Viral infection Home remedies: बदलत्या हवामानाचा आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतो. कधी थंडी तर कधी तीव्र उष्णतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या वाढू शकतात. या हंगामात व्हायरल इन्फेक्शनचा सर्वाधिक धोका असतो. यात थोडासा निष्काळजीपणाही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पाठवू शकतो. त्यामुळे हवामानातील बदलाबरोबरच आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हवाबदल झाला की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आजारी पडतात. सर्दी, ताप, खोकला या तर अतिशय सामान्य समस्या. लहान मुलांना तर शाळा, पाळणाघर, वेगवेगळे क्लासेस यांमुळे सतत काही ना काही इन्फेक्शन होत असतं. एकदा इन्फेक्शन झालं की ते बरं व्हायला बरेच दिवस जातात. व्हायरल इन्फेक्शन आणि आजार टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेणेकरून आरोग्य चांगले राहते आणि कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

काय काळजी घ्याल?

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
  • व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी सर्वप्रथम बाहेरचे अन्न खाणे सोडले पाहिजे. वास्तविक, बाजारात मिळणाऱ्या वस्तूंमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याने आपण आजारांना बळी पडतो. शक्यतो घरी बनवलेले अन्नच खावे.
  • तुमच्या आजूबाजूचे किंवा घरातील लोक इन्फेक्शनला बळी पडले असतील, तर प्रथम प्रतिकारशक्ती वाढवण्यावर लक्ष द्या. तुमचा आहार संतुलित करा. तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या जास्तीत जास्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल आणि आजारांपासून तुमचे संरक्षण होईल.
  • बदलत्या हवामानात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. शक्य तितके पाणी प्या. यामुळे, शरीर हायड्रेटेड राहते आणि त्यात असलेले सर्व विषारी पदार्थ सहज बाहेर काढले जातात. शक्य असल्यास, फक्त उकळलेले पाणी प्या. यातून तुम्हाला अधिक फायदे मिळतात.
  • अगदी आवश्यक नसल्यास, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. गर्दीच्या ठिकाणी जावे लागत असेल तर तोंडाला आणि नाकाला स्पर्श करणे पूर्णपणे टाळावे. बाजारात इतर लोकांमध्ये अंतर ठेवा. हे तुमच्या शरीराला व्हायरल इन्फेक्शनला बळी पडण्यापासून वाचवू शकते.

हेही वाचा >> Tips For Soft Hands: कपडे धुतल्याने तुमचे हात कोरडे होतात का? ‘या’ घरगुती उपायांनी हात होतील मऊ

  • जर तुम्ही बाहेर प्रवासाला जात असाल तर मास्क लावल्याशिवाय जाऊ नका. जरी संक्रमित व्यक्ती जवळपास राहत असली तरी तुम्ही संसर्ग टाळू शकता. प्रवासात सुरक्षित राहण्यासाठी नेहमी सॅनिटायझर वापरत राहा.