Premium

अचानक हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी लक्षणे जाणवतात का? पुरुष आणि स्त्रियांमध्ये ही लक्षणे वेगळी असतात का? संशोधन काय सांगते….

निरोगी जीवन जगण्यासाठी फिटनेस हा महत्त्वाचा भाग असतो.

cardiac arrests symptoms men and women
पुरुष आणि महिलांमध्ये अचानकपणे हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे सामान्य नसतात. (Image Credit- Freepik )

सध्या प्रत्येकाचे जीवन हे धावपळीचे बनले आहे. प्रत्येकाला आपापल्या कामांमध्ये खूप ताण सहन करावा लागतो. तसेच कामांमुळे खाण्यापिण्याच्या वेळादेखील बदलत राहतात. याचा आरोग्यावर परिणाम होत असतो. ५० वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या व्यक्तींमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येण्यासंदर्भात काही रिपोर्ट, बातम्यांसह एका नवीन अभ्यासामध्ये असे दिसून आले की, ज्या लोकांना असा त्रास झाला, त्यांच्यातील निम्म्या व्यक्तींमध्ये २४ तासांपूर्वी काही लक्षणे दिसली होती. पुरुष आणि महिलांमध्ये ही लक्षणे वेगवेगळी होती. हे संशोधन खरोखरच अचानकपणे येणारा हृदयविकाराचा झटका आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी मदत करू शकते का ? असा झटका येणाऱ्या रुग्णाला वाचवण्यासाठी काही मिनिटांमध्ये त्याच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर का यामध्ये येणारी लक्षणे आपल्याला ओळखता आली, तर आधीपासूनच योग्य ते उपचार केले जाऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हृदयविकाराचा झटका येण्याच्या २४ तास आधी महिलांना श्वसनाचा त्रास होतो, असे प्रमुख कारण अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील सेडर्स-सिनाई हेल्थ सिस्टीम येथील स्मिट हार्ट इन्स्टिट्यूटच्या संशोधकांना आढळून आले आहे. तर, छातीमध्ये दुखणे हे पुरुषांमधील प्रमुख लक्षण दिसून आले. म्हणजेच स्त्रियांमध्ये जी लक्षणे दिसतात ती आधी सौम्य असतात, असा त्याचा अर्थ होतो का? ”आतापर्यंतचे सर्व संशोधन हे स्पष्ट लक्षणांमुळे पुरुषांवरच केंद्रित करून करण्यात आले. महिला त्यांना होत असलेला त्रास सांगणे टाळतात किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कारण- ती शास्त्रीय कारणे नसतात,” असे दिल्लीच्या ‘एम्स’मधील कार्डिओलॉजीचे प्रोफेसर डॉ. अंबुज रॉय यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा : उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांनी हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज दोन कप कॉफी प्यावी की ग्रीन टी? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात …

हृदयविकाराचा झटका पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगळ्या प्रकारे कसा येतो?

पुरुष आणि महिलांमध्ये अचानकपणे हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे सामान्य नसतात. त्यांना हृदयामध्ये कमी प्रमाणात दुखणे व दम लागणे अशा समस्या असतात. स्त्रियांना त्यांच्या प्रजनन वर्षांमध्ये इस्ट्रोजेन संप्रेरकाद्वारे संरक्षित केले जाते; जोपर्यंत त्या धूम्रपान करीत नाहीत आणि त्यांना मधुमेह होत नाही. त्यामुळे साहजिकच त्यांनी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अधिक सावधगिरी बाळगणे, निरोगी जीवन जगणे आवश्यक आहे.

येथे फिटनेस कसा महत्त्वाचा आहे?

निरोगी जीवन जगण्यासाठी फिटनेस हा महत्त्वाचा भाग असतो. कोणत्याही प्रकारचा हृदयविकाराचा झटका ब्लॉकेजेसमुळे किंवा अन्य कारणांमुळे येत नाही. मात्र शरीर, प्रकृती यांच्याकडे वेळोवेळी लक्ष न दिल्यामुळे त्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. हृदय हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. ह्रदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी डॉक्टरदेखील शारीरिक हालचाल, योग्य आहार व पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात.

स्त्रियांनी अ‍ॅरिथमिया (arrhythmia)कडे कसे पाहावे?

जर का महिलांना असे जाणवत असेल की, त्यांच्या हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत किंवा चक्कर येत असेल, तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी आपल्या अ‍ॅरिथमियावर औषधोपचार करून घ्यावेत. कधी कधी कार्डिओमायोपॅथी तणाव असू शकतो; जो सततची चिंता आणि उदासीनता यांचा परिणाम असू शकतो. हा परिणाम मध्यमवयीन महिलांमध्ये इतर वयोगटांपेक्षा वेगाने दिसून येतो. ५५ व्या वयानंतर एका महिलेमध्ये ही स्थिती निर्माण होण्याचा धोका पाच पटींनी वाढतो. तणाव म्हणजे अतिरिक्त एड्रेनालाईन (Excess Adrenaline); जे कधी कधी हृदयाच्या पेशींना जोडले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कॅल्शियम पेशींमध्ये प्रवेश करते आणि हृदयाच्या क्रियेमध्ये व्यत्यय आणते. महिलांनी छातीमध्ये दुखणे किंवा श्वास लागणे या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

हेही वाचा : ऑफिसमध्ये बॉस व घरी काम, सतत वाढतोय रक्तदाब? तुमच्या चिडचिडीमागे ‘हा’ आजार तर नाहीये ना कारण, वाचा

पुरुष आणि महिलांना दिल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये काही फरक असतो का?

अचानकपणे हृदयविकाराचा झटका आल्यास पुरुष आणि महिलांना दिले जाणारे उपचार सारखेच आहेत. अनेकदा महिला प्राथमिक अँजिओप्लास्टी करीत नाहीत; जो निवडक उपचारांपैकी एक उपचार आहे. त्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येण्याच्या शक्यतेमध्ये वाढ होते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heart attack cardiac arrests research symptoms diffrence between men and women tmb 01

First published on: 11-09-2023 at 15:32 IST
Next Story
Mental Health Special: मुलांचा स्क्रीन टाईम पालकांमुळेच वाढतोय का?