Mosquito home remedy: डास आपल्या दैनंदिन जीवनातील एक मोठी समस्या बनले आहेत. शहरातील घर असो किंवा ग्रामीण भागातील घर असो, डासांपासून कायमची सुटका होणे जवळजवळ अशक्य वाटते. डास आपली झोपच नाही तर मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियासारखे गंभीर आजारदेखील पसरवतात. व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेले रिपेलेंट्स, स्प्रे आणि कॉइल आराम देतात; परंतु त्यात असलेली रसायने आपल्या आरोग्यावर, त्वचेवर आणि श्वासोच्छवासावर नकारात्मक परिणाम करू शकतात, विशेषतः मुले आणि वृद्धांसाठी हे घातक आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक किंवा घरगुती पद्धतींचा अवलंब करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

घरच्या घरी अशा पद्धतीने बनवा मच्छर मारण्याचे औषध

हे औषध बनवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता असेल. त्यासाठी कापूर, मोहरीचे तेल आणि तमालपत्र घ्या. त्यानंतर कापूर बारीक करून त्याची पावडर बनवा. पावडर झाल्यावर तेल घाला. तेलात कुस्करलेली तमालपत्रे घाला आणि ती जाळून टाका. अशा प्रकारे तुमच्या घरी एक नैसर्गिक डास प्रतिबंधक तयार असेल. तुम्ही ते दररोज संध्याकाळी जाळू शकता. धूर डासांना दूर ठेवण्यासदेखील मदत करू शकतो.

या औषधाचे फायदे

या नैसर्गिक डास प्रतिबंधक औषधाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते कोणत्याही हानिकारक रसायनांचा वापर करत नाही. कापूर, मोहरीचे तेल आणि तमालपत्र हे सर्व नैसर्गिक घटक आहेत, जे केवळ डासांना दूर ठेवत नाहीत तर वातावरण शुद्धदेखील करतात. कापराचा सुगंध हवा ताजी करतो. मोहरीच्या तेलाचा दीर्घकाळ टिकणारा प्रभाव असतो, ज्यामुळे ते प्रभावी बनते. तमालपत्र जाळण्याचा धूर डासांना त्वरित दूर करण्यास मदत करतो. शिवाय, हा उपाय अत्यंत किफायतशीर आणि पर्यावरणास अनुकूल आहे.