Sound OF Water Meditation : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या नवीन घराची झलक तिच्या चाहत्यांना दाखवली. नव्या घरासाठी वडील बोनी कपूर यांच्यासमवेत योगदान दिल्याबद्दल जान्हवीला किती अभिमान आहे याबद्दलही तिने नुकतेच एका मुलाखतीमध्ये सांगितले. यावेळी तिने तिची आई श्रीदेवी यांच्या काही सर्वात प्रिय आठवणीदेखील सांगितल्या. यूट्यूबवरील एशियन पेंट्सच्या ‘व्हेअर द हार्ट इज’ या व्हिडीओ मालिकेत योग आणि ध्यानासाठी घराबाहेरील जागेचा वापर करते, असे जान्हवीने सांगितले. यावेळी ती म्हणाली, “आम्ही येथे काही योग आणि ध्यानाचा सराव करतो, जे खूप छान आहेत; कारण मला ‘जल तत्व ध्यान’ करायला आवडते.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाण्याचा आवाज ऐकून ध्यान करण्यासाठी जान्हवीची आवड पाहून ‘जल तत्व ध्यान’ खरचं फायदेशीर आहे का? याबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेतली. याबाबत इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना फिटनेस आणि योगतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले की, ‘जल तत्व ध्यान’ म्हणजेच पाण्याचा आवाज ऐकून ध्यान करणे हा एक ध्यान अभ्यास आहे, ज्यामध्ये ध्यानाचा अनुभव वाढविण्यासाठी निसर्गाच्या उपचारात्मक गुणांचा उपयोग केला जातो. पाण्याचे सौम्य, लयबद्ध आवाज, मग ते किनार्‍यावर आदळणाऱ्या लाटा असोत किंवा खळखळ वाहणारे ओढ्यातील पाणी असो, जे सर्वांगीण आरोग्यास हातभार लावणारे असंख्य फायदे देतात. तणाव कमी करणे आणि एकाग्रता सुधारण्यापासून सर्जनशीलता वाढवणे आणि सर्वांगीण उपचारापर्यंत हा ध्यान अभ्यास अधिक संतुलित आणि परिपूर्ण जीवनाचा मार्ग आहे.”

हेही वाचा – सलग तीन दिवसांच्या उपवासाचा तुमच्या शरीरावर काय होईल परिणाम? 

जल तत्व ध्यान’ करण्याचे काही फायदे गोयल यांनी येथे सांगितले आहेत

तणाव कमी करणे – पाण्याच्या आवाजाचा शांत प्रभाव विश्रांतीस प्रोत्साहन देऊन तणाव कमी करण्यास मदत करतो. मेंदूला सुखदायक श्रवणासंबंधित उत्तेजनांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो, ज्यामुळे तणाव संप्रेरकांचे (हार्मोन्सचे) उत्पादन कमी होते.
एकाग्रता सुधारते – पाण्याचा आवाज सौम्य पार्श्वभूमी प्रदान करतो. ध्यान करताना मनावर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते. पाण्याचे लयबद्ध स्वरूप एकाग्रता सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या ध्यान अभ्यासात खोलवर जाण्याची संधी मिळते.
मन सजग होते – पाण्याच्या आवाजाचा सतत प्रवाह मनाच्या सजग स्थितीला प्रोत्साहन देतो, जिथे व्यक्ती सध्याच्या क्षणाशी अधिक जुळवून घेऊ शकते. ही वाढलेली जागरूकता सखोल आणि अधिक अर्थपूर्ण ध्यान अनुभव मिळवून देते.
झोपेची चांगली गुणवत्ता सुधारते – पाण्याच्या आवाजावर नियमित ध्यान करणे झोपेच्या गुणवत्तेशी संबंधित आहे. पाण्याच्या आवाजामुळे मिळणारा आराम निद्रानाश किंवा शांत झोप न लागण्याचा त्रास सहन करणार्‍यांसाठी फायदेशीर ठरतो आणि शांत झोप लागणे आणखी सोपे करू शकतो.
चिंता कमी करते – पाण्याची शांत लय ऐकल्याने चिंता कमी होण्यास मदत होते. “पाण्याच्या आवाजाचे पुनरावृत्ती होणारे स्वरूप एक ध्यानाचे वातावरण तयार करते, जे चिंतेशी संबंधित अतिक्रियाशील मनाचा प्रतिकार करते.”

हेही वाचा – नाश्ता केला नाही तर वजन वाढेल का? नाश्ता वगळण्याचा शरीरावर काय होतो परिणाम? काय सांगतात आहारतज्ज्ञ, जाणून घ्या… 

श्वासोच्छ्वासाचा सराव करा – पाण्याच्या आवाजाचे लयबद्ध स्वरूप ध्यानादरम्यान श्वासोच्छवासाचा सराव करणे तुम्हाला मार्गदर्शन आणि सुसंगतता प्रदान करण्यास मदत करू शकते. हे सुसंगतता हळूवारपणे खोल श्वास घेण्यास प्रोत्साहन देते, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजन वाढतो आणि मनात शांततेची भावना निर्माण होते.

“पाण्याचा आवाज ऐकून ध्यान केल्याने केवळ आरामदायी वाटण्याशिवाय अनेक फायदे मिळतात. जल तत्व ध्यानाचा दिनचर्येत समावेश करणे हा सर्वांगीण कल्याणासाठी एक बदल घडवणारा आणि शक्तिशाली प्रवास असू शकतो”, असे गोयल यांनी आवर्जून सांगितले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jahnvi kapoor says she loves meditating to the sound of water know how it helps snk
First published on: 02-12-2023 at 14:24 IST