सलील उरूनकर
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर येणाऱ्या प्रकल्पांमध्ये स्वत:च्या राहण्यासाठी असो की गुंतवणूक म्हणून असो, सदनिका खरेदी करण्यासाठी ग्राहक उत्सुक आहेत. घरांच्या किमती वाढत असल्या तरीही ग्राहकांचा हा उत्साह कमी होताना दिसत नाही.

गुढीपाडवा आणि गृहखरेदी असे एक शुभ समीकरण आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि हिंदू नववर्षांचा शुभारंभ  होत असल्याने या दिवशी अनेक जण आपल्या घराची स्वप्नपूर्ती करतात. साहजिकच अनेक बांधकाम व्यावसायिक आपल्या ग्राहकांच्या या भावना लक्षात घेऊन नवे प्रकल्प दरवर्षी या कालावधीत बाजारात सादर करतात. यंदाही हा ट्रेंड कायम आहे, पण गृहखरेदी करण्यापूर्वीची प्रक्रिया आणि ग्राहकांची मानसिकता आता बदलत चालली आहे. त्यामुळे मोठय़ा घरांना पसंती मिळत आहे की परवडणाऱ्या घरांनाच मागणी आहे याबाबत बांधकाम व्यावसायिकांना योग्य अंदाज येत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मागणी व पसंतीप्रमाणेच सदनिकांचा पुरवठा करण्याचा ट्रेंड आता प्रस्थापित झाला आहे.

DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल

गृहखरेदी प्रक्रियेतील सगळय़ात मोठा बदल झाला आहे. तो म्हणजे, आता त्या प्रक्रियेत महिला महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे साहजिकच स्त्रियांची मानसिकता, त्यांच्या सोयीच्या सर्व सुविधा ज्या प्रकल्पांमध्ये असतील त्या प्रकल्पातील सदनिकांना मागणी अधिक आहे. नोकरदार महिलांकडून गृहखरेदी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. प्रमुख शहरांमध्ये नुकत्याच झालेल्या ‘अ‍ॅनरॉक’ संस्थेच्या सर्वेक्षणानुसार ७८ टक्के महिलांनी स्वत:साठी म्हणून घर खरेदी केले आहेत तर  २२ टक्के महिलांनी गुंतवणूक म्हणून खरेदी केलेली आहे. याच सर्वेक्षणानुसार ५७ टक्के महिलांनी ३ बीएचके सदनिकांना पसंती दिली आहे, २९ टक्के महिलांनी २ बीएचके सदनिकांना आणि ९ टक्के महिलांनी ४ बीएचके सदनिकांना पसंती दिली आहे. घर पाहण्यासाठी येण्यापूर्वीच त्या भागाची संपूर्ण माहिती घेणे, विविध सेवा पुरवठादार कुठे आणि   किती प्रमाणात उपलब्ध आहेत, प्रकल्पाविषयी अन्य ग्राहक व घटकवर्गाचे म्हणणे व अभिप्राय काय आहे, असा सगळा अभ्यास पूर्ण करूनच बिल्डरशी वाटाघाटी करण्यासाठी आता ग्राहक येत आहेत.

शहरांमध्येही वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. बहुतांश शहरांमध्ये मोठय़ा आकाराच्या सदनिकांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. मात्र पुण्यात १ बीएचके सदनिका पुन्हा डिमांडमध्ये येत आहेत. बंगळूरु, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली या शहरांमध्ये ३ बीएचके सदनिका, मुंबईमध्ये २ बीएचके सदनिकांना सर्वाधिक मागणी आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे भारतीयांचे प्रमाण वाढल्याचे आपण काही वर्षांपासून पाहात आहोत. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रावर परिणाम होईल, अशी अवास्तव भीती व्यक्त केली जात होती. मात्र आता हीच मिलेनियल आणि जेनझी जनरेशन शेअर मार्केटमध्ये कमवलेल्या नफ्याची गृहखरेदीमध्ये पुनर्गुतवणूक करत असल्याचे दिसून येत आहे.

अमेरिका व अन्य विकसित देशातील अर्थव्यवस्था क्षेत्रनिहाय स्थिरस्थावर होत असल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या सर्वाचा सकारात्मक परिणाम भारतीयांच्या पॅकेज व पगारावर होत असल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा रिअल इस्टेट क्षेत्राला होत आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर येणाऱ्या प्रकल्पांमध्ये स्वत:च्या राहण्यासाठी असो की गुंतवणूक म्हणून असो, सदनिका खरेदी करण्यासाठी ग्राहक उत्सुक आहेत. घरांच्या किमती वाढत असल्या तरीही ग्राहकांचा हा उत्साह कमी होताना दिसत नाही. या ग्राहकवर्गाला आकर्षित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांसमोर खूप मोठी संधी आहे. पण या नाण्याची दुसरी बाजू अशी की या चोखंदळ ग्राहकवर्गाला खूश करण्यासाठी बांधकामाचा दर्जा आणि अ‍ॅमिनिटीज दोन्ही उच्च दर्जाच्या ठेवाव्या लागणार आहेत. दर्जा, किमती आणि ग्राहक समाधान या तीनही पैलूंचा विचार करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना आणि त्यांच्या प्रकल्पांना पसंती मिळेल यात काही शंकाच नाही.