तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीचा श्वास गुदमरत असेल तर हे दृश्य भयानक असू शकते. पण, अशा वेळी काय करावे हे जाणून घेतल्यास खूप मदत मिळू शकते. जर तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीचा श्वास गुदमरत असेल, तर अशावेळी तुम्ही योग्य पद्धतीने मदत केल्यास कदाचित त्याचा जीव वाचू शकतो. अशा परिस्थितीत एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही सक्षम व्हायला पाहिजे, त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत.

हैदराबादमधील बंजारा हिल्सच्या केअर हॉस्पिटल्सच्या अंतर्गत औषध विभागाच्या सल्लागार डॉ. अथर पाशा यांनी द इंडियन एक्स्प्रेसबरोबर संवाद साधताना गुदमरण्याची लक्षणे कशी ओळखावी आणि अशावेळी रुग्णाची कशी मदत केली पाहिजे आणि प्रौढांवर प्रभावी प्रथमोपचार कसे करावे, याबाबत माहिती दिली आहे.

What does your eye discolouration say about your health? Dark Circles Solution
तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Chanakya Niti These 5 things men should never tell anyone
Chanakya Niti : पुरुषांनी या ५ गोष्टी अजिबात कोणालाही सांगू नयेत, नाहीतर आयुष्यभर लोक तुमच्यावर हसतील
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज
Husband wife relationship There is no way to get angry Patience is essential
तुमच्याही बाबतीत असं घडतंय?
Ladki Bahin Yojana, brothers, Ladki Bahin,
‘बहिणीं’नो, दीड हजार रुपयांसाठी ‘भावां’ना प्रश्न विचारण्याची ताकद गमावू नका…
panchayat pigeon scene comes alive as bird released by top cop falls to ground
उलटा चष्मा : नेहरूच जबाबदार!
Why every sister should also promise to protect her brother this Raksha Bandhan
प्रत्येक बहिणीने आपल्या भावाचे का केले पाहिजे रक्षण? लक्षात ठेवा या ६ महत्त्वाच्या गोष्टी

हेही वाचा – पाणी नव्हे, तुम्ही प्लास्टिक पिताय! प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी हानिकारक; संशोधनातून धक्कादायक माहिती स्पष्ट

गुदमरण्याची लक्षणे

गुदमरत असलेल्या व्यक्तीला मदत करण्याची पहिली पायरी म्हणजे गुदमरण्याची लक्षणे ओळखणे. एखाद्या व्यक्तीचा श्वास गुदमरत असेल तर त्याला सहसा काही बोलता येत नाही, श्वास घेता येत नाही किंवा व्यवस्थित खोकता येत नाही.

  • सर्वसामान्यतः गुदमरण्याचे लक्षण : जर व्यक्तीचा श्वास गुदरमरत असेल तर ती व्यक्ती एका किंवा दोन्ही हातांनी आपला घसा पकडते
  • श्वास घेण्यास त्रास होणे : अशा स्थितीत जेव्हा श्वास गुदरमरत असलेली व्यक्ती मोठ्याने श्वास घेते, जलद आणि खोल श्वास घेते, श्वास घेताना घशातून घरघर आवाज येतो.
  • घाबरणे आणि अस्वस्थ होणे : गुदमरणे हा एक भयानक अनुभव असू शकतो, त्यामुळे अशी व्यक्ती घाबरलेली किंवा अस्वस्थ दिसू शकते.
  • बोलता न येणे : अशा स्थितीमध्ये व्यक्ती काहीही बोलू शकत नाही किंवा फक्त बारीक, नाजूक आवाजात पुटपुटते.
  • त्वचेचा रंग बदलणे : अशा स्थितीमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, व्यक्तीची त्वचा निळी किंवा फिकट होऊ शकते, विशेषत: ओठ आणि नखांभोवती.
  • बेशुद्ध होणे : गंभीर प्रकरणांमध्ये श्वास गुदमरल्याने व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते.

तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित मदत केली पाहिजे. या मार्गदर्शकामध्ये वर्णन केलेल्या पद्धतींचे पालन करणे महत्त्वाचे आहे. अशा स्थितीमध्ये लवकर हस्तक्षेप केल्यास व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश मिळू शकते.

हेही वाचा- रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

श्वास गुदमरत असलेल्या एखाद्या व्यक्तीला मदत करण्यासाठी काय करावे?


१. परिस्थितीचे मूल्यांकन करा : एखाद्या व्यक्तीचा श्वास खरोखर गुदमरत आहे की नाही हे त्वरीत ओळखा. बोलण्यास असमर्थता किंवा खोकला, स्वत:चा घसा पकडणे आणि ओठ किंवा चेहऱ्याचा निळा रंग दिसणे यांसारखी लक्षणे आहेत का ते पाहा.

२. परवानगी : जर ती व्यक्ती शुद्धीत असेल तर मदतीसाठी त्याची परवानगी घ्या. जर ती व्यक्ती प्रतिसाद देऊ शकत नसेल किंवा शुद्ध हरपत असेल तर ताबडतोब मदत करा.

३. हेमलिच मॅन्युव्हर( Heimlich Maneuver) पद्धत वापरा (Abdominal Thrusts) :

  • गुदमरलेल्या व्यक्तीच्या मागे उभे राहा आणि त्यांच्या कमरेभोवती आपले हात गुंडाळा.
  • एका हाताची मूठ श्वास गुदमरत असलेल्या व्यक्तीच्या नाभीच्या वर, पण बरगडीच्या खाली ठेवा.
  • दुसऱ्या हाताने मूठ बांधा आणि झटपट वरच्या दिशेने जोराने ओटीपोटात दाबा.
  • जोपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या घशात अडकलेली वस्तू बाहेर पडत नाही किंवा व्यक्ती बेशुद्ध होत नाही तोपर्यंत या क्रियेची पुनरावृत्ती करा.

४. बॅक ब्लोज (Back Blows) : जर हेमलिच मॅन्यूव्हर( Heimlich Maneuver ) ही पद्धत अयशस्वी झाली किंवा ती व्यक्ती लठ्ठ किंवा गर्भवती असेल, तर तुम्ही बॅक ब्लोज ही पद्धत वापरू शकता:

  • व्यक्तीच्या मागे आणि थोडेसे एका बाजूला उभे राहा.
  • त्यांच्या छातीला एका हाताने आधार द्या आणि त्यांना पुढे झुकवा.
  • तुमच्या हाताच्या तळव्याने खांद्याच्या हाडावर झटपट पाच वेळा जोरात मारा. ५. तोंड तपासा : पाठीवर जोरात मारल्यानंतर प्रत्येकवेळी व्यक्तीचे तोंड तपासा आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण करणारी वस्तू बाहेर पडली आहे ते पाहा. जर ती वस्तू तोंडात अडकली असेल तर शक्य असल्यास ते आपल्या बोटांनी काढा, परंतु ते आणखी खाली ढकलले जाणार नाही याची काळजी घ्या.

६. बेशुद्ध असल्यास : जर व्यक्ती बेशुद्ध झाल्यास तिला जमिनीवर खाली झोपवा आणि CPR देण्यास सुरुवात करा. श्वासोच्छवासाची लक्षणे तपासा आणि आवश्यक असल्यास तात्काळ आपत्कालीन सेवेची मदत घ्या.

डॉ. पाशा यांनी येथे काही लक्षात ठेवण्यासारख्या इतर गोष्टी सांगितल्या आहेत.

  • मदत करताना जास्त शक्ती वापरणे टाळा, विशेषत: दुर्बल किंवा गर्भवती व्यक्तींमध्ये.
  • जर ती व्यक्ती लठ्ठ असेल किंवा गर्भवती असेल, तर हेमलिच मॅन्यूव्हर पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक असू शकते.
  • श्वास गुदमरल्याच्या घटनेनंतर, व्यक्तीला बरे वाटत असले तरीही वैद्यकीय मदत घ्या, कारण नंतर गुंतागूंत वाढू शकते.
  • शांत राहा आणि गुदमरलेल्या व्यक्तीला घाबरू नये म्हणून धीर द्या, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.

लक्षात ठेवा, प्रथमोपचार तंत्र शिकून घ्या आणि नियमितपणे तुमच्या ज्ञानात भर टाकत राहा, जेणेकरून अशा आपत्कालीन परिस्थितींसाठी तयार राहणे आवश्यक आहे.