Dinesh Karthik big statement on MS Dhoni Six : आयपीएल २०२४ च्या ६८व्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला आहे. हा सामना जिंकून बंगळुरू प्लेऑफ्ससाठी पात्र ठरला आहे. हा सामना चाहत्यांचा श्वास सोडणारा सामना होता. शेवटी महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जकडून फलंदाजी करत असताना आरसीबीने सामना गमावल्याचे दिसत होते. पण यश दयालने शानदार पुनरागमन केले आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर पुढच्या ५ चेंडूत केवळ एक धाव दिली. सामन्यानंतर आरसीबीचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकने चेन्नईच्या पराभवावर मोठे वक्तव्य केले आहे. एमएस धोनीच्या षटकारांचा फायदा आरसीबीला झाल्याचे दिनेशने सांगितले.

‘धोनीचा षटकार आमच्यासाठी फायदेशीर’ –

या सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजी करत असताना दव घटक दिसला होता. त्यामुळे आरसीबीच्या गोलंदाजांना गोलंदाजी करताना अडचणी येत होत्या. त्याच्या हातातून चेंडू निसटत होता, त्यामुळे लॉकी फर्ग्युसननेही २ बीमर टाकले. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस वारंवार चेंडू बदलण्याची शिफारस करत होता, पण पंचांनी चेंडू बदलण्यास नकार दिला. महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्टेडियमबाहेर षटकार मारला तेव्हा हा चेंडू बदलला होता. धोनीचा षटकार आमच्यासाठी फायदेशीर ठरले, असे वक्तव्य दिनेश कार्तिकने केले आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
navi Mumbai lok sabha voting
Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live: महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान!
Hamas men confess
“माझ्या वडिलांनी आधी बलात्कार केला, मग मी आणि…”, हमासच्या बाप-लेकाचे इस्रायली महिलेशी राक्षसी कृत्य
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!

यश दयालने सामना कसा पलटवला-

दिनेश कार्तिकने सामना संपल्यानंतर आपल्या सहकाऱ्याशी बोलताना हे वक्तव्य केले. तो म्हणाला की, “धोनीने यश दयालच्या पहिल्या चेंडूवर ११० मीटरचा लांब षटकार मारला, जो आमच्या पथ्यावर पडला. या षटकारामुळे चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला. त्यामुळे आम्हाला नवीन चेंडू मिळाला, ज्यामुळे यश दयाल सहज पुनरागमन करू शकला. त्यामुळे आम्ही विजय मिळवून प्लेऑफ्समध्ये पोहोचलो.” शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १७ धावांची गरज होती. यश दयाल गोलंदाजीला आले. दयालने पहिला चेंडू पूर्ण टॉस यॉर्करच्या रूपात टाकला, ज्यावर धोनीने षटकार मारला. चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला. यानंतर नवा चेंडू दयाल यांच्याकडे सोपवण्यात आला. दयालने पुढच्या ५ चेंडूत फक्त १ धाव देत १ बळी घेतला आणि बंगळुरूला पात्र ठरण्यास मदत केली.

हेही वाचा – IPL 2024 : RCB ने प्लेऑफ्ससाठी पात्र ठरून रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला संघ

सामन्याबद्दल बोलायचे, तर आयपीएल २०२४ च्या ६८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बनंगळुरुने चेन्नई सुपर किंग्जचा धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. प्लेऑफसाठी पात्र ठरणारा आरसीबी हा चौथा संघ ठरला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रथम खेळताना आरसीबीने २० षटकांत ५ गडी गमावून २१८ धावा केल्या होत्या. यानंतर प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी बंगळुरूला चेन्नईला २०० धावांवर रोखायचे होते. म्हणजेच प्लेऑफ्समध्ये जाण्यासाठी आरसीबीला हा सामना १८ धावांनी जिंकावा लागणार होता. मात्र, आरसीबीने सीएसकेला १९१ धावांवर रोखत २७ धावांनी विजय मिळवला.