Children’s Day 2021: वर्षभरातील ३६५ दिवसांचा अभ्यास केला तर प्रत्येक दिवशी काही ना काही खास असतंच…त्यापैकीच आजचा १४ नोव्हेंबर हा दिवस…देशभरात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन भारतात बालदिन साजरा करण्यात येतो. १४ नोव्हेंबर १८८९ रोजी प्रयागराज इथे त्यांचा जन्म झाला होता. लहान मुल म्हणजे नेहरूंचा जीव की प्राण होता. मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं ते कायम म्हणायचे. मुलांवरील त्यांचं अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात बालदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. बालदिनाची नेमकी सुरुवात कशी झाली आणि हा दिवस कधीपासून साजरा केला जातो याबाबत जाणून घेऊया. यामागे काय इतिहास आहे ते जाणून घेऊया…

eid al fitr 2024 chand raat ramadan eid 2024 know the date and timings of eid al fitr moon sighting
१० की ११ एप्रिल, भारतात कधी दिसणार ‘ईद’चा चंद्र? भारतासह परदेशात कशाप्रकारे ठरवली जाते ‘ईद’ साजरी करण्याची तारीख?
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

जगात पहिल्यांदा इंग्लंडमध्ये १८५६ मघ्ये चेल्सी इथे बालदिन साजरा झाला. त्याकाळी चर्चमध्ये लहान मुलांसाठी एक स्पेशल दिवस ठेवण्यात आला होता. लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या खास गोष्टी, वेगवेगळे खेळ आयोजित करून त्यांचा हा खास दिवसा साजरा करण्यात आला होता. त्यानंतर हळूहळू जगातील इतर देशांमध्ये बालदिन साजरा करण्यास सुरूवात झाली.

पण वुमेंस इंटरनॅशनल फेरडेशननं १ जून रोजी बालदिन साजरा करण्यासाठी बंदी आणली होती. १ जूनच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही तारखेला बालदिन साजरा करण्यात यावा, असं वुमेंस इंटरनॅशनल फेरडेशननं म्हटलं. कारण १ जून चा दिवस Children’s protection day म्हणून साजरा करण्यात येत होता. १९५० मध्ये वुमेंस इंटरनॅशनल फेरडेशननं हा विरोध केला होता. त्यानंतर १९५४ साली संयुक्त राष्ट्राने मुलांचे अधिकार आणि हक्क लक्षात घेऊन २० नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालदिन म्हणून घोषित केला. त्यानंतर जगात सर्व देशांमध्ये २० नोव्हेंबर रोजी बालदिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली.

१९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर मात्र भारतात बालदिनाची तारिख बदलून त्यांना आदरांजली म्हणून १४ नोव्हेंबरचा दिवस बालदिन म्हणून घोषित करण्यात आला. मुलांवर त्यांचं अपार प्रेम होतं. म्हणूनच हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात बालदिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली. त्यांनी आपल्या विकासकार्यात बाल कल्याण उपक्रमांना मोठं प्राधान्य दिलं होते. २७ मे १९६४ रोजी याबाबत भारतात सर्वानुमते अधिकृत घोषणा करण्यात आली.

आणखी वाचा : Children’s Day 2021 Messages in Marathi: बालदिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Greetings, SMS, WhatsApp Status शेअर करुन बालमित्रांसोबत दिवस साजरा करा!

फक्त भारतच नव्हे तर असे बरेच देश आहेत जेथे २० नोव्हेंबर ऐवजी वेगवेगळ्या दिवशी बालदिन साजरा करण्यात येतो. अनेक देशांमध्ये १ जून रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. चीनमध्ये ४ एप्रिल रोजी, पाकिस्तानात १ जुलै रोजी, अमेरिकेत जून महिन्याच्या दुसऱ्या रविवारी बालदिन साजरा करण्यात येतो. याव्यतिरिक्त ब्रिटनमध्ये ३० ऑगस्ट रोजी, जापानमध्ये ५ मे रोजी, पश्चिम जर्मनीत २० सप्टेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो.

आणखी वाचा : Children’s Day 2021 : ‘या’ राशीची मुलं असतात हजारात एक, त्यांना सांभाळणं पालकांसाठी असतो मोठा टास्क, का जाणून घ्या…

बालदिवसाच्या निमित्ताने देशभरात शाळांमध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम, खेळांचे आयोजन करण्यात येतात. अनेक ठिकाणी मुलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात. यासोबतच या दिवशी मुलांना बाल हक्कांबाबत जागरूक केले जाते. मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, संस्कृती हे फारच महत्वाचे असते कारण हीच मुले आपल्या देशाचे भविष्य घडवणार असतात.