scorecardresearch

Children’s Day 2021 : ‘या’ राशीची मुलं असतात हजारात एक, त्यांना सांभाळणं पालकांसाठी असतो मोठा टास्क, का जाणून घ्या…

काही राशीच्या मुलांमध्ये विशिष्ट प्रकारचं वर्तन दिसून आलं आहे आणि या मुलांना हाताळणं सर्वात कठीण काम आहे. काही मुलं खूप हट्टीही असतात. कधीकधी त्यांना पटवणं आणि त्यांना योग्य वागणूक शिकवण खूप कठीण होतं. राशीनुसार जाणून घ्या सविस्तर…

children-day_759

राशिचक्रांचा आपल्या वागणुकीवर खूप मोठा प्रभाव पडतो आणि लहानग्यांचा सुद्धा या यादीत समावेश होतो. काही राशीच्या मुलांमध्ये विशिष्ट प्रकारचं वर्तन दिसून आलं आहे आणि या मुलांना हाताळणं सर्वात कठीण काम आहे. काही मुलं खूप हट्टीही असतात. कधीकधी त्यांना पटवणं आणि त्यांना योग्य वागणूक शिकवण खूप कठीण होतं. अनेक वेळा पालकांना त्यांच्या मुलांच्या राशीबद्दल माहिती नसते आणि त्यामुळे त्यांना काळजी वाटते की ते इतर सामान्य मुलांसारखे का वागत नाहीत?

राशिचक्राचा स्वभावावर होतो प्रभाव

काही मुलांची बुद्धी फार लवकर बिघडू लागते. ते वस्तू फेकायला लागतात. गर्दीच्या ठिकाणी त्यांना संयम नसतो. त्यांना सांभाळणं फार कठीण होऊन बसतं.

त्यांचं वागणे पालकांसाठी एक मोठी समस्या आणि त्रासाचं कारण बनतं. आपण अनेकदा विचार करतो की, मुलांच्या अशा वागण्यामागे एक प्रकारची अस्वस्थता, भूक, चिडचिड किंवा राग असू शकतो. पण यासोबतच काही मुलांवर राशींचा प्रभावही खूप असतो. काही राशींची मुले वेगळी वागतात. विशिष्ट राशीच्या मुलांना इतर सामान्य मुलांपेक्षा जास्त राग येतो. ते अधिक हट्टी होऊ लागतात.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या मुलांना सांभाळणं कधीकधी खूप कठीण होऊन बसतं. ते खूप हट्टी होतात. एकदा वस्तू जर त्यांनी स्वतःची आहे हे स्वीकारलं, तर ते ती वस्तू कधीही सोडत नाहीत. या राशीच्या मुलांना समजावून सांगणं खूप कठीण होऊन बसतं. ते कुणाचंही ऐकत नाहीत, आपल्या मुद्द्यावर ठाम राहतात. जीवन जगण्याची आणि गोष्टींकडे पाहण्याची त्यांची स्वतःची पद्धत असते. या प्रकरणात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेत नाहीत.

सिंह राशी

जर तुमची मुलं सिंह राशीची असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की ते तुमचं कधीच ऐकत नाहीत. ते खूप हट्टी आहेत. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत त्यांचा आनंद आणि फायदा बघत असतात. त्यांना हाताळणं खूप कठीण असतं. सिंह राशीच्या मुलांना आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या पद्धतीने व्हावी आणि प्रत्येकाने त्यांच्यानुसारच वागावं असं वाटत असतं. ते कोणत्याही प्रकारे तडजोड करण्यास तयार होत नाहीत.

आणखी वाचा : Children’s Day 2021 Messages in Marathi: बालदिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Greetings, SMS, WhatsApp Status शेअर करुन बालमित्रांसोबत दिवस साजरा करा!

कन्या राशी

कन्या राशीची मुले सिंह राशीच्या मुलांपेक्षाही एक पाऊल पुढे असल्याचं दिसून आलं आहे. ते स्वतःला सर्वोत्कृष्ट समजतात. या राशीच्या मुलांना त्यांच्या चुका मान्य करण जमत नाही. अशा मुलांना चूक-बरोबर समजावून सांगणं कोणत्याही पालकासाठी अवघड होऊन बसतं. कारण त्यांना त्यांची जीवन जगण्याची पद्धत आणि त्यांची वृत्ती सर्वात योग्य वाटते.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या मुलांना सांभाळणंही कठीण असतं. ते आपल्या पालकांचं म्हणणं ऐकल्यासारखं सोंग आणतात पण वागण्यात आणत नाहीत. त्यांची स्वतःची मानसिकता असते. ते प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच त्यांना योग्य वाटतो. अशा मुलांना त्यांच्या भावना बाजूला ठेवून व्यावहारिक जीवन जगायचं असतं. त्यांना त्याच्या आजूबाजूच्या लोकांसोबत स्वतःच्या अटींवर गोष्टी सेटल करायच्या असतात. जेव्हा पालक त्यांच्यावर एखाद्या गोष्टीबद्दल खूप दबाव आणतात तेव्हा ते त्यांच्याशी बोलणं देखील बंद करतात.

आणखी वाचा : Children’s Day: १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून का साजरा करतात? जाणून घ्या इतिहास…

वृषभ, कन्या, वृश्चिक आणि सिंह राशीची मुले हट्टी असतात. पालकांचं कमी ऐकणं, आपल्या शब्दावर ठाम राहतात, त्यांना समजावून सांगणं कठीण होतं. त्यांना विशेषतः गर्दीच्या ठिकाणी राग येतो आणि मग ते कोणाचंही ऐकत नाहीत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-11-2021 at 08:14 IST

संबंधित बातम्या