गर्भधारणा (Pregnancy) हा निःसंशयपणे स्त्रियांसाठी आनंदाचा काळ असतो; परंतु गरोदरपणात स्त्रियांना स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते. आईच्या प्रत्येक कृतीचा पोटातील बाळावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या काळात शरीर आणि एकंदरीतच पूर्ण आरोग्याची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेण्याची गरज असते. तसेच बरीच खबरदारीही घ्यावी लागते. गरोदरपणात महिलांनी खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते उठण्या-बसण्यापर्यंत अनेक गोष्टींबाबत स्वत:ला सांभाळणे महत्त्वाचे ठरते.

गरोदरपणाचा काळ हा स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा काळ असतो. या काळात त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच या काळात महिलांना त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. गरोदरपणात त्वचेचीही विशेष काळजी घ्यावी लागते. गरोदरपणात महिलांनी सनस्क्रीन वापरावे का? याच विषयावर डॉ. आंचल पंथ यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

डाॅक्टर पंथ म्हणतात, “गर्भधारणेचा काळ हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक सुंदर आणि महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवणे खूप गरजेचे असते. गर्भावस्थेत स्त्रियांना खाण्यापिण्यापासून ते शरीर व त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. या अवस्थेत आपल्याला अनेक शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. या काळात महिलांना विशेष काळजी घ्यावी लागते.”

(हे ही वाचा : रोज १ कप चहा प्यायल्याने खरंच वजन वाढतं का? पोषणतज्ज्ञांनी सोडवला वाद )

तसेच, “केसांना रंग देऊ नका म्हणजे केसांना रंग देणे टाळणे चांगले. विशेषत: पहिल्या तिमाहीत; ज्यामध्ये गर्भधारणेच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांचा समावेश होतो. बाळाचे अवयव विकसित होण्याच्या या गंभीर दक्षतेच्या काळात, ज्यामध्ये संभाव्य रासायनिक अभिक्रिया होऊ शकते अशा केसांना रंग देण्यासारख्या बाबींपासून दूर राहा,” असेही डाॅक्टर पंथ यांनी ठामपणे बजावले.

गर्भधारणेच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. या काळात महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल दिसून येतात. महिलांची त्वचा या काळात खूप संवेदनशील होते. त्यामुळे महिलांना मुरमे, त्वचेतील कोरडेपणा, पिगमेंटेशन, निस्तेजपणा आणि व स्ट्रेच मार्क्स यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक सनस्क्रीनमध्ये रसायने वापरली जातात; जी गर्भवती महिलांसाठी हानिकारक असतात. परंतु, उन्हापासून संरक्षण होण्यासाठी गर्भवती महिलांना सनस्क्रीन वापरणे आवश्यक असल्याने त्यांनी रासायनिक सनस्क्रीनऐवजी सुरक्षित सनस्क्रीन वापरावे. त्याव्यतिरिक्त गरोदरपणात काही रासायनिक ब्युटी प्रॉडक्ट्स वापरणेही नुकसानदायी ठरू शकते, असेही डाॅक्टर पंथ नमूद करतात.