नवी दिल्ली :  आहारात कबरेदकांचे (कार्बोहायड्रेट्स) कमी प्रमाण केल्यावर काही जणांना जरी वजन घटवण्यात यश आले तरी प्रत्येकाच्या बाबतीत असे होईलच, याची शाश्वती नाही.

वजन घटवण्यासाठी अनेक जण विविध उपाय करतात. त्यात जोरकस-ताण देणाऱ्या व्यायामांचा समावेश असतो. तसेच त्यासोबत ते कमी कबरेदके असलेला आहार घेतात. आरोग्य आणि आहारतज्ज्ञांच्या मते वजन घटवण्यासाठी खूप व्यायाम करण्यापेक्षा दररोज नियमित व्यायाम करणे अधिक उपयोगी ठरते. कमी काबरेदके घेतल्याने सरसकट वजन घटवता येतेच असे नाही. ब्रेड आणि साखरयुक्त गोड पदार्थ टाळणे वजन घटवण्यासाठी निश्चित लाभदायक आहे. परंतु शरीराला आहारातून जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुयुक्त (फायबर) महत्त्वपूर्ण पोषक तत्त्वे घेणेही आवश्यक आहे. कमी कबरेदके घेतल्याने वजन घटवण्यात काही जणांना यश मिळते. तरीही सर्वाबाबत हे सूत्र सरसकट परिणामकारक ठरेलच असे नाही.

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?

‘कोक्रेन डेटाबेस ऑफ सिस्टमॅटिक रिव्ह्यूज’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालानुसार कमी कबरेदकांचा समावेश असलेला आहार घेणाऱ्या लोकांनी कबरेदकयुक्त संतुलित आहार घेतलेल्या लोकांपेक्षा फक्त एक किलो अधिक वजन घटवले. संशोधकांच्या मते ‘टाईप २’ मधुमेह असलेल्यांनी कमी कबरेदकयुक्त आहार घेण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांचे वजन प्रारंभी झपाटय़ाने घटले. परंतु एक-दोन वर्षांच्या दीर्घ कालावधीत मात्र त्यांच्या वजनात लक्षणीय घट झाली नाही. ‘टाईप २’ मधुमेह असलेले आणि मधुमेह नसलेल्या रुग्णांत वजन घटण्याबाबत फारसा फरक संशोधकांना आढळला नाही.