ढोल-ताशा पथकांमध्ये पाडव्याच्या मिरवणुकांसाठी वेशभूषेवरही विशेष लक्ष दिले जात आहे. पांढरा शुभ्र सदरा-लेंगा, त्यावर बंडी, डोक्यावर फेटा, गांधी टोपी, मुलींच्या नाकात नथ, आणि कपाळावर चंद्रकोर, मुलांच्या कपाळावरही साजेसा टीळा किंवा मग चंद्रकोर अशी जय्यत तयारी महिन्याभरापासूनच केली जाते. काही पथकांनी पाडव्याच्या निमित्ताने ढोलांच्या थापीच्या (म्हणजेच हाताने वाजवायच्या बाजूला संतांच्या ओव्यांच्या काही ओळी छापत एका वेगळ्या मार्गाने संस्कृती जपण्याचा आणि तो वारसा पुढे चाललवण्याचा प्रयत्न केला आहे. काही समाजोपयोगी योजना, संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीसुद्धा बरीच पथकं प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कलेसोबतच ही ढोल-ताशा पथकं आणि त्यात वादन करणारी ही कलाकार मंडळी सामाजिक संदेशही इतरांपर्यंत पोहोचवत आहेत.

ढोल-ताशा पथकांमध्ये आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे ध्वजधारी. दहा-बारा मीटर उंचीच्या लांबलचक ध्वजबारावर भगवा झेंडा लावलेला असतो. ढोलाच्या तालाप्रमाणे, प्रत्येक हाताप्रमाणे म्हणजेच तालाप्रमाणे ही ध्वजधारी मंडळी मोठ्या नजाकतीने ध्वज नाचवत असतात. ध्वज नाचवण्याची त्यांची पद्धत आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा असतो. मुंबईच्या ‘वंदन’ पथकामध्ये याच संस्कृतीची गाडी पुढे नेण्यासाठी एक नवी मैत्रीण ध्वज नाचवण्याचा मान मिळवत आहे. मराठी नसूनही या संस्कृतीप्रती असलेली तिची ओढ आणि ध्वज नाचवण्याची कला सध्या अनेकांची दाद मिळवत आहे.

तेव्हा पाडव्याच्या दिवशी दागदागिने, गोडाधोडाचा बेत आणि शुभेच्छांची बरसात होत असतानाच ढोलाच्या एका ठोक्यावर होणारा तो कल्ला, तालाचा वेग वाढताच वादकांमध्ये पाहायला मिळणारा आवेग, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव हे सारं काही पाहण्यासाठी आणि हा वेगळ्याच उत्साह अनुभवण्यासाठी शोभायात्रांना नक्कीच भेट द्या..

unnamed-1

unnamed-2

unnamed-3

unnamed-4

छाया सौजन्यः ‘वंदन’ ढोल ताशा पथक फेसबुक

– सायली पाटील

sayali.patil@indianexpress.com