मधुमेह हा शब्द आता बहुतेक सर्वांच्या ओळखीचा झालेला आहे. आजकाल बैठ्या जीवनशैलीमुळे मधुमेहाची समस्या खूप वाढली आहे. तरुण वर्गही त्याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. आता एक गोष्ट निश्चित आहे की, यावर कोणताही इलाज नाही, त्यामुळे तो आटोक्यात ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैलीसोबतच आरोग्यदायी आहाराचाही आपल्या दैनंदिन रूटीनमध्ये समावेश करणे गरजेचे आहे. मधुमेहींना रक्तातील साखर वाढल्यामुळे इतर अनेक आरोग्य समस्यांचा त्रास जाणवू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यायामाचा अभाव आणि अनारोग्यदायी अरबट-चरबट (जंक फूड) खाण्याचं प्रचंड प्रमाण यामुळे भारतामध्ये मधुमेहाचे प्रमाण धोक्याच्या पातळीवर वाढते आहे. रक्तामधील साखरेची पातळी एका मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यामुळे मधुमेह ही आयुष्यभर चालणारी स्थिती तयार होते. मधुमेहाचं प्रमाण केवळ शहरी भागातच वाढत आहे असं नाही, तर ग्रामीण भागातील लोकसंख्येलाही त्यानं ग्रासलं आहे. मधुमेह असलेल्या लोकांना आहाराबाबत विविध नियम पाळावे लागतात. मधुमेह असलेल्या लोकांनी संध्याकाळच्या दरम्यान नाश्ता करावा का? याच विषयावर डॉ. अंबरीश मिथल यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

डाॅक्टर सांगतात, “व्यस्त दिवसाच्या मध्यभागी स्नॅक्स आपली ऊर्जा वाढवू शकतात आणि पुढील नियमित जेवणात आपल्याला जास्त खाण्यापासून रोखू शकतात. सामान्यतः दररोजच्या सुमारे २५ टक्के कॅलरी स्नॅक्समधून येतात, म्हणूनच उत्तम आरोग्यासाठी तसेच मधुमेह नियंत्रण आणि वजन व्यवस्थापनासाठी स्नॅक्सची निवड योग्य करणे आवश्यक आहे. संध्याकाळच्या वेळी नाश्ता करणे मधुमेहींसाठी चांगलेच आहे. परंतु या नाश्त्यात योग्य पदार्थांचा समावेश केला पाहिजे.”

(हे ही वाचा : ‘या’ बियांच्या सेवनाने झपाट्याने वजन होईल कमी? कधी व किती सेवन करावे समजून घ्या तज्ज्ञांकडून… )

जर तुमच्या मधुमेहावर इन्सुलिन आणि औषधोपचार केला जात असेल, ज्यामुळे तुम्हाला हायपोग्लाइसेमिया (कमी रक्त शर्करा) होण्याचा धोका असतो, तर तुम्हाला तुमच्या रक्तातील ग्लुकोज मर्यादेत ठेवण्यासाठी नाश्ता करावा लागेल. या स्नॅक्समध्ये फायबर, प्रथिने आणि चांगली चरबी असावी. मधुमेह असलेल्यांनी ३०-६० ग्रॅम कार्बोहायड्रेट्सच्या तुलनेत १५-३० ग्रॅम कार्बोहायड्रेटमध्ये स्नॅक्स घ्यावा आणि ते जेवणापूर्वी, मध्यान्ह किंवा संध्याकाळी लवकर असावे.

एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, स्नॅकिंगची गुणवत्ता स्नॅकिंगचे प्रमाण किंवा वारंवारतेपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे उच्च प्रमाणात सोडियम, साखर आणि ट्रान्स फॅट्स असलेल्या उच्च प्रक्रिया केलेल्या स्नॅक्सपेक्षा उच्च दर्जाचे स्नॅक्स निवडणे सोयिस्कर आहे. मधुमेह असलेल्या लोकांसाठी स्नॅकचा आनंद घेण्यासाठी येथे काही टिप्स आहेत!

नट आणि बिया: संध्याकाळच्या बिस्किटांच्या जागी मूठभर काजू (बदाम, अक्रोड, पिस्ता), प्रथिने घेणे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जर आपण कार्बोहायड्रेट्सला चांगल्या चरबीने बदलले तर आपण रक्तातील साखरेची वाढ, रक्तदाब कमी करतो आणि हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देऊ शकतो.

फळे : ताजी फळे अँटिऑक्सिडंट्स, फायबरने भरलेली असतात. तथापि, मधुमेह असलेल्या लोकांनी जास्त फळे खाऊ नये. कारण त्यात मोठ्या प्रमाणात कर्बोदके असतात. त्यामुळे ते मध्यान्ह किंवा संध्याकाळच्या सुरुवातीला घेणे चांगले. फळांचा रस पूर्णपणे टाळावा. प्रत्येक फळामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण वेगवेगळे असते.

भाजलेले चणा चाट : भाजलेले चणे प्रोटीन आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत. तुम्ही ते चाटच्या रूपात खाऊ शकता. ते तिखट आणि चवदार बनते.

अंडी : तुम्हाला रक्तदाब किंवा हृदयाची कोणतीही समस्या असली तरीही दररोज एक संपूर्ण अंडे खाणे सुरक्षित आहे. अंड्यामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने असतात.

तुम्ही बाजारात गेले की तुम्हाला साखर नसलेले पदार्थ असं लेबल लावलेले पदार्थ दिसतील. परंतु ते खरंच खाणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे की, नाही याची आधी खात्री करा, आणि मगच खरेदी करा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should diabetics have an evening snack which are the best snacks for diabetes pdb
Show comments